Yet another Native Trees plantation done at nisargshala. We planted two native species of trees. Kumbha and bherli Maad. Also see in this video a herb which locals use while making tea at home, the furious river at nisargshala and as usual the beauty of nature. या वेळी दोन स्थानिक प्रजाती लावण्यासाठी प्रयत्न केले. यातील एक म्हणजे कुंभा व दुसरे भेरली माड. सोबतच या व्हिडीयोमध्ये पहा, चहात टाकण्यात येणारे बारकावळी वेल, निसर्गशाळेच्या नदीला आलेलं उफान आणि नेहमीप्रमाणेच नितांतसुंदर निसर्ग.
आपला सह्याद्री अनेक गोष्टींसाठी प्रसिध्द आणि आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली, बहरलेली संस्कृती कशी होती, कशी आहे या विषयी आपण एका लेखामध्ये माहिती घेतली आहेच. तुम्हाला सह्याद्री व त्याची संस्कृती विषयीचा लेख वाचायचा असेल तर इथे क्लिक करा. सोबतच आपण सह्याद्री मधील विविध बेडकांच्या जाती-प्रजाती विषयी देखील माहिती घेतली आहे. सह्याद्रीच्या रानावनांत कोणकोणत्या भाज्या (रानभाज्या) उगवतात व त्या बनवाव्या कशा या विषयी देखील आपण सविस्तर माहिती घेतली आहे. पश्चिम घाटातील बेडुक देखील अभ्यासाचा विषय आहे. या विषयी अधिक माहिती इथे क्लिक करुन मिळेल. आज आपण सह्याद्री तील आणखी एका वैशिष्ट्यपुर्ण जीवा विषयी माहिते करुन घेणार आहोत. तो म्हणजे सह्याद्रीतील खेकडा! माझा ट्रेकिंग पार्टनर अरविंद एक भला मोठा मुठा हातात घेऊन.. आपल्या शहराच्या मावळ पट्ट्यात आढळणा-या दोन मुख्य खेकड्याच्या जाती म्हणजे मुठा खेकडा व काळा खेकडा या होय. पावसाळा सुरु होण्यापुर्वी दुर्गम भागातील लोक जीवनावश्यक सामग्रीची खेरेदी करुनच ठेवतात यात किराणा माल मुख्य असतो. याचे कारण असे की पावसामुळे तालुक्यच्या ठिकाणी जाणे त्यांना शक्य नसते. या सामग्री सोबतच मोट्या प्रमाणात सुकी मासळी देखील विकत घेतली जाते. रानभाज्या व परसबागीतील भाज्यांमुळे फायबर, विटामिन इत्यादींची पुर्तता होते पण प्रोटीनसाठी सुकी मासळी, नदी-नाल्यातील मासे, खुबे व खेकडे यांच्यावर अवलंबुन राहावे लागते. खेकड्यांमुळे भातखाचरांना देखील नुकसान होऊ शकते. भाताची रोपे लहान असताना, खेकडे ही रोपे खाऊ शकतात व त्यामुळे शेतक-यांची मेहनत वाया जाते. त्यामुळे देखील शेतीच्या आसपासच्या परीसरातील खेकडे पकडणे शेतक-यांसाठी अनिवार्य होऊन जाते. मुठा जातीचा खेकडा मी खेकड्यांचा व संस्कृतीचा काही संबंध आहे का हे तपासण्याचा प्रयत्न केल्यावर मला समजले की महादेव कोळी या समाजामध्ये बाळंतिण पुजे मध्ये खेकड्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा काही भागात आहे. तसेही अन्न पुरवठा म्हणुन खेकड्यांचा वापर हा देखील संस्कृतीचाच एक भाग आहे. खेकडा, या विषयावर देखील संशोधनास खुप वाव आहे. ज्याप्रमाणे समुद्रकिनारी खेकड्याची शेती केली जाते त्या प्रमाणेच, पश्चिम घाट माथ्यावर, जिथे खुप जास्त पाऊस पडतो, अशा भागात, जमिनीवरील खेकड्यांची शेती करण्यासाठी खुपच पोषक वातावरण आहे. यामुळे हजारोंच्या संख्येने रोजगार निर्मिती होऊ शकेल. तरुण पिढीने, अभ्यासकांनी, धोरणे बनविणा-यांनी या विषयाकडे देखील लक्ष दिले पाहिजे. आपली कॅम्पसाईट ज्या भागात आहे तिकडे खेकडे पकडण्याचे काम अगदी प्रत्येक घरातील माणसे करतात. प्रत्येक घरी आठवड्यातुन किमान एकदा तरी खेकड्याचे कालवण होतेच होते. खेकडे