पिसोरी – सह्याद्रीतील माणसापेक्षाही जुना-जाणता प्राणी दोन मे ते पाच मे असे एक लहान मुला-मुलींचे निसर्गशिबिर निसर्गशाळा येथे होणार होते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची खरेदी करुन मी एक मे रोजी पुण्यातुन वेल्ह्यात निसर्गशाळा येथे रात्री उशीरा जाण्यासाठी शहराच्या बाहेर पडलो. पाबे घाट ओलांडुन, वेल्हे गावाच्याही पुढे जाऊन, भट्टी खिंडीत हळु हळु गाडी पुढे सरकत होती. रात्रीचे अकरा वाजले असतील. सर्वत्र काळॉख होता, ढंगाची हजेरी होतीच. त्या खिंडीतुन थोडं पुढे आल्यावर ढगांच येण खुपच वाढलं. ते ढग आणि तो काळोखाला चिरणारा गाडीच्या हेडलाईट्स चा प्रकाश आणि त्या प्रकाशासोबत पुढे पुढे सरकणारी गाडी, गाडीत मी. अचानक गाडीसमोर रस्त्याच्या डाव्या बाजुने दोन ते तीन उड्यांमध्येच एक भला मोठा उंदीर की काय आडवा गेला. आकार अगदी उंदरासारखाच. तीन चार क्षणांचाच काय तो अवधी मिळाला असेल त्याला पाहण्याचा, पण इतक्या कमी वेळात देखील त्याची छवी कायमची मनःपटलावर उमटली. अंगावर ठिपके, पुढील पायाकडुन मागील पायांकडे जाणा-या ठिपक्यांच्या दोन तीन रांगा, मध्ये पोटाच्या भागावर रुंद होत्या, त्यातील अंतर वाढलेले होते तर मागील पायापर्यंत येईस्तोवर पुन्हा त्या रेषांमधील अंतर पुढील पायांप्रमाणेच कमी झालेले. इतक्या कमी वेळात नीट पहायला मिळणे हे देखील औघड असते तर फोटो काढणे महाकठीण काम. पुढील चार पाच दिवस मी कॅंप मध्येच व्यस्त होतो. नंतर जस वेळ मिळेल तस या प्राण्याबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.   मिळालेली माहिती अवाक करणारी आणि आनंद देणारी देखील होती. आनंद यासाठी की आपल्या वेल्हे तालुक्यात अजुनही हे दुर्मिळ होत असलेले जीव वास्तव्यास आहेत. कदाचित वेल्हे तालुक्यात हा जीव आढळल्याची ही पहिलीच नोंद असावी. यापुर्वी मी साळींदर, काळींदर, भेकर, ठिपकेदार हरीण, तरस, घोरपड, रानडुक्करं असे प्राणी अनेकदा निसर्गशाळा परिसरात पाहिले आहेत. पण याचे दर्शन पहिल्यांदाच झाले. आधुनिक जैव इतिहासाच्या अभ्यासातुन आपणास असे समजते की मनुष्यप्राण्याचा वावर या पृथ्वीतलावर साधारण ७० लक्ष वर्षांपासुन आहे, उत्क्रांतीवाद म्हणतो की काळाच्या ओघात मनुष्याची उत्क्रांती होत गेली व चार पायांच्या माणसापासुन आजपर्यंत दोन पायांवर चालणारा , ताठ उभा राहणार संपुर्ण विकसीत मनुष्य बनला आहे. मनुष्य किंवा त्याचे पुर्वज या पृथ्वीतलावर नांदताहेत त्या काळापेक्षा पाचपट काळ पृथ्वीतलावर नांदणारा एक भलताच लाजरा बुजरा जीव म्हणजे पिसोरी होय. पिसोरी हे नाव आपल्या म्हणजे सह्याद्रीत वास्तव्यास असणा-या, आपल्या पुर्वजांनी या प्राण्याला दिले आहे. कोण जाणे हे नाव कित्येक हजारो वर्षे वापरात असेल. जैवविविधतेचा अभ्यास करणा-या पश्चिमेकडील अभ्यासकांनी याचे इंग्रजी नामकरण करण्यापुर्वीपासुन आपण म्हणजे सह्याद्रीतील मावळे या