१३ डिसेंबरच्या रात्री १० पासुन १४ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजेपर्यंत, उल्कावर्षाव होणार आणि जगभरातील कोणत्याही स्थानावरुन तो दिसणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले होते. डिसेंबर मध्ये होणारा हा उल्कावर्षाव तसा नवीन नाही. दरवर्षी याच तारखांना हा उल्कावर्षाव होत असतो. ताशी किमान १०० ते १२० उल्कापात होताना दिसण्याचा अंदाज असतोच. यावर्षी देखील असाच अंदाज होता. यापेक्षा अधिकवेगळेपण यावर्षीच्या उल्का वर्षवाचे होते ते म्हणजे आकाशात चंद्राचा अभाव. चंद्रप्रकाशाचा अभाव म्हणजे तारांगण पाहण्याची सुवर्णसंधीच. आणि त्यातच उल्कावर्षाव म्हणजे ही तर दुधात साखर. दिवस सुटीचा नव्हता. दिवसभर ऑफीसमध्ये काम करायचे होते. अनेक जणांचे फोन देखील मला आले हे जाणुन घेण्यासाठी की निसर्गशाळेचा काही विशेष प्रोग्राम आहे का या उल्का वर्षावाच्या निमित्ताने. १३ डिसेंबर व १४ डिसेंबर दोन्ही कामाचे दिवस असल्याने, आपण या वर्षी असा विशेष कार्यक्रम आयोजित केला नव्हता. संध्याकाळी ऑफीस चे काम उरकुन, हा उल्का वर्षाव पाहण्यासाठी जाण्याचे ठरले. आशिष जोशी सोबत मी आणि आमच्या ब-याच नंतर उद्योजक अजित नाईक आणि पुण्यातील नामवंत डॉ. सुविद्य देखील येणार होते. यावेळी आम्हाला कसलीच घाई नव्हती. पर्यटकांच्या व्यवस्थेची चिंता नव्हती. वेळेचे कसलेही बंधन नव्हते. प्रवास सुरु झाला. घाई असते तेव्हा पुणे बेंगलोर हाय वे पकडुन आम्ही सरळ सरळ कॅम्पसाईट वर पोहोचतो. यावेळी आम्ही वाकड्या वाटेने गेलो. कसलीच घाई नसल्याचे आशिष ला देखील माहीत होते. स्टीयरींग त्याच्या हातात होते. सिंहगड रोड ला, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरी आधी चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. अंदाजे, साडे आठ वाजले असतील त्या वेळी. शास्त्रज्ञांनी दिलेल्या अनुमानानुसार उल्कावर्षाव सुरु होण्यासाठी अजुन बराच अवधी होता. तरीही सहजच, चहा पित असताना, एकदा आकाशाकडे पाहीले. म्हंटल पहाव तरी किती तारे दिसताहेत? पण एक ही तारा दिसला नाही. मी सगळी कडे, आठही दिशांना नीट पाहीले. मला आधी वाटले की, अद्यापही शहरी दिव्यांचा प्रभाव डोळ्यांवर असेल, म्हणुन मी, चष्मा काढुन, एक टक माझी नजर आकाशा कडे स्थिर केली. माझी नजर आता थोडी स्थिरावली होती. डोक्याच्या वर, थोडं पुर्वेला मला एक अंधुक चांदणी हलकेच चमकताना दिसली. आणखी थोड्या वेळाने, मला हे देखील समजले की हा रोहीत (रोहीणी) तारा आहे, यास पाश्चात्य, आधुनिक खगोलींनी अल्डेबरान असे नाव दिले आहे. रोहीणी नक्षत्रामधील. तस पाहता, हा अतिशय प्रकाशमान असा तारा आहे. इतका की त्याच्या तेजामुळेच आपल्याकडी प्राचीन खगोल शास्त्रींनी त्याला रोहीत असे नाव दिले. रोहीत होणे म्हणजे क्रुध्द होऊन लाल होणे. तो इतका तेजस्वी आणि सुस्पष्ट आहे की त्याची लालसर प्रभा देखील आपण नुसत्या डोळ्यांनी पाहु शकतो. पण आज तिथे, नुसताच एक लुकलुकणारा, छोटासा टिंब दिसत होता. चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. हळु हळु रस्त्याच्या आजुबाजुने असलेल्या इमारती आणि त्यांतील लाईट्स आदींची गर्दी कमी होऊ लागली. तसेच रस्त्यावरील वाहनांची रहदारी देखील कमी होऊ लागली. सिंहगड रस्ता सोडुन आम्ही डावीकडे वळलो. इथुन पुढच्या वीसएक किमीमीटरच्या