आपण आकाशातील चित्तरकथा वाचतोय. या चित्तरकथांचा हेतु वाचकांस आकाशदर्शनामधील काही मुलभुत ग्रह, तारे, तारकासमुह, नक्षत्रे इत्यादी समजावे. कधी आपला निरभ्र, स्वच्छ आकाशाकडे मान वर करुन पाहण्याचा योग आलाच तर या भव्य अवकाशाची भव्यता समजावी व आपला अहंकार गळुन पडावा. विश्वाच्या या न उलगडलेल्या कोड्याच्या प्रेमात आपण पडावे व जगण्यामध्ये प्रत्येक क्षणी आपण सजग असावे. नुकतीच आपण दिवाळी साजरी केली. जमिनीवर फटाक्यांची आतषबाजी पाहिली. आता वेळ आली आहे आकाशातील दिवाळी बघण्याची. आकाशामध्ये होणारी ही दिवाळी आपणास अंतर्मुख करीत असते. या आतिषबाजी दिप्ती इतकी असते की संपुर्ण आकाशामध्ये, दृश्य अर्धगोलाकार आकाशामध्ये सर्वत्र हा प्रकाश सोहळा सुरु असतो. असो. आज आपण आकाशातील चित्तरकथा पाहणार नसुन आकाशातील आतषबाजी कधी होते, कुठे होते याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. कवि राम गणेश गडकरींच्या लोकोत्तर प्रतिभेतुन साकारलेल्या एका कवितेमध्ये त्यांनी आकाशातील या दिवाळीचे वर्णन अतिशय भावविभोर शब्दांमध्ये केले आहे. ता-यांची बरसात उघड्या डोळ्यांनी पाहताना आपल्याअ मनाची अवस्था या कवितेच्या ओळींपेक्षा वेगळी होत नाही. नाचत ना गगनात नाथा ता-यांची बरसात नाथा । आणिक होती माणिक मोती वरतुनी राजस रात नाथा । नाव उलटली नाव हरपली चंदेरी दरियात नाथा । तीही वरची देवाघरची दौलत लोक पाहात नाथा । कविच काय पण जीवन प्रवाहामधील सर्वच स्तरांवरील माणसांना क्षणभर का होईना स्तब्ध आणि अचंबित करणारी घटना म्हणजे आकाशातुन जमिनीवर पडणारा निखळता, तुटता तारा. आठवतय का तुम्हाला कधी तुम्ही शेवटच्या वेळी असा निखळता तारा पाहिला होता? आणि असा तारा पडताना पाहुन आश्चर्यावेशामध्ये तुम्ही तो तारा सोबतच्या कुणाला तरी दाखवण्यासाठी ओरडलात, पण त्या सोबतच्या माणसांनी पाहण्याआधीच तो तारा लुप्त झाला. हो अगदी असेच होत असते प्रत्येकाच्या बाबतीत. आकाशातुन जे काही जमिनीवर म्हणजेच पृथ्वीवर किंवा पृथ्वीकडे पडते आहे असे आपणास वाटते, त्यांना उल्का असे म्हंटले जाते. तुम्हाला कधी एखादीच उल्का पडताना दिसते, तर कधी कधी अनेक उल्का पडत असतात. आधुनिक खगोल शास्त्रींनी या उल्का पडण्याच्या घटनांचे नीट अवलोकन केले आहे व त्यावरुन आपल्या पृथ्वीच्या वातावरणात कोणत्या दिवशी, किती वाजता, कोणत्या गोलार्धामध्ये अंदाजे किती उल्का दर तासाला पडतील या विषयी अंदाज वर्तविले आहेत. एखादे वेळी जर अनेक म्हणजे तासाला ३० पेक्षा जास्त उल्का पडण्याचे अनुमान असेल तर या घटनेस उल्का वर्षाव म्हणतात. व अशा घटना वर्षभरात अनेकदा होत राहतात. महाभारतामध्ये पांडवांच्या स्वर्गारोहनाच्या प्रसंगावेळी युधिष्टीर आणि भीमसेन या दोहोंतील संभाषणामध्ये उल्कावर्षावाचा उल्लेख आलेला आहे. पांडव विरुध्द अश्वथामा युध्दप्रसंगी देखील उल्कापातचा उल्लेख आलेला आहे.  