प्राण्याला ओळखत आहोत. हा जीव पृथ्वीवर अंदाजे साडे तीन करोड वर्षांपासुन अस्तित्वात आहे. म्हणजे जैव उत्क्रांतीमध्ये या प्राण्याचा अनुभव माणसापेक्षा नक्कीच अधिक असल्यानेच तो इतके वर्षे टिकुन आहे. सामान्य इंग्रजीमध्ये यास Mouse Deer म्हणतात तर जीवशास्त्राच्या भाषेत यास Spotted Indian Chevrotain असे म्हणतात. Spotted म्हणजे यावर ठिपके ठिपके असतात. माउस डियर का तर उंदरासारखा आकार आहे म्हणुन. शेपटी अगदी छोटी असते तर शरीर दोन्ही बाजुंना निमुळते असते. तोंड देखील उंदरासारखेच असते तर कान गोलाकार पण त्याच प्रमाणात एखाद्या मोठ्या उंदराला (घुस नाही) शोभावेत असे असतात. हा जीव रात्रीच काय तो बाहेर पडतो. बाहेर पडतो याचा अर्थ तो उघड्या माळरानांवर क्वचितच येतो, शक्यतो तो घनदाट जंगलांमध्येच वावरतो. दिवसभर स्वतःचे रक्षण करण्यासाठी गर्द झाडीखाली छोटीशी गुहा देखील हा प्राणी करतो. याचे पुढील पाय जमीन खोदण्यासाठीच बनलेले आहेत. हा खुप वेगाने धावु शकत नाही तसेच खुप जास्त अंतर देखील धावु शकत नाही. निसर्गात गरुड, अजगर, घोरपड पिसोरीची शिकार करतात, म्हणुनच पिसोरीने गर्द झाडाझुडपांमध्येच वास्तव्य करतो. वटवाघळासारखेच याचेही डोळे असतात. सह्याद्रीमध्ये पिसोरी/पिसुरी म्हणजेच उंदीरमुखी हरीण प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डोंगर, डोंगर उतार यांचे सपाटीकरण, स्थानिक झाडझुडपं नष्ट करणे, सर्रास लावले जाणारे वणवे ही पिसोरीच्या जीवावर उठणारी काही कामे मनुष्य सातत्याने करतो आहे.पिसोरी आणि इतर सर्वच जीव आपलेच सहोदर आहेत. आपण त्यांचे अधिवास नष्ट केले तर त्यांनी जायचे कुठे? आपण फार्म हाऊस प्लॉटींग बनविण्यासाठी, रिसॉर्ट बांधण्यासाठी, फार्म हाऊस बांधण्यासाठी येथील भुगोल बदलतो आहोत, येथील वनस्पती वैविध्य नष्ट करतो आहोत, येथील जैव विविधतेला धोका निर्माण करतो आहोत. वेल्हे तालुका अजुनही निसर्गसंपन्न आहे असे वाटत जरी असले तरी खुप वेगाने येथील निसर्ग माणुस नष्ट करतो आहे. माणसाने हे असेच सुरु ठेवले तर वेल्हे देखील लोणावळा, खंडाळ्यासारखं बकाल होईल. स्थानिक तरुणांनी हे सर्व समजुन घेतले पाहिजे, पुढिल पिढ्यांकडुन उसना घेतलेला आहे आपण निसर्ग, तो त्यांना आपण आहे तसाच किंबहुन अधिक समृध्द करुन दिला पाहिजे. डोंगर फोडणा-यांना थांबविले पाहिजे, स्थानिक झाडझुडपं काढुन, शहरीतील लॉन लावणा-यांना जाब विचारले पाहिजेत? की या मातीत राहणा-या करोडो जीवजंतु सरीसृपांनी, पिसोरी सारख्या प्राण्यांनी जायचं कुठे? डोंगरांवर मातीच राहिली नाही तर डोंगर तरी राहतील का? जंगलं बहरतील का? पाऊस तरी शतकांच्या नेमाने पडेल का? आपला सह्याद्री म्हणजे अर्ध्या भारताच्या पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे. तो टिकला पाहिजे. © हेमंत ववले, निसर्गशाळा, पुणे
महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली.