प्रवासात, मला एक साक्षात्कार झाला. मघाशीच म्हंटल्याप्रमाणे, आशिषला देखील समजले होते की कसलीच घाई नाहीये आज. त्यामुळे त्याच्या गाडी चालवण्यामध्ये ती नसलेली घाई दिसत होती. त्याला रस्ता माहीत नव्हता. कुठे वळण आहे, किंवा वळण आहे की नाही, की रस्ता सरळ आहे, काही म्हणजे काही त्याला माहीत नव्हते. रस्त्तावरची इतर वाहनांची वर्दळ आता संपली होती. समोर अंधाराला दोन तुकड्यांमध्ये कापणारा, आमच्या गाडीचा हेडलाईटचा प्रकाश होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना, गुडघाभर वाढलेले, सुकलेले गवत दिसत होते. आमची गाडी इतकी सावकाश जात होती की, त्या गवताच्या शेंड्यावरील, गवताचे बीज सुध्दा डोलताना दिसत होते. गाडीच्या प्रकाशाच्या रेषेत असणा-या झुडपे, आणि आणि सागाच्या झाडांचे कमी अधिक जाडीचे बुंधे. मध्येच एक ससा गाडीला आडवा आला. गाडीच्या प्रकाशाने त्याचे डोळे दिपले, त्याला समजेना काय करावे ते. हेडलाईट कडे एकटक काही क्षण तो पाहत राहीला. तो थांबलेला होता, स्तब्ध होता. आता गाडी सुध्दा थांबली. दोघेही स्तब्ध. आशिष ने हेडलाईट बंद केली. नव्हे गाडीच बंद केली. गाडी बंद केल्यावर समोर दिसणारा रस्ता, गवत, झाड झुड्प आणि तो ससा सगळच नाहीस झाल. अंधारात सगळकाही गडप झाल. जणु अंधाराने त्या सर्वांना गिळुन टाकले. एक अनामिक शांतता तिथे आधीपासुनच होती. सगळे काही मस्त मजेत चाललेले होते. आमच्या गाडीच्या येण्याने ह्या शांततेचा भंग झाला होता हे मला समजले होते एव्हाना. आता त्या अंधाराला डोळे सरावत होते. समोरच्या डोंगराची कड आता दिसु लागली होती. आणि त्या डोंगराच्या वर आकाशात मला एक तारा दिसला. अत्यंत प्रकाशमान, नीट निरखुन पाहील्यास त्यात अनेक रंगाच्या छटा देखील दिसतात. हा अगस्ती असावा बहुतेक. गाडीमध्येच बसुन असल्यामुळे नीटसे समजत नव्हते. आम्ही दोघेही गाडीतुन खाली उतरलो. आणि आश्चर्यकारक रित्या आम्ही स्वतःस, विराट अशा तारांगणा खाली असल्याचे अनुभवले. सिंहगडाच्या वर, आकाशात आग्नेय दिशेला, साधारण ४०-४५ अंश कोनात, मृग नक्षत्र अगदी स्पष्ट दिसले.आणि त्याच्याही वर, मघाशी कसाबसा दिसणारा रोहीणी , अतिशय तेजस्वी, चकाकत होता. सिंहगड रोडवर, साधारण एक तासापुर्वी, अजिबात न दिसणारा हा तारा आणि हे तारांगण आता कसे काय स्पष्ट दिसु लागले? ४-५ मिनिटे, आम्ही तिथेच घालवली. पुन्हा त्या अंधाराला आम्ही विचलीत करणार होतो. पुन्हा गाडीच्या आवाजाने, इथल्या शांततेच्या आणि सौहार्दाचा (हार्मनी) आम्ही भंग करणार होतो. हे करणे आता सक्तीचेच होते. गाडीची घरघर पुन्हा सुर झाली. थंड वारा दोन्ही खिडक्यांतुन गाडीत घुसत होता. आशिष मस्तवाल पणे गाडी चालवत होता. इतका मस्तवाल की, गाडी तो चालवतच नव्हता. गाडीच्या ॲक्सेलेटर वरील पाय त्याने कधीच काढला होता. गाडी स्वतच चालत होती. वेग अंदाजे, ४-५ किमी प्रति तास असा असावा. पाबे खिंडीतुन किंवा सिंहगडावरुन जर कुणी पाहत असेल तर त्यांना एक प्रकाशाचा ठिपका दिसला असता. आणि आणखी नीट पाहीले तर समजले असते की हा ठिपका हळुवार पणे सरकतोय देखील. रस्ता, त्यामधील वळणे, घाट, तीव्र चढ, याविषयी आशिष ला काहीच माहीत नव्हते. मला रस्त्याचे प्रत्येक वळण, प्रत्येक खड्डा अगदी स्पष्ट माहीत आहे. मला ह्या रस्त्याचे पुर्ण ज्ञान आहे. मला हे देखील माहीत आहे की हा रस्ता माझ्या माहीतीतील सर्वात