पकडण्यासाठी (आणि मासे देखील) ही मंडळी एका विशिष्ट साधनाचा उपयोग करतात. हे बांबुचे बनविलेले असते. याला गडदे/गडद असे म्हणतात. या गडद्यामध्ये खेकड्यांसाठी काहीतरी खाद्य टाकले जाते जसे गांडुळ, चिकनचे आतडे, खेणखतातील मोठाले गोल किडे, इत्यादी. खेकडे या गडद्यामध्ये आले की त्यांना बाहेर पडता येत नाही त्यातुन. तुम्ही जर कधी आमच्या कॅम्पसाईट ला आलात तर आवर्जुन गडदे कसे असते हे पहा. लहान मुले देखील खेकडे पकडु शकतात. त्यासोबत खेकडे पकडण्यासाठी आणखी एक पध्दत वापरतात. ती म्हणजे एखाद्या लांब काठीच्या टोकाला गांडुळ अथवा खेकड्याचे कोणतेही खाद्य बांधुन, त्या काठीचे टोक खेकड्याच्या बिळात घालायचे. खाद्याच्या वासाने खेकडा, ते खाद्य खाण्यासाठी त्या काठीला पकडण्याचा प्रयत्न करतो. काठीला थोडे हिसके बसले की पकडणाराला समजते की खेकडा आहे असे. मग हळु हळु ती काठी वर वर उचलायची. काठीच्या पाठोपाठ खेकडा देखील बाहेर येतो, मग चतुराईने, खेकड्याला, त्याच्या पाठीच्या बाजुने पकडायचे. हाताने पकडने हे थोडे जिकीरीचे काम आहे. खेकडा विषारी जरी नसला तरी त्याचा चावा मजबुत असतो. त्यामुळे तुम्हला जर खेकडा हाताने पकडण्याचे कसब माहित नसेल तर त्यापासुन लांब थांबलेले कधीही शहाणपणाचे होय. खालील व्हिडीय मध्ये पहा गडद्यामध्ये खेकडा पकड्याची पध्दत! खेकड्याचे कालवण (कालवण म्हणजे रस्साभाजी) माझे वडील, आम्हाला एक किस्सा नेहमी सांगायचे. माझ्या आईचे माहेर म्हणजे वारकरी कुटुंब. माहेरी त्यांच्याकडे वशाट कधी कुणी केले ही नाही आणि खाल्ले ही नव्हते. लग्नानंतर, बाबुजींनी (वडीलांना आम्ही बाबुजी म्हणायचो!) एकदा खेकडे आणले घरी व आईला कालवण करायला सांगितले. मटण शिजवतात तसे तिने खेकडे, आधी शिजायला ठेवले. पाच मिनिटे गेली, दहा मिनिटे गेली, अर्धा तास, एक तास होऊन गेला, तरीही खेकडे काही शिजेनाच. आई वेळोवेळी हाताने , पातेल्यातील खेकडे दाबुन पहायची. बाबुजींनी विचरले झाले का कालवण, त्यावर ती म्हणाली की खेकडे शिजतच नाहीत. अजुनही कडकच आहेत. तिच्या या उत्तरावर बाबुजींनी कपाळावर हात ठेवला व तिला खेकडा कसा शिजवतात हे शिकवले. तर खेकड्याचे कालवण करणे व ते देखील चवदार, ही एक कलाच आहे. ग्रामीण भागात, प्रत्येक घरात या कलेतील पारंगत गृहीणी अजुनही आहेत. इतक्या वर्षात माझी आई जसे खेकड्याचे कालवण तितके चवदार मी इतरत्र कुठेही खाल्लेले नाही. माझ्या आईच्या हातचे खेकड्याचे कालवण आणि घुग-याचे (काळे घेवडे) कालवण खायला मिळण्यासाठी भाग्य लागते बरका! खालील व्हिडियोमध्ये पहा, खेकड्याचे कालवण करण्याची कोकणी पध्दत. आमच्याकडे कॅम्पिंग ला आलात व खास आग्रह केलात तर आपण मिळुन खेकडे पकडण्यासाठी जाऊ शकतो ;). आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर अवश्य शेयर,फॉरवर्ड करा. आपला हेमंत सिताराम ववले निसर्गशाळा, पुणे. Our Upcoming Events July 2023 Jul 15 15 July 2023 Walk through Clouds & Camp Calling all dreamers and adventurers! Are you ready to experience the extraordinary? Join us on an enchanting journey as we walk through clouds, transcending the ordinary and embracing pure wonder. […] Find out more Jul 22 22 July 2023 Extreme Adventure & Camping Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Calling all adventure enthusiasts! Join