म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत.
पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते.
पर्यावरण पुरक वस्तु की जीवन? इकोफ्रेंडली हा शब्द आजकाल परवलीचा शब्द झाला आहे म्हणजे आजकाल आपण पाहतोय कित्येक उत्पादीत वस्तुंना, अन्न पदार्थांना इकोफ्रेंडली हा टॅग किंवा विशेषण लावले जात आहे. हल्ली वस्तु पर्यावरण पुरक बनत आहेत. हे खुप चांगले आहे. पण काय तुम्हाला माहिती आहे का निव्वळ वस्तु पर्यावरण पुरक बनवुन भागेल अशी वेळ आता नाही राहिलेली. आता वेळ आली आहे कुटूंबे पर्यावरण पुरक बनण्याची. उभे जीवनच पर्यावरण पुरक बनण्याची व बनविण्याची. थोड नवीनच वाटतय ना? आणि थोडं कठीण किंवा काहींना तर अशक्य देखील वाटत असावं. चला तर मग आज आपण भेटुयात पर्यावरण पुरक जीवन ते देखील शहरी जीवन जगण्याचा मनापासुन प्रयत्न करणा-या एका गृहिणीला. ही गृहीणी माता आहे, पत्नी आहे आणि विशेष म्हणजे ती कुशल व्यावसायिक देखील आहे. कदाचित काहीशे वर्षांपुर्वी अथवा हजारेक वर्षांपुर्वी भारतात राहणारे प्रत्येक ग्राम अथवा नगरवासी कुटूंब आणि कुटूंबातील प्रत्येक सदस्याचे जीवन पर्यावरण पुरकच असेल. त्याकाळात पर्यावरण तज्ञ नसतीलच बहुधा तरीही प्रत्येक घर पर्यावरणाला पुरक असे जीवन जगत असेल. हे इतके ठामपणे सांगता येऊ शकते कारण अश्या पर्यावरण पुरक जीवनाची काही लक्षणे अजुनही खुप दुर्गम भागात असणा-या वाड्या / पाड्यांमध्ये दिसतेच. आधुनिक काळात खरेच असे पर्यावरण पुरक जीवन जगता येऊ शकते का? पण आधुनिक काळात खरेच असे पर्यावरण पुरक जीवन जगता येऊ शकते का? आणि जर शक्य असेल तर असे कुणी खरच केलं आहे का? करीत आहे का? भारतात आणि जगात देखील आज अशी अनेक उदाहरणे आहेत, कुटूंबे आहेत की ज्यांनी शहरी जीवन सोडुन गावखेड्यांकडे जाणे निवडले आहे. निसर्गाशी मिळते जुळते घेऊन, गरजा कमी कमी करीत, कधी कधी स्वतःचे अन्न स्वतः पिकवुन, अशी मंडळी स्वतःचे आयुष्य सुखाचे करीत आहेत. अनेक वर्षे शहरी जीवनाची सवय असताना निसर्गात जाऊन राहणे, तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेणे, अनेक अडचणींना तोंड देणे, त्यांवर मात करणे हे खुपच जिकिरीचे आणि जिद्दीचे काम आहे. कदाचित सर्वांना हे जमणार नाही, जमतदेखील नाही. बरोबर ना? सामान्य की असामान्य? महात्मा गांधी असो वा बाबा आमटे असो यांना ते जमले, त्यांनी केले, आजही अनेक जण आहेत की जे असे करीत आहेत. पण झाली असामान्य व्यक्तिमत्व असलेली माणसे. अश्या एकेका माणसाच्या असामान्य कर्तृत्व मोठे आहे यात शंका नाहीच. पण अश्या एकेका माणसाच्या मोठ्या