सोबतच वेदव्यासांनी लिहिलेल्या शिव-पुराणामध्ये देखील उल्कावर्षाव तसेच उल्कापात होण्याचा उल्लेख आलेला आहे. उल्का पात म्हणजे आकाराने खुप मोठ्या उल्का की ज्या जमिनीवर आदळतात. उल्कापाता मुळे पृथ्वीवर मोठ मोठे खड्डे देखील पडलेले आपण पाहतो. महाराष्ट्रातील लोणार येथील तळे उल्का पातामुळे झालेले एक नैसर्गिक तळे आहे. तुटणारा तारा पाहत असताना मनातील आपण जी इच्छा करतो ती इच्छा पुर्ण होते असा प्रघात फार पुर्वी पासुन आहे. अगदी ख्रिस्तपुर्व काळापासुन अशाप्रकारचा समज समाजामध्ये, विविध संस्कृत्यांमध्ये रुढ झालेला दिसतो. ग्रीक तत्वज्ञ आणि ज्योतिषी टोलेमीने सांगितल्या प्रमाणे आकाशस्थ देवता ज्यावेळी पृथ्वीशी जोडले जाण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी आकाशामधुन पृथ्वीपर्यंत एक आकाशीय मार्ग तयार होतो. आकाशामध्ये एक पोकळी निर्माण होते व त्यापोकळीतुन देवता पृथ्वीचे संचालन करतात. या पोकळीतुन चुकुन एखादा तारा आला तर तो पोकळीमुळे तुटतो व पृथ्वीकडे झेपावतो. असे तारे तुटताना दिसले की समजावे आकाशातील देवतांचे पृथ्वीशी संबंध अधिक जास्त आहेत. व हेच लक्षण असते की देवता या वेळेत अधिक लक्षपुर्वक पृथ्वीवासीयाकडे पाहतात, त्यांचे ऐकतात व त्यांच्या इच्छा पुर्ण करतात. अर्थात ही केवळ दंतकथा किंवा पुराणकथा आहे. यात काहीही तथ्य नाहीये. उल्का, उल्का वर्षाव व उल्कापात या तीन ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांचे मुळ एकच आहे. उल्कापिंड म्हणजेच उल्का कधी आकाराने अगदी एखाद्या शेंगदाण्याच्या आकाराच्या असु शकतात. इतक्या लहान आकाराच्या उल्का जेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने खेचल्या जातात तेव्हा त्यांचे वातावरणाशी जोरदार घर्षण होते. या घर्षणाने ती उल्का जळताना दिसते. रात्रीच्या वेळी या जळण्यामुळे आकाशामध्ये अगदी काही निमिषांकरता एक प्रकाशरेषा आपणास दिसते. आणि या रेषेमुळेच आपणास, उघड्या डोळ्यांना समजु शकते की उल्का पडत आहे असे. काही उल्का आकाराने मोठ्या असतात. त्यामुळे त्या जास्त वेळ पर्यंत जळताना दिसतात व आपण ती प्रकाशरेषा अगदी आकाशात खुप उंच सुरु होऊन जमिनीवर अगदी काही मीटर अंतरापर्यंत उमटलेली पाहु शकतो. अर्थातच या प्रकारच्या उल्का देखील जमिनीपर्यंत पोहोचण्याच्या आधीच जळुन भस्म होतात. पण या जळताना जर आपणास पाहण्याची संधी मिळाली तर या प्रकाशरेषेमध्ये अनेक रंग दिसतात. यालाच फायरबॉल म्हणजे आगीचे गोळे असे म्हणतात. आमच्या कॅम्पसाईटच्या परीसरात, डिसेंबर मध्ये होणा-या उल्का वर्षामध्ये असे अनेक आगीचे गोळे विविध रंग छटांमध्ये पहावयास मिळतात.   उल्का म्हणजे नक्की काय? प्रगत प्राचीन भारतीयांना कदाचित उल्का म्हणजे काय आहे याविषयी ज्ञान होते. जेव्हा मोठ्या उल्का म्हणजे अशनी पृथ्वीवर आदळतात तेव्हा पृथ्वीवर आकांडतांडव होते. होत्याचे नव्हते होते. अशाच एका मोठ्या उल्कापातामुळेच पृथ्वीवरील डायनासोर या महाकाय प्राण्याचे अस्तित्व कायमचे नष्ट झाले. २०१४ या वर्षी रशियामध्ये उल्कापात झाला. या उल्कापातामध्ये हजारपेक्षा जास्त लोक जखमी झाले. अनेक गाड्या फुटल्या, इमारती पडल्या. महाभारतामध्ये जेव्हा जेव्हा उल्कापाताचा उल्लेख आला