अनइंजिनीयर्ड रोड आहे. हा रस्ता बनवते वेळी बहुधा कसल्याच नियमांचा विचार केलेला नसेल. अतिशय तीव्र चढ आणि उतार, तो ही वळणाशिवाय. मला ह्या रस्त्याविषयी असलेल्या या सर्व ज्ञानामुळेच मी मात्र आशिषप्रमाणे प्रवासाचा अनुभव घेण्यात कमी पडत होतो. मला गंतव्य माहीत होते, आशिष ला ते माहीत नव्हते. मला धोके माहीत होते, आशिष ला ते माहीत नव्हते. त्यामुळे जितका आनंद तो ह्या प्रवासाचा घेत होता तितका मी घेऊ शकत नव्हतो. कित्येकदा आपल्या आयुष्यात देखील आपण, काय मिळवायचय, कुठे जायचय, कोणत ध्येय गाठायचय, ह्या नादात आपण जीवन प्रवासाची मजा घ्यायचे विसरुन जात असतो. आणि जर आपण काही काळ हे ध्येय वगैरे विसरु शकलो तर, प्रवासाची मजा घेता येईल यात संशय नाही. नेमका हाच साक्षात्कार मला ह्या प्रवासात झाला. तीव्र अशा चढावर गाडी, पहील्या गीयर मध्ये, आपोआपच वर वर चढत होती. शुन्य ॲक्सेलीरेट असताना. सगळाच्या सगळा पाबे घाट आमची गाडी असाच चढली. खिंडीत पोहोचुन, आणखी एक ब्रेक आम्ही घेतला.
It was a usual early morning, My younger son, Shiva, woke me up and insisted to go on hiking the hill near our village. I also got ready immediately. We got ready and headed to scale the mountain. Awakens the enthusiasm of the Child It was dark outside; however, the Sun had already sent its beautiful saffron lights along the eastern horizon. We hadn’t come out of the village yet, and Shiva pointed towards a few stars overhead and exclaimed that the stars were falling. I knew the stars were stationary, but it was a big challenge to make him understand the concept. I still tried. According to my opinion he is too small to grasp the vastness of the universe. We climbed the hill. All tired and sweating. Bit relaxed and in no hurry, we spent some more time up on the hill. The Sun already had marked its presence in the eastern sky. While descending down, Shiva again pointed towards the Sun, and asked, “ Baba, Is the Sun biggest of all? And there is sunlight beyond the Sun?” I had shown my kids the Sun and the moon occasionally. Sometimes some stars also. However, when he proactively started speaking about the celestial bodies, I felt really good. Now was the time to answer his questions. I knew, he would remember very few things or even he may forget all. But still I told him few things about our solar system and the Milky Way. I could sense that his curiosity was satisfactorily addressed. He looked happier upon knowing something big. Something about, up high in the sky. And there I learnt another lesson from him. The lesson is very clear and bold. When you aim high in life, set your eyes on something really great, you become happy. And it’s not only about study of astronomy or making career in space science. Once you started getting amazed by such wonders of nature, you hardly care for worldly, material successes or failures. It’s a Sanskar, which would help us make ourselves