कर्तृत्वापेक्षा आजच्या काळात जास्त गरज आहे ती म्हणजे सामान्य माणच्या छोट्या छोट्या गोष्टींची. या गोष्टी छोट्या छोट्या असल्या तरीही सामान्य माणसांच्या सहज आवाक्यातील असल्याने एकुण परिणाम एका महान व्यक्तिच्या कर्तृत्वापेक्षा खुप मोठा, खुप परिणामकारक आणि दिर्घकाळ टिकणारा असु शकेल. व्यक्तिरेखा – सौ शीतल तळेकर कदाचित हीच गोष्ट समजली , उमजली असेल आपल्या आजच्या लेखातील सामान्य असुनही असामान्य ध्येय उराशी बाळगलेल्या , पुणे शहरात राहणा-या एका गृहीणीला. त्यांचे नाव आहे सौ शीतल तळेकर. कोविड-१९ आणि त्यामुळे जगात उडालेली धांदल, मृत्युचे तांडव , लॉकडाऊन हे सारे आपल्या सर्वांच्या आयुष्यात इतके अचानक आले की त्यावेळी कित्येकांना सावरता आलेच नाही. एक दिवस असा येईल की आपण आपल्याच घरात बंदीवासात राहु अशी कल्पना कुणी स्वप्नात देखील केली नसेल. कोविड१९ ने आपले जग अक्षरशः उलटे पालटे केले, आपले जगणे बदलुन टाकले, आपलं हसणं, रडणं देखील बदलल. आप्तेष्टांच्या अचानक जाण्याचे अनेकांच्या पायाखालील जमीन सरकली ती अजुनही तशीच आहे. कित्येक जण जीवन आणि मृत्युच्या सीमारेषेपर्यंत जाऊन आले. अनेकांनी त्याही काळात मनुष्यातील दानव पाहिला आणि अनेकांनी मनुष्यातील देवत्व देखील अनुभवले. कित्येकांना या जीवनाची क्षणभंगुरता तात्काळ लक्षात आली आणि कित्येकांना मनुष्याची अगतिकता समजली. कुणी काय तर कुणी काय असे अनेकविध अनुभव सर्वांनीच घेतले. पहिल्याच लॉकडाऊन मध्ये जेव्हा अनेकजण लॉकडाऊन डायरीच्या हॅशटॅग खाली सोशल मीडीयवर पोस्ट लिहित होते तेव्हा शीतल वेगळ्याच विचारात होती. टीव्ही वर बातम्या येत होत्या की लॉकडाऊन मुळे प्रदुषण कमी झाले, शेदोनशे किमी अंतरावरुन हिमशिखरे दिसु लागली इत्यादी तेव्हा शीतल खोल विचारात होती की मनुष्याने उभे केलेले हे कार्यकलाप, हे व्यापार, हे औद्योगिकीकरण, हा चंगळवाद, हा भौतिक उपभोक्तावाद, वापरा आणि फेका संस्कृती हे सारेच खरतर कारणीभुत आहे मनुष्याच्या जीवनाचा एकुणच दर्ज्या खालावण्यासाठी. मनुष्याचे जीवन उन्नत होण्याऐवजी या सा-यांमुळे मनुष्याचेच जीवन सुमार आणि निकृष्ट होत चालले आहे. याला म्हणतात रीयलायझेशन म्हणजेच उपरती, अनुभूती! अशी उपरती अनेकांच होत असते, लॉकडाऊन च्या काळात देखील झाली, त्यापुर्वीही व्हायची , आत्ताही होत असेलच. पण शीतलचे वेगळेपण हे आहे की शीतल तात्काळ या उपरतीप्रमाणे काम करण्याचा, जीवन जगण्याचा संकल्पच नुसता केला नाही तर त्यासाठीचा मार्ग देखील ठरवला. शीतल आणि तिचे कुटूंब पुणे शहरातील उच्चभ्रु उपनगरात वास्तव्यास आहेत. पती एका कॉर्पोरेट मध्ये