आहे तेव्हा तेव्हा अशाच प्रकारच्या हाहाकारचे वर्णन देखील आले आहे. या विषयाला अनुसरुन प्राचीन भारतीय साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सतराव्या शतकापर्यंत युरोपीय लोकांना उल्का पडणे म्हणजे अपशकुन वाटायचा. कधीतरी एका अभ्यासकाने सिंह राशीतुन होणारा उल्का वर्षाव पाहिला. व त्यास असे वाटले की सिंह राशीमधुन कुणीतरी असे मोठ मोठे दगड पर्वत पृथ्वीकडे फेकत आहे. जणु कुणीतरी पृथ्व्वीवर हल्लाच केला आहे अशा प्रकारचा गैरसमज नव्हे समज युरोपात अगदी सतराव्या शतकापर्यंत होता. अठराव्या शतकामध्ये शास्त्रज्ञांनी विविध निरीक्षणांच्या आधारे काही निष्कर्ष काढले. ज्याप्रमाणे आकाशामध्ये सुर्य, ग्रह आणि इतरही तारे आहेत, त्याच प्रमाणे आकाशामध्ये धुमकेतु देखील असतात. हे धुमकेतु इतर आकाशीय पिंडांच्या तुलनेत जास्त गतिमान असतात. धुमकेतुंची फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार असते. धुमकेतु फिरताना त्याचे मागे असंख्य छोटे छोटे खडे, दगड आणि धुळीचा एक पट्टा तयार होतो. या पट्ट्यास धुमकेतुची शेपटी असे म्हणतात. कधीकधी हे धुमकेतु सुर्याच्या जवळुन जातात. धुमकेतु पुढे निघुन गेल्यानंतर देखील त्याच्या शेपटातील हे खडे म्हणजेच उल्का सुर्याच्या कक्षेत आणि नंतर पृथ्वीच्या कक्षेत ओढले जातात. जोपर्यंत ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये येत नाहीत तोपर्यंत त्यांचा आकार आहे तसाच राहतो. एकदा का ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आले की त्यांची गति पृथ्वीकडे खेचले जाण्याची गति वाढते. जशी गति वाढते तसे पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षणाने त्यांचा आकार लहान लहान होत जातो. घर्षणामुळे त्या जळतात व आपणास आकाशात निखळणारा तारा दिसतो. असे अनेक तारे दिसले किंवा दिसणार असतील त्यास उल्का वर्षाव म्हणतात. उल्का वर्षाव पाहण्यासाठी काय तयारी करावी? उल्का वर्षाव पाहण्यासाठी काही विशेष तयारीची गरज नसते. उघड्या डोळ्यांनी आपण उल्का वर्षाव पाहु शकतो. उल्का काय नुसत्या रात्रीच पडतात असे नाही. दिवसादेखील उल्का पडतात. पण दिवसा सुर्य प्रकाशामुळे आपणास दिसत नाहीत. त्यामुळे रात्री त्यातही चंद्र आकाशामध्ये
‘राजगड एक अविस्मरणीय आणि विस्मयकारक ट्रेक’ 24 मार्च 2012 साली मी आणि माझे कॉलेज मित्र असे 6 जण राजगड ट्रेक प्लॅन केला, ट्रेकिंग चा फारसा काही अनुभव आमच्या पैकी कुणालाही नाही, पण मी स्वतः 2 वर्षांपूर्वी दुसऱ्या मित्रांसोबत राजगड one day return ट्रेक केला होता. त्यावेळी आमच्या ग्रुप मध्ये मोटरसायकल कुणाकडेही नव्हती त्यामुळे ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून आवरून आम्ही स्वारगेट एसटी स्टँड ला जमलो, नेहमीप्रमाणे आमचा मित्र हर्षद ने जो उशीर करायचा तो केलाच, असो. हा ट्रेक मुक्काम करायच्या दृष्टीने प्लॅन केला होता त्यामुळे सर्वांनी भरपुर पाणी, ट्रेक करताना तोंड चालू राहावे म्हणून ‘चखना’, झोपण्यासाठी चटई आणि पांघरूण, आणि सर्वात महत्वाचं