us for an adrenaline-pumping Waterfall Rappelling & Monsoon Camping experience at Nisargshala! Feel the rush as you descend down roaring falls and immerse yourself in […] Find out more Jul 29 29 July 2023 Trek to Andhari Jungle & Camping Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Experience Monsoon Magic: Join Our Andhari Jungle Trek & Monsoon Camping at Nisargshala Immerse yourself in the enchanting monsoon season! Join our weekend trek to Andhari Jungle and experience the […] Find out moreAugust 2023 Aug 14 14 August 2023 Thrilling Monsoon Camp for Families Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India A thrilling adventure for entire family, walk through clouds , river crossing and waterfall rappelling. Please click here below to register Find out moreSeptember 2023 Sep 30 30 September 2023 Kutuhal – Younger Kids Camp Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Secure your child’s spot today and let them embark on a magical journey amidst Sahyadri’s natural beauty near Pune. Nature Explorers Camp awaits, ready to create lifelong memories in the […] Find out moreNovember 2023 Nov 25 25 November 2023 Huppya : Kids Nature & Adventure Camp Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Our kids the magic touch of nature, they need to listen to the enchanting music of nature, they must take dip
जुलै महिन्यामध्ये नदी, नाले, ओढे यांना अक्षरशः पुर आणणारा असा झोडपुन काढणारा पाऊस आपण अनुभवला. नदी नाले ओढेच काय घेऊन बसला, आपल्या रस्त्यांवर देखील पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यातच आपले रस्ते व रस्त्यावरील खड्डे यामुळे तर सर्वांनाच हैरान करुन टाकले. मुंबई मधील रस्त्यांवरील महापुर, वाहतुकीच्या समस्या, रेल्वेचे अपघात, दरडी कोसळणे, बांध फुटणे हे सर्व याच महिन्यात होत असते. यावर्षी अतिशय समाधानकारक असा आषाढातील पाऊस झालेला आहे. आषाढातील या पावसाचे हेच तर वैशिष्ट्ये आहे. उन्हाळ्यामध्ये तप्त झालेल्या धरेला तृप्त करणारा, पावसाळ्याच्या सुरुवातीचा पाऊस पेरण्यांसाठी खुप गरजेचा असतो. एकदा पेरण्या झाल्या, भाताची रोपे वीतभार वाढली की मग भातलावणी सुरु होते. या भातलावणी साठी मात्र हलका पाऊस काही कामाचा नसतो. मुसळधार पाऊस पडला नाही तर भात-खाचरे पाण्याने तुडूंब भरणार नाहीत. शहराच्या पश्चिमेला असलेल्या मावळपट्ट्यात, आषाढामध्ये भातलावण्या पुर्ण होतात. श्रावण सुरु होण्यापुर्वीच भात लावण्या झालेल्या असतात. शेतकरी एव्हाना भातलावणी करुन, पेरण्या करुन मोकळा झालेला असतो. अत्यंत धामधुमीचा आषाढ शेतक-यंसाठी कष्ट करण्याचा असतो. आषाढ संपला की मग मात्र सुरु होतो आनंदोत्सव. हा आनंदोत्सव नुसता शेतक-यांसाठीच नसतो, तर तो असतो अवघ्या सृष्टीसाठी. वादळ-वारे एव्हाना शांत झालेले असतात. मुसळधार, झोडपुन काढणारा पावसाची जागा रिमझिम श्रावण सरींनी घेतलेली असते. उन पावसाचा लंपडाव सुरु होतो. त्यातच सप्तरंगी इंद्रधनुष्य, कुठेना कुठे क्षितिजावर मनमोहक नजारा तयार करीत असतो. आषाढातील जीवघेण्या पावसाने सर्वांनाच अक्षरशः नकोसे झालेले असते. मनुष्य