मॅनेजर आहेत तर दोन मुली शालेय शिक्षण घेत आहेत. मोठी सहाव्या इयत्तेत शिकते तर धाकटी पहिल्या इयत्तेत. लॉकडाऊन सुरु असताना अनेकजण विविध टास्क करुन सोशल मीडीयवर पोस्ट करीत होते तेव्हा शीतल याच सोशल मीडीयावर इको-लिव्हिंग विषयी माहिती घेण्यात व्यस्त होती. अनेक ऑनलाईन कम्युनिटीज ती सदस्य बनली, अनेक डॉक्युमेंटरीज तिने पाहिल्या. इथुन पुढे एकेक वस्तुच इकोफ्रेंडली घेण्यापुरते आपले पर्यावरण प्रेम न ठेवता आपल जगणच, आपलं जीवनच हळुहळू इको-फ्रेंडली कसे करता येईल यासाठी विचार करण्यास तिने सुरुवात केली. प्रॉब्लेम स्टेटमेंट अनेक पर्यावरण प्रेमी, तज्ञ लोक व्याख्यानात औद्योगिकरणास दोष देतात निसर्गाच्या –हासाला पण हे औद्योगिकरण अनेकांच्या आयुष्यातुन काही कमी होत नाही. येनकेन प्रकारेन औद्योगिकरण आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे वाहनांने केली जाणारी ये-जा. ही ये-जा मुख्यत्वे करुन घर ते कामाचे ठिकाण अशी असते किंवा घर ते मुलांची शाळा अशी असते. आठवड्यातुन एखाददोन वेळेस भाजीपाला खरेदीसाठी तर महिन्यातुन एखाददोन वेळेस किराणा भरण्यासाठी. एव्हाना शीतलला कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय हे समजले होते आपण स्वतः , आपणा स्वतःकडुन कार्बन फुट-प्रिंट होणारच नाही किंवा कमीत कमी होईल यासाठीचे पहिले पाऊल उचलले ते म्हणजे घर निवडले शाळा आणि पतीचे ऑफीस अश्या दोन्हीही ठिकाणांच्या जवळ. हे कुटूंब केवळ एवढेच करुन थांबले नाही, तर शाळा आणि घर ही ये-जा त्यांनी हळुवार चक्क सायकल ने देखील सुरु केली. दररोज सकाळी नवरा-बायको आपापली सायकल घेतात , मुली देखील त्यांच्या सायकल्स घेतात आणि हे चौघे ही निघतात पॅडल मारत शाळेकडे. मुलांना शाळेत सोडण्यासाठी जाण्याचा हा प्रकार कदाचित तुम्हाला नवीनच वाटला असेल,. बरोबर ना? पण हे खरय आणि हे कुटूंब सातत्याने असे अगदी दररोज करीत आहे. रोज सायकल चालवण्याच्या व्यायामामुळे आरोग्याचे अनेक लाभ या चौघांनाही झाले आहेत, होत आहेत. हे म्हणजे दुधात साखरे सारखेच झाले की नाही? शीतलशी गप्पा मारताना एक शब्द नव्याने मला समजला . तो म्हणजे ‘कॉन्शीअस लिव्हिंग’. त्यालाही अधेमध्ये शीतल – इको हे विशेषण लावताना देखील मी ऐकले. ‘इको कॉन्शीअस लिव्हिंग’. मराठीत सांगायचे झाले तर याला ‘पर्यावरण दृष्ट्या सतर्क जीवन’ असे म्हणता येईल. ही सतर्कता म्हणजे नक्की काय बरे? शीतल सांगते की आपले कोणत्याही वागण्याने, वर्तनाने, कृतीने पर्यावरणाचे नुकसान तर होत नाही ना याविषयी सजग असणे म्हणजे कॉन्शीअस लिव्हिंग. खुप छोट्या छोट्या गोष्टी