रात्रीच्या जेवणासाठी मॅगी ची पाकिटे आणि एक ‘भलं मोठ्ठ’ पातेलं जे भाड्याने घेतलं होतं असा हा सगळा ‘बोरीया बिस्तर’ आम्ही सोबत घेऊन आम्ही निघालो होतो. स्वारगेट ते राजगड एसटी प्रवास आम्ही सर्वांनी गाण्यांच्या भेंड्या वगैरे करत मस्त एन्जॉय केला. गाडी कधी सातारा रोड वरून कात्रज घाटापालिकडे जाऊन हायवेय ला लागली कळलेच नाही. पुढे नसरापूर ओलांडल्यावर गावाकडे आल्याचे लगेच जाणवते, पुणेकरांना शहरापासून एवढ्या जवळ गावाकडील वातावरण आणि निसर्ग अनुभवता येणं हे भाग्य च म्हणावं लागेल. पुढील गावे ओलांडुन गाडी राजगड पायथ्याला आली सुद्धा. आम्ही आमचा सगळं गाश्या उचलून पायथ्याशी आलो, तिथे हॉटेल मध्ये पोटभरून नाश्ता केला, थोडा वेळ गप्पा मारून आम्ही आता चढण्याच्या तयारीतच होतो तेवढ्यात एकाला पोटाचा त्रास सुरू झाला. आम्ही सगळे त्याला म्हणू लागलो की चांगला मुहूर्त बघून पोट बिघडले. आधीच उशीर झाला होता, ट्रेक तर करायचा होता आणि त्याला एकटा सोडून पुढे जाणे शक्य नव्हते. मग थोडा वेळ तिथे थांबलो, त्यात मग त्याची टिंगल उडवणे, हश्या, त्या अवस्थेत त्याचे फोटो काढणे असे सगळे करमणुकीचे प्रकार झाले आणि मग त्याचा सगळा कार्यक्रम आटोपून एकदाची चढायला सुरुवात केली. राजगड खूप मोठा आहे आणि ट्रेक देखील अवघड आहे उगाच नाही त्याला गडांचा राजा म्हंटल जात! ट्रेकिंग चा सराव आम्हाला नसल्या मुळे दम लागणे साहजिकच होते, आम्ही खूप हळू हळू, थांबत थांबत चढत होतो, आमच्या सोबत असलेल्या सामानाचा बोझ्या पण भरपूर होता त्यात ते पातेलं. भरपूर पाणी पीत होतो, हळू हळू पाणी सपंत होतं, त्यामुळे एकमेकांना सूचना देत होतो की पाणी कमी प्या कारण वर मुक्काम करायचा आहे आणि उद्या पर्यंत पाणी पुरायला हवे. चढत असताना वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळत होत्या विविध प्रकारचे पक्षी, कीटक, मुंग्यांची वारुळे आणि वारुळाचा एक वेगळा प्रकार ज्याला ‘गडमुंगी’ असे म्हणतात तो सुद्धा पाहायला मिळाला, याचे नाव आधी माहीत नव्हते, अलीकडेच हेमंत कडून कळाले. माकडे सुद्धा बरीच होती त्यांची भीती सुद्धा वाटत होती. माझ्याकडे Bushnell ची 10×25 Binocular होती, यातील 10 म्हणजे त्या दुर्बिणीची पॉवर म्हणजे त्यातून एखादी गोष्ट किती पट मोठी दिसनार हे कळते आणि 25 म्हणजे त्या दुर्बिणीच्या पुढील भिंग किती व्यासाचे आहे हे कळते, भिंगाचा व्यास जेवढा मोठा तेवढी त्यातून दिसणारी प्रतिमा प्रखर किंवा तेजस्वी दिसते. ही दुर्बीण सुद्धा मित्राकडून बॉरोव केली होती, चढत असताना खालील गावे, दुरवरील डोंगर, राजगड चा कडा या सर्व गोष्टी खूप जवळ दिसत होत्या. असे करता करता आम्ही बऱ्याच वर येऊन पोहोचलो, चढायला सुरुवात करून दीड तासापेक्षा जास्त वेळ झाला होता तरी सुद्धा अजून निम्म्याहून जास्त चढणे बाकी होते. आम्ही खूप दमलो होतो. मग आम्ही एके ठिकाणी झाडाची सावली बघून थांबलो. सगळ्यांना भूक लागली होती मग तिथेच आम्ही एकत्र बसून घरून आणलेला डबा खाल्ला, आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. विश्रांती