जेव्हा शेतीच्या कामात व्यस्त असतो आषाढामध्ये तेव्हा, निसर्गातील इतर प्राणी, पक्षी देखील या जीवघेण्या पावसापासुन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कष्ट उपसत असतात. सर्वांनाच आतुरता असते श्रावणाच्या शुभागमनाची. इतके दिवस पावसाने कहर केलेला असल्याने निसर्गाकडे, निसर्गाच्या सौंदर्याकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही. पण श्रावणात मात्र उसंत मिळालेल्या माणसाला निसर्गामध्ये झालेल्या अदभुत अशा बदलांचे दर्शन होते. श्रावणातील निसर्गाने भारतातील प्रत्येक भाषेतील साहित्यिकांना मोहीनी घातलेली आपणास दिसते. मराठी मध्ये तर श्रावण आणि कविता, सुमधुर गीते असे समीकरणच झालेले आहे. चला तर मग जाऊयात एका अदभुत अशा श्रावण सफरीवर. विविध कवि, कवयित्रींनी रचलेल्या अजरामर अशा श्रावण-कविता, श्रावण-गीतांनी मराठी मनावर कायमची छाप उमटवलेली आपणास दिसते. मंगेश पाडगावकर कवि म्हणुन प्रसिध्द तर आहेतच पण या श्रावणाने त्यांच्यातील हळवा तत्वज्ञानी, सत्यान्वेषी देखील आपणास दाखवला. श्रावणात त्यांना गवसलेल्या अंतर्यामीच्या सुराचा किनारा मात्र त्यांना सापडला नाही. लता मंगेशकरांच्या सुमधुर आवाजातील हे गीत श्रावणात होणा-या अंतर्यामीच्या मृदुल हिंदोळ्यांचे रुप आपणास शब्दात आणि सुरांत दाखवतात. श्रावणात घन निळा बरसला https://youtu.be/HlqUzghyic8?t=16 श्रावणाचे नाव घ्यावे आणि बालकवींच्या ‘श्रावणमानसी हर्ष मानसी’ य कवितेच्या ओळी आठवणार नाहीत असा मराठी माणुस शोधुन सापडणार नाही. श्रावणमासी हर्ष मानसी https://youtu.be/cP46RcOa7zo कवी कुसुमाग्रजांना श्रावण हासत नाचत येताना दिसतो. गानसम्राज्ञी पद्मजा यांच्या आवाजातील हे श्रावणगीत, कुसुमाग्रजांच्या श्रावण विश्वाचे दर्शन घडाविणारे आहे. हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला https://youtu.be/-AtJvXQRoaM श्रावणात निसर्गाने जणु एक आगळेच, विलोभणीय रुप घेतलेले असते. निसर्गाचे हे रुप कवयित्री इंदिरा संत यांना, एखाद्या मनस्वी चित्रकाराने चितारलेले निसर्गचित्रच भासते. या निसर्गचित्रामध्ये स्पदने आहेत. जिवंतपणा आहे. चेतना आहे. इंदिरा संत यांची कविता – श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण? घातले, झाडले चाफ्याचे शिंपणबांधले, तोडले इंद्राचे तोरण;झाकला, काढला दरवाजा घराचाविझला, तेवला लामण सूर्याचा; उन्हाचे पाटव नेसले, टाकलेवाऱ्याचे पैंजण घातले, फेकले;घातले, धुतले डोळ्यात काजळलावले, पुसले केवडाअत्तर; बांधले, सोडले हिंदोळे हर्षाचेहासले रुसले मयूर मनाचे;श्रावणा, कुणाचे मनस्वी हे क्षणनिसर्गचित्रात पावले स्पंदन? – इंदिरा संत (रंगबावरी) संगीतकार कौशल इनामदार यांचे देखील श्रावण आणि पावसावर खुप प्रेम आहे. त्यांच्या अनेक रचनांपैकी श्रावणाच्या आणि पावसाच्या रचनांमध्ये त्यांनी स्वतःचा प्राण ओतल्याचे आपणास दिसुन येते. इनामदार यांनी शांता शेळके यांच्या श्रावणाच्या या कवितेवर अतिशय मधुर आणि हृद्याला स्पर्श करणारी रचना केली आहे. शांता शेळके यांच्या विषयी ते पुढील शब्दांत लिहितात. “शांताबई शेळकेंच्या गीतलेखनात एक सिनेमॅटिक क्वॉलिटी आहे. एका गीतातून आपल्या डोळ्यांसमोर ते पात्र, तो प्रसंग, ते वातावरण सगळं उभं राहतं. त्यांच्या चित्रपटबाह्य गीतांतूनही आपल्याला हा गुण दिसतो. मग ते ‘तोच चंद्रमा नभात’ असो किंवा ‘