calm, look up and stay amazed. Material life’s have’s and don’t have’s, hardly make any difference. The dive into celestial data We came home. He proactively went on to study(He is in Anganwadee). He looked quite confident. When I was telling him about the celestial objects, I realized that whatever knowledge I had, was very limited. Then I researched and based on the facts found by modern science, I got amazed by, the way the universe is functioning. I came across many startling facts. So why not try to understand what are these things and how these things can help us. Video – It begins with the Sun. Life on Earth is dependent on the Sun. Explore the inner workings of our nearest Star To begin your journey to star gazing, you first must understand some basics. First things First One ray of light originated from our Sun, travels approximately 3 lac kms in one second With this speed, whatever distance, ray of light travels in a human years’ time, is called as a light year It means one light year is approximately 94,63,00,00,00,000 kms. One ray of light from reaches earth in 8 light minutes and 18 seconds. (You try calculating the distance. One second is 3 lac kms so calculate for 8 mins and 18 seconds..) The nearest neighbor star of our is termed as Proxima Centauri. This star is 4.3 light years away from earth. Now can you try calculating the distance in kilometers? Well, though the near neighbor, we, with our naked eyes, or even from the earth’s environment cannot see this star. It’s that faint. The amazing part hasn’t started yet. Though the nearest neighbor, we cannot see Proxima centauri, which is only 4.3 light years away. There is another very bright star in Orion constellation. We Indians call this constellation as Mriga(मृग नक्षत्र). The brightest star in Mriga nakshatra, is Rigel, which is the brightest star in this constellation. Now the fun starts. This Rigel star is 860 light years away from earth. Still we can see it, with our naked eyes. The second largest star, in Mriga Nakshatra, is at a distance of 2000 light years from earth. We can see this star also with our naked eyes. But we cannot see Proxima Centauri. Is not it surprising? Some how, if we could get up there on the Rigel star, and try to locate our Sun, can we see our Sun from there? The answer is a big NO. its because our sun is not among the brighter or brightest stars and also its size also among the low volume stars. Means there are many, at least 100 billion, stars in milky way and our Sun stands nowhere when looked at the sizes and magnitudes of other stars. Isn’t it amazing? It’s a common understanding that, all planets in our solar system revolve around the Sun. This means the sun is still. Right? That’s what our assumption is. However