झाल्यावर सगळ्यांना एकदम फ्रेश वाटले, आणि एका नवीन जोश मध्ये सर्वांनी पुन्हा चढायला सुरुवात केली. चढताना माझ्या Sony च्या Walkman W580 फोन मधून फोटो घेणे चालूच होते. अस करत करत आम्ही जवळ जवळ साडेतीन ते चार तासांनंतर चोरदरवजा ला एकदाचे पोचलो. एवढ्या प्रचंड चढाई केल्यानंतर सगळे थकले होते पण जेव्हा चोर दरवाजातून आत शिरलो तेव्हा सगळा थकवा जणू अचानक गायब च झाला. आपण एवढ्या उंच गडावर चढून वर आलो यावर विश्वास च बसत नव्हता. आम्ही तेथील कठड्यावर थोडा वेळ बसून आराम केला. त्यांनतर पुढे थोडा किल्ला चढला की तिथे मोठे पद्मावती तळे आहे. तिथेच वर एक मंदिर आहे तिथे आम्ही आमचा बस्तान मांडलं. तिथे कौलारू बांधकाम आहे त्याच्या पुढे व्हरांडा आहे, बसायला जागा आहे, तेथून खालील तळ्याचा छान view मिळतो, तिथे आम्ही आराम केला. तिथे बसल्यावर असं वाटत होतं की आपलंच स्वतः च घर आहे. आराम झाल्यावर आम्ही रात्रीच्या तयारीला लागलो. सर्वप्रथम आग पेटवण्या साठी सरपण हवं होतं. सगळे चारी दिशांना पसरलो लाकडं, वाळलेलं गवत हे गोळा करत असताना आम्हाला गुरांचे वाळलेलं शेण सुद्धा सापडत होत ते आम्ही गोवऱ्या मानून गोळा केलं. काही ठिकाणी इतर प्राण्यांच्या वाळलेल्या विष्ठा सुद्धा होत्या त्या सुद्धा आम्ही गोळा केल्या ते नेमकं काय होत हे नंतर आम्हाला कळलं जाऊदे त्याबद्दल न बोललेलं च बरं, असो. अंधार पडायच्या आधी आग पेटवायची होती नंतर धावपळ नको. शेणाच्या गोवऱ्या आणि वाळलेलं ‘ते’ जे काही होत ते यांच्यामुळे आग लवकर पेटली. मग आम्ही त्यात मोठ्या लकडाचे तुकडे टाकले, तोपर्यंत अंधार पडला होता. त्यावर मग आम्ही सोबत आणलेलं ते भव्य पातेलं ठेवलं आणि त्यात आमच्या जवळील पिण्याचे पाणी ओतून मॅगीची पाकिटे फोडून टाकली. सतीश ने बनवायचा task हाती घेतला होता, मग मेणबत्तीच्या प्रकाशात आणि पातेल्यामध्ये टॉर्च दाखवत कशीबशी एकदाची पातेलंभरुन मॅगी तयार झाली. सगळ्यांनी मॅगीचा आस्वाद घेतला, पण मला काही ती मॅगी आवडली नाही, काही केल्या ती माझ्या घशाखाली उतरत नव्हती. कारण मी मॅगीच्या बापतीत खूप perticular आहे. पण काय करणार, दुसरा काही पर्याय नव्हता, अश्या ठिकाणी जिभेचे चोचले पुरवले जात नाहीत, जे समोर येईल ते गपचूप खावं लागतं. सर्वांचं मॅगीवजा जेवण झाल्यावरही आग तशीच चालू होती, रात्री शेकण्यासाठी आम्ही त्यात अजून लाकडे टाकली. असा सगळा कार्यक्रम उरकल्यावर आम्ही जरा निवांत झालो. आमच्या गप्पा चालू होत्या. संध्याकाळचे आठ वाजले असावेत सहज वर लक्ष गेलं पूर्ण आकाश हजारो चांदण्यांनी गच्च भरलं होतं एवढे तारे मी आज पर्यंत आयुष्यात कधीच बघितले नव्हते आणि आजही राजगड सारखं आकाश मी दुसरीकडे कुठेही पाहिलं नाही. पश्चिमेकडे चंद्रकोर क्षितिजाला स्पर्श करत होती त्याच्यावर गुरु मावळण्याच्या बेतात होता त्याच्यावर मृगनक्षत्र ठळक दिसत होते, पूर्वेकडे लालसर तांबूस मंगळ उगवलेला दिसत होता. त्यावेळी मला ही अक्षरं आमची एवढी माहिती नव्हती फक्त मृग नक्षत्र आणि सप्तर्षी सोडले