it’s not true. The Sun also is in motion and it revolves around the center of the Milky Way. Our Sun revolves at a speed of approximately 300 kms per second. Wow, Aren’t you amazed yet? Our Sun is a very small element of The Milky Way. We know that there are 8 planets orbiting around our Sun. The fact is there are more than 7 lac planets, comets, clusters, meteors, rocks orbiting around our Sun. And Hope you remember the very fact that Our Earth is a very small element of our Solar System. Apart from Our Sun, there are approximately 100 billion other stars in the Milky Way galaxy. Each star may have its own planetary system. Sometimes there are two stars in system, such two starred solar system is called as binary star or twin star. Now comes another piece of information to get amazed. All these stars, rocks, clusters, clouds of gases orbit
ब्रम्हांडाचा पसारा किती असेल? काही ठोकताळे/तथ्ये सुरुवातीस – सुर्यापासुन निघालेला एक प्रकाश किरण एका सेकंदामध्ये अंदाजे ३ लाख किमी चा प्रवास करतो. ह्याच वेगाने प्रकाशकिरण एका वर्षात जितके अंतर प्रवास करेल त्यास एक प्रकाश वर्ष म्हणतात. म्हणजेच एका प्रकाश वर्षाचे अंदाजे अंतर किती ? – ९४,६३,००,००,००,००० किमी सुर्य व पृथ्वीमधील अंतर – ८ प्रकाश मिनिटे आणि१८ प्रकाश सेकंद आकाशातील सर्वात जवळचा तारा पृथ्वीपासुन किती अंतरावर आहे – ४.३ प्रकाशवर्षे, म्हणजे ९४,६३,००,००,००,००० या संख्येला ४.३ ने गुणले तर जे उत्तर येईल तेवढ्या अंतरावर हा तारा आहे. शास्र्तज्ञांनी या ता-या ला प्रॉक्सिमा सेंटॉरी असे नाव दिले आहे. आता खरी गंमत सुरु होते. आपण रात्रीच्या वेळी जे काही तारे पाहतो, त्यात काही लख्ख प्रकाशमान असतात तर काही मंद फिकट म्हणजे त्यांचा प्रकाश अगदीच क्षीण असतो. आपल्या डोळ्याना हे जे काही तारांगण दिसते त्या तारांगणामध्ये आपल्या सर्वात जवळचा प्रोक्सिमा सेंटोरी तारा नसतो. तो इतका क्षीण मंद आहे की तो नुसत्त्या डोळ्यांना दिसतच नाही. आता दुसरे उदाहरण पाहु. आपण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये रात्रीच्या आकाशात, मृगनक्षत्र नक्कीच पाहीलेले असते. या मृगनक्षत्रामध्ये आपणास चार तेजस्वी तारे दिसतात. या चार ता-यांस आपण मृगाचे शरीर म्हणतो. या ता-यांमधील सर्वात तेजस्वी दिसणारा तारा पृथ्वीपासुन २००० प्रकाशवर्ष इतका दुर आहे. या वरुन आपणास अंदाज येऊ शकेल की आपल्या डोळ्यांना दिसणा-या हे तारे आणि तारकापुंज किती दुर आहेत. व जो सर्वात जास्त जवळ आहे तो डोळ्यांना दिसत देखील नाही. मृग नक्षत्रातील हे दुर वरचे, प्रकाशमान तारे पृथ्वीवरुन नुसत्या डोळ्यांना दिसतात व प्रॉक्सिमा दिसत नाही, यावरुन हे लक्षात येते की हे स्वयंप्रकाशित तारे किती मोठ्या प्रमाणात प्रकाश आणि उष्णता उत्सर्जित करीत असतील. या व्यतिरीक्त आणखीही काही तथ्ये आपणास माहीत असणे आवश्यक आहेत. पहीले म्हणजे आपल्या सुर्यापेक्षा हे मृगनक्षत्रातील तारे किमान ३०० पटीने मोठे आहेत. याचाच अर्थ असा होतो की कदाचित मृगनक्षत्रातील या ता-यापैकी एखाद्या ता-यावरुन जर आपण आपला सुर्य पाहायचा म्हंटले तर व ते तसे तिथपर्यंत पोहोचता आले तर, आपला सुर्य