तर मला दुसरं कुठलंही नक्षत्र माहित नव्हतं. वरील नावे मी नंतर स्टार चार्ट बघून शोधून काढली आणि आपल्याला त्या दिवशी आकाशात काय काय दिसत होतं याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. मला राजगड ट्रेक अविस्मरणीय वाटण्याचे खरं कारण तेव्हा बघितलेलं तार्यांनी भरलेलं गच्च आकाश या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. त्या रात्री मी माझ्याकडे असलेल्या छोट्या दुर्बिणीने बघण्याचा प्रयत्न केला पण त्यातून मला काही दिसले नाही कारण तेव्हा मला आकाश निरीक्षणा बद्दल
“हरी अनंत हरी कथा अनंत“ हे हिंदी भक्तिगीत आपण ऐकले असेलच. हरी म्हणजे तो जगन्नियंता. तो सर्वव्यापक, सर्वशक्तिमान की ज्याच्या कल्पनेने हे विश्व जन्माला आले आहे. किंवा हे विश्व म्हणजे ज्याची नुसती लीला आहे. या ब्रह्माम्डाचा पसारा किती असेल तर अनंत आहे. हे ब्रह्मांड अनंत आहे. त्यास आदी नाही की त्यास अंत ही नाही. आपण आपल्या इंद्रीयाच्या मदतीने या विश्वाचे, ब्रह्माम्डाचे आकलन करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण हे ब्रह्मांड नुसते अनादी , अनंत नसुन ते आपल्या इंद्रीयांस अगोचर, अगम्य देखील आहे. तरीदेखील मनुष्याने अगदी प्राचीन काळापासुन या ब्रह्माम्डाचा शोध बाहेर घेण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न केले. या प्रयत्न आपणास बहुतांश यश देखील मिळाले आहे. तरीदेखील आज आपण जेवढे जाणतो ते खुपच तोकडे आहे.या आकाशाविषयी जलद गतीने अभ्यास मागच्या दोन तीन शतकांमध्ये झाला असे अनेकदा म्हंटले जाते. पण हे सत्य नाहीये. आकाश किती व्यापक आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचे वर्तन काय आहे या विषयी खुप खोलवर अभ्यास भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासुन सुरु आहे. ज्ञात लिखित उपलब्ध ग्रंथसंपदेवरुन असे समजते की भास्कराचार्य पहिले व दुसरे यांनी खगोल शास्त्रावर विपुल लिखाण केले. त्यांच्या अनेक सिध्दांताचा आधार वेद वेदांतच होते. वराहमिहिर, आर्यभट हे मागील सहस्त्राकातील अभ्यासक देखील खुप मोलाचे कार्य करुन गेले. तेच काय तर अगदी आपल्या मराठी संत साहित्यामध्ये देखील अंतरीक्ष, म्हणजे आकाशाचे सर्रास वर्णन पहावयास मिळते. उदाहरण दाखल इथे ज्ञानेश्वर माऊलींच्या काही ओव्या देत आहे ज्यामध्ये त्यांनी आकाशाच्या मुलभुत गुणधर्माविषयी सांगितले आहे. आकाश कसे आहे हे माहित असल्याशिवाय त्याचे संदर्भ किंवा उपमा ते वापरु शकले नसते. इतकेच काय तर सामान्य जीवनातील समस्या किंवा  समाधान या विषयी बोलताना त्यांनी आकाशाचे संदर्भ दिले आहेत. याचा अर्थ माऊलींच्या श्रोत्यांना देखील आकाशाविषयी व त्याच्या स्वभावाविषयी ज्ञान होतेच. सातवा अध्याय योगमायेचे पडद्यामुळे । ते झाले असती आंधळे । म्हणोनि प्रकाशाचेही बळें । न देखती मज ॥१५८॥एरवी मी नाही । ऐसे कवण वस्तुजात, पाही । कवण जळ रसविरहित राही । सांग अगा, ॥१५९॥पवन कोण न शिवे? । आकाश कोठे न समावे? । हे असो, एक मीचि आघवे । विश्वीं असे ॥१६०॥ बारावा अध्याय वन्हिची ज्वाला जैसी । वायां जाये  आकासिं । क्रिया जिरों दे तैसी । शून्यामाजि ॥३२ ॥ व्यापक आणि उदास  । जैसें हें आकाश  । तैसें जेयाचें  मानस । सर्वगत  ॥ १८०  ॥ जो निंदेतें नेघे। स्तुतितें न श्लाघे । आकाशा न लगे । लेपु जैसा ॥ ६ ॥ हे आकाश कसे आहे? तर ते अनादी आहे! अनंत आहे! अनंत शब्दाचा अर्थ स्पष्ट आहे. ज्याला अंत नाही असे , ते अनंत. त्या सोबतच ज्याची सुरुवात आपणास माहित नाही ते म्हणजे अनादी. आपण पुर्वीपासुन अनादी व अनंत हे शब्द ऐकत आलो आहे. स्वा. सावरकरांची अजरामर कविता “अनादी मी अनंत मी” तर आपल्या सारख्या करोडो मराठी भाषिकांच्या मनावर कायमची कोरली गेली आहे. एकीकडे या ब्रह्मांडाची व्यापकता, ब्रह्मांडाची विस्तार पाहिला की आपणास आपल्या या क्षुद्र मन,अहंकार, बुध्दी जनित स्वःत ची किव आल्यावाचुन राहत नाही. तर दुसरीकडे सावरकरांसारख्या लोकोत्तर माणसाने स्वःतविषयी अर्थातच या समस्त मानवजाती विषयीच एवढे धाडसी विधान करणे हे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजु असल्यासारखी ही दोन विधाने आहेत. आकाश अनंत त्यात आकाशगंगा अनंत, प्रत्येक आकाशगंगेमध्ये तारे (आपल्या सुर्यासारखे) अनंत, आणि ता-यांभोवती फिरणारे ग्रहगोल देखील अनंत. आधुनिक खगोलशास्त्राने (हबल दुर्बिणीच्या मदतीने) या विश्वातील (ब्रह्मांडातील) विविध आकाशगंगांचे निरीक्षण केले. या निरीक्षणात मनुष्यालाअ असे समजले की या ब्रह्मांडामध्ये २०० अब्ज आकाशगंगा आहेत. एक अब्ज म्हणजे १,००,००,००,०००  एवढी मोठी संख्या आहे. दोनशे अब्ज म्हणजे २००,००,००,००,००० म्हणजे २ या संख्येवर ११ शुन्य. २०० अब्ज आकाशगंगा या अशा आहेत की ज्या आपणास माहित आहेत. त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त आकाशगंगा ब्रह्मांडामध्ये असण्याची शक्यता आहे. म्हणजे आपली आकाशगंगा सोडली तर किंवा आपली आकाशगंगा विनाश पावली तरी ब्रह्मांडामध्ये १९९९९९९९९९९९ इतक्या आकाशगंगा शिल्लक राहतील. ब्रह्मांडाच्या चलन वलनावर फारसा परिणाम होणार नाही. हबल डीप फिल्ड दुर्बिणीतुन आपण जेवढे पाहु शकलो, तेवढेच हे ब्रह्मांड आहे का? तर याचे उत्तर “कदाचित नाही” असे आहे. हबल ची पाहु शकण्याची क्षमता तेवढी आहे. या क्षमतेच्या पलीकडे असणारे ब्रह्मांड आपण कसे पाहु शकणार? यासाठीच पुढील खुपच महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याचे नाव आहे जेम्स वेब्ब दुर्बिण. वेब्ब दुर्बिणी इन्फ्रा रेड किरणांच्या मदतीने, अनंत आकाशाच्या शक्य तितक्या दुरवर असलेल्या आकाशगंगा, तारे पाहण्याचे काम करणार आहे. वेब्ब दुर्बिणीविषयी अधिक माहिती करुन घेण्यासाठी खालील व्हिडीयो अवश्य पहा. आता आपण आकाशगंगा म्हणजे नेमके काय हे पाहुयात. आकाशगंगा म्हणजे असंख्य अशा ता-यांचा समुह. या समुहातील तारे एका विशिष्ट गतीने व विशिष्ट कक्षेमध्ये, एका विशिष्ट केंद्राभोवती सद सर्वदा भ्रमण करीत असतात. आकाशगंगेचा विस्तार खुपच मोठा असतो. माणसास ज्ञात असलेल्या आकाशगंगापैंकी सर्वात जवळची व आपण (म्हणजे आपली सौरमाला) ज्या आकाशगंगेमध्ये आहोत तिला दुग्ध मेखला किंवा नुसतेच आकाशगंगा असे म्हंटले जाते. आपल्या या दुग्धमेखले मध्ये म्हणजेच आकाशगंगेमध्ये किती तारे आहेत? तर एक प्राथमिक अंदाज याचे उत्तर २०० अब्ज तारे असे देतो. पुन्हा एकदा वर दोनशे अब्ज म्हणजे नक्की किती वाचा. आपल्या दुग्धमेखला या आकाशगंगेचे आमच्या कॅम्पसाईट वरुन केलेले चित्रण वर आहे यापुढे आता आपण पाहुयात सुर्य म्हणजे काय ते. सुर्य म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन वर सांगितलेल्या, आपल्या आकाशगंगेतील २०० अब्ज ता-यांपैकी एक साधारण असा तारा आहे. म्हणजे आपला सुर्य सोडला तर किंवा आपला सुर्य विनाश पावला तरी आकाशगंगेमध्ये १९९९९९९९९९९९ इतके तारे शिल्लक राहतील. आकाशगंगेच्या परिचलनावर आपल्या सौरमालेच्या असण्याने किंवा नसण्याने फार काही फरक पडणार नाही. सुमारे पाच पैकी एका सूर्याएवढ्या आकाराच्या ताऱ्याभोवती पृथ्वीएवढ्या आकाराचा परग्रह त्या ताऱ्याच्या वास्तव्य योग्य क्षेत्रामध्ये परिभ्रमण करतो असा अंदाज लावला जातो. म्हणजे आकाशगंगेमध्ये २०० अब्ज तारे आहेत असे मानले, तर असा अंदाज लावता येतो की, आकाशगंगेमध्ये पृथ्वीएवढ्या आकाराचे संभाव्य वास्तव्य योग्य ११ अब्ज ग्रह आहेत. वर सांगितलेली सर्व माहिती नीट समजण्यासाठी खालील व्हिडीयो अवश्य पहा. हे वर जे काही आकडे मी लिहिले आहेत ते सर्व त्या अनंतातील अगदी क्षुद्र आकडे असण्याची शक्यता आहे. ज्ञात ब्रह्मांड एवढे मोठे आहे की आपण त्याची कल्पना देखील करु शकत नाही तर अज्ञात ब्रह्मांड केवढे असेल आणि किती विस्तीर्ण असेल, किंवा अद्याप आपणास जे प्रश्न पडले देखील नाहीत अशा प्रश्नांची उत्तरे देखील या अज्ञात ब्रह्मांडामध्ये दडली असण्याची शक्यता आहे. तर हे अनादी अनंत आकाश की जे सर्वत्र आहे, दुरवरच्या आकाशगंगांमध्ये ही आहे व  अगदी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी पेशीत देखील आहे, त्याच आकाशाचा शोध घेण्याची मानवी मनाची हौस कधी पुर्ण होईल की नाही? यापुढील माझ्या लेखांमध्ये वाचा, आकाशातील विविध चित्तरकथांच्या मालिकेतील धनुर्धराची कथा, पुढील आठवड्यात. धन्यवाद आपला हेमंत सिताराम ववले निसर्गशाळा, पुणे     फ्लेमिंगोस मराठी मध्ये रोहित किंवा हंसक असेही म्हणतात रोहित पक्ष्यांच्या अदभुत दुनियेविषयी माहिती करुन घेण्यासाठी इथे क्लिक करा. Upcoming events 19 April 2024 Adventure Camp Kids Event Huppya
बाहेर आल्यावर त्यांना आकाशात शहराच्या वर, अगदी माथ्यावर एक मोठा ढग दिसला. त्यात विविध रंग होते. काहीजणांना तो ढग एखादे परग्रह वासीयांचे यान आहे अस वाटुन शेकडो लोकांनी हेल्प लाईन ला फोन करुन पृथ्वीवर परग्रहवासीयांनी आक्रमण केले असल्याचे सांगितले व तात्काळ मदत मागितली. असे शेकडो फोन/तक्रारी आल्याने परग्रहांचा अभ्यास करणा-या मंडळींशी संपर्क साधला गेला.
A very wonderful astronomical event is on its way this week. This is the Full moon of Chaitra month of Indian Calender. We call it, Chaitra Poornima.