तिथुन दिसणार नाही, कारण सुर्य आकाशगंगेतील इतर ता-यांच्या तुलनेत छोटा आहे. या सर्वांवरुन आपणास हे लक्षात येते की ब्रम्हांडाचा विस्तार खुप मोठा आहे. या सा-या मध्ये एक विशिष्ट योजना आहे. तारतम्य आहे. कमी अधिक काही नाही. आकाशस्थ ग्रहगोलांमध्ये, ता-यांमध्ये , तारकापुंजांमध्ये परस्पर आकर्षण-विकर्षण इतकेच आहे की त्यामुळे हे ब्रम्हांड गतिमान असुन देखील योजनाबध्द रीतीने सुरक्षित आहे. शास्त्रज्ञांना अजुनही आपल्या सौर मंडलाच्या बाहेर मनुष्य किंवा यंत्र यांना पाठविता आलेले नाही. हबल किंवा तत्सम दुर्बिणींच्या साहाय्याने जे काही दिसते आहे त्यावरुनच ब्रम्हांडाचे सध्या चे मानचिन्ह तयार झाले आहे. आपली आकाशगंगा ही एक गॅलक्सी आहे व अशा अनेक (अब्जाबधी) गॅलक्सी अंतरीक्षामध्ये असण्याची शक्यता आहे. तर विचार करा की ह्या ब्रम्हांडाचा पसारा किती असेल? हेमंत ववले निसर्गशाळा, पुणे Upcoming. Star gazing Party near Pune December 4th , 2021 Join us on the night Star Party for a starry night out. Event Highlights: Jupiter, Saturn, Galaxies, Nebulae, Star Clusters etc. through Telescope and with our very Eyes.! Click here
There is beauty and harmony in each and every element of nature. Its just the fact that we often don’t open our eyes to it. Nature’s peace will flow into you as sunshine flows into trees. The winds will blow their own freshness into you, and the storms their energy, while cares will drop away from you like the leaves of Autumn. . . Some best shots captured by Sachin Gavhane. These pictures are taken last weekend i.e. 11th and 12th Nov 2017. You can the same harmony below. The rurals are also part of the same harmony. A bamboo basket to catch fish has been put in place. Though a human made thing, but it now belongs and suits here. Nature smiles always in each and everything…. Dont miss this amazing footage of fish at the rappelling site, apprx 4000 ft above sea level
आजपर्यंत वेगवेगळ्या ऋतुंमध्ये, अनेक वेळा तोरणा किल्ला पाहण्याची संधी मिळाली. प्रत्येक ऋतुमध्ये तोरण्याचे वेगळेच रुप बघावयास मिळते. तोरणाच काय, सह्याद्रीतील प्रत्येक किल्ला ऋतुमानानुसार रुप पालटतो. या वर्षी मात्र ह्या रुप पालटण्याच्या प्रक्रियेचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली. निसर्गशाळेच्या विविध सहलींच्या माध्यमातुन, पर्यटकांमध्ये निसर्गाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. निसर्गातुन, मोकळ्यामैदानातुन चालताना, पायवाट सोडुन चालु नये, कारण पायवाट नसेल तर आपण आपल्या पायाखाली पाने, फुले, वेली, गांडुळ, बेडुक आदींना चिरडण्याची भीती असते. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीपासुन ते अगदी पर्यावरण संरक्षण संवर्धनात आपापल्या पातळीवर, आपापल्या परीने काय योगदान देता येईल इथपर्यंत माहीती साध्या, छोट्या संभाषणातुन पर्यटकांना सुचवली जाते. अनेकदा अमराठी (प्रसंगी परदेशी देखील) पर्यटक देखील अशा विविध सहलींमध्ये सहभागी होतात. अशा पर्यटकांना सह्याद्री, सह्याद्रीतील संस्कृती, भुगोल आणि त्या सोबतच इतिहासाविषयी देखील माहीती आम्ही देण्याचा प्रयत्न करीत असतो. कालच्या पदभ्रमणाच्या सुरुवातीलाच, निसर्गचक्रातील एक बदल, अगदी गाड्या पार्क केल्यावर लगेचच जाणवला. तो म्हणजे बदललेले वारे. शिवकाळात एका इंग्रज वकीलाने तोरण्याविषयी माहीती लिहीताना त्यास गरुडाचे घरटे असे संबोधले आहे. तर मग ह्या गरुडाच्या घरट्यात घोंघावणारा वारा असणारच. हे घरटे समुद्रसपाटीपासुन अंदाजे चार हजार सहाशे फुट उंचीवर आहे. एवढ्या उंचावर वाहणारा वारा देखील तितकाच खमक्या आहे. पावसाळ्यात हा वारा पश्चिमेकडुन पुर्वेकडे वाहताना आम्ही अनुभवलाय. ह्या वा-याचा अनुभव घ्यायचा असेल तर किल्ल्यावर चढताना रेडे पट्ट्यावर थोडे थांबावे. तसा वारा सगळीकडेच असतो.पण रेडे पट्ट्यावर हा वारा किल्ल्याच्या सोंडेला धडकुन अजुन वर उभारी घेतो. व नेमके पायवाटेवरच आपल्याला ह्या वा-याचा आनंद घेता येतो. रेडे पट्ट्यापासुन पुढे उभी चढण सुरु होते. कडा अंगावर येतो. ही वाट आपणास कोठी दरवाज्यातुन गडावर घेऊन जाते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, मुरुमाच्या रेती मुळे व मातीतुन मोकळ्या झालेल्या लहान मोठ्या खड्यांमुळे नवख्या माणसास जरा अवघड जाते. आमच्या ग्रुपमध्ये देखील काही नवखे होतेच. त्यामुळे आमचा वेग मंदावला होता. रेडे पट्टा सोडल्यावर घोंघावणारा वारा देखील मागे, खालीच राहतो. गुरुत्वाकर्षाच्या विरुध्द दिशेने, पुणे परीसरातील सर्वात उंच पर्वत चढताना दमायला होते. प्रत्येक श्वास-प्रश्वासागणिक शरीरातुन अशुध्दी बाहेर पडत असते. पायवाटेच्या उजवीकडे, भट्टी वागद-या कडील दरीची भीती केव्हाच संपलेली असते. श्वासाची गती वाढलेली असते. आकाशातुन सुर्याची भट्टी डोंगर द-यांसहीत आपल्या अंगा-प्रत्यंगास भाजुन काढीत असते. अंग घामाघुम झालेले असताना , अचानक एखादी वा-याची हलकी झुळुक आलीतर जणु सह्याद्रीनेच पुढे येऊन मला मिठित घेतले की काय असे वाटते. सह्याद्रीला त्याच्या लेकराची काळजी आहे. व त्याला थोडा दिलासा देतो. ही वा-याची झुळुक तापलेल्या, घामाघुम झालेल्या अंगावर हलकेच थंडावा आणते. आता आम्ही डोंगर मातीची चढाई संपवुन, कातळ कड्याच्या पायथ्याशी आलो. आता गड अगदी टप्प्यात आला होता. कातळकड्याची चढण सुरु होण्यापुर्वी, डावी हाताला, कातळातुन झिरपणारे पाणी वेगवेगळ्या कड्या कपारीतुन खाली ठिबकते. तेथे, कुणीतरी, वरुन खाली येणारे सर्व पाणी, एका लोखंडीपाईप मध्ये जमा करुन एक पाण्याची धार तयार केली होती. सर्वांनी पाणी प्यायले. कातळातुन झिरपत येणारे पाणी अतिशय थंड व मधुर होते. जसे आम्ही कोठी दरवाजातुन गडावर दाखल झालो तसे आणखी बदल जाणवला. तो म्हणजे गडावरील स्वच्छता. आम्ही गडाच्या द्वारातच होतो तितक्यात तेथे आणखी एक ग्रुप गडा खाली उतरण्याच्या तयारीत होता. त्यात वीसेक लहान मुल आणि ३-४ तरुण होते. त्यातील एक तरुण मुलांना पैकी एका कडे पाहुन त्याला विचारीत होता की तुमचे गणशिक्षक कुठे आहेत. एवढ्या वरुन मला समजले की हा नुसत्या पर्यटकांचा जथ्था नसुन हे तर कार्यकर्ते मंडळी आहेत. त्यांची थोडी फीरकी घ्यायचे ठरवले. मी त्यांना विचारले, “तुमचा कचरा कुठय? कचरा नाही ना केला गडावर तुम्ही?” त्यावर त्यातील एक कार्यकर्ता सांगु लागला की ते सगळे मिळुन ५०-६० जण आहेत. व ते कचरा करण्यासाठी आलेले नसुन गडावर साफसफाई करण्यासाठी आलेले आहेत. मी “बर बर”, म्हणुन गुगली टाकली, “तुम्ही ते हाप चड्डी वाले का?”. ह्या प्रश्नावर बाकी सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. उत्तर कोण देणार हे त्यांनी एकमेकांशी न बोलताच ठरवले. त्यांच्यातील आणखी एक चुणचुणीत तरुण, थोडा पुढे येऊन “हो” म्हणाला. मी, “बर बर…असु दे. काही काही हाप चड्डीवाले चांगले असतात, की जे अशी किल्ले साफ सफाईची कामे करतात.” तो तरुण, “तस नाही काका(हल्ली काकाच म्हणायला लागलेत ब-यापैकी अनोळखी तरुण देखील. लहान मुलांनी काका म्हंटले तर ठिक आहे, पण तरुण देखील…वय व्हायला लागलय आता) . सगळेच हाफ चड्डीवाले चांगले असतात. आता तुम्हीच बघा की हे सगळे कार्यकर्ते, मुले, स्वयंसेवक वेळ, श्रम आणि स्वतचा पैसा खर्च करुन इथपर्यंत येऊन गड साफ करतात. आणि यात कसलाही स्वार्थ नाहीये यांचा ” माझ्याकडे देखील वेळ कमी असल्याने मी जास्त फिरकी घेण्यच्या फंदात न पडता, त्यांना रामराम करुन आम्ही मेंगाई देवीच्या मंदीराकडे निघालो. तेवढ्यात आणखी एक ग्रुप मला भेटला. तो देखील खाली उतरत होता. ह्या ग्रुप मध्ये सगळे हिंदी भाषिक तरुण मुले होती. मी त्यांना ही हटकले व कच-या विषयी विचारणा केली. त्यांनी तर लगेच पाठीवरची सॅक खाली काढुन त्यातील त्यांचा स्वतःचा कचरा दाखवला व मला आश्वस्त केले की ते लोक कचरा पुण्यापर्यंत नेऊन त्यांच्या घराच्या आसपासच्या कचरा पेटीतच टाकणार. मेंगाई देवीच्या मंदीरापाशी आम्ही झाडाखाली थोडा आराम आणि खाऊ पिऊ केल. अमराठी पर्यटकांना किल्ला दाखवणे, त्याचा इतिहास सांगणे हे तर चढाईला सुरुवात केल्यापासुन सुरुच झालेले होते. आता वेळ आली होती ती किल्ल्यावरील वेगवेगळी ठिकाण दाखवण्याची. सगळा गड फिरुन त्यांना दाखवला. आम्ही कोकण दरवाज्या ने उतरुन बुधल्या ला जाऊन आलो. येताना अचानक एक पर्यटकाने आश्चर्याने मला समोरील टेहाळणी बुरुज दाखवीत उत्साहात म्हणाला, “ सर ये तो सही मे हाथी ही है!! वॉव, अनबीलीव्हेबल!!!” असे म्हणत तो ग्रुप मधील सर्वांना त्याला दिसलेला हत्ती दाखवु लागला. आणि ते होते ही खरेच. आमच्या समोर हत्तीच होता. पण हा हत्ती तयार केला होता शिवाजी राजांच्या हरहुन्नरी मावळ्यांनी. एका कातळालाच हत्तीच्या तोंडाचा आकार देण्यात आला आहे. त्या कडे नीट पाहील्यावर समजते की त्या हत्तीच्या तोंडाला कान आणि दात देखील होते. पण आता ते कान आणि दात नीटसे दिसत नव्हते. नीट निरीक्षण केले तरच ते दिसतात. आणखी बारकाईने पाहीले तर समजते की हा दगडाचा डोंगर मुळातच ह्या आकाराचा नव्हता. पण कारागीरांनी आकार पाहुन त्यास हत्तीच्या मुखासारखे केले होते. कातळावर छन्नीचे घाव अजुनही दिसत आहेत. वर ते काही पाच दहा फुट उंचीचे हत्तीचे मुख नव्हते. १०० फुटापेक्षा जास्त उंच असे ते विशाल हत्तीचे मुख. पडलेले कान, दात, कपाळ, डोळे, आणि सोंड अगदी स्पष्ट पणे दिसत आहे. आपण कधी तोरण्यावर गेलाच तर आवर्जुन हे हत्तीमुख पहाच. यास हत्ती माळ असे सध्या म्हणतात. मला असे वाटते की माळ असा नंतरच्या काळात त्या नावाचा अपभ्रंश झाला असेल. ह्या हत्तीमुखाच्या माथ्यावर एक माळा आहे. हत्तीच्या अंबारी च्या समोर, माहुत ज्या ठिकाणी बसतो अगदी त्याच ठिकाणी एक टेहळणी बुरुज आहे. व बाल्कनी/माळा सदृश्य अशा या ठिकाणी पोहोचण्यासाठी देखील वीसेक फुटाचा भुयारी मार्ग आहे. कित्येक वर्षापुर्वी तोरण्यावर आम्ही आलेलो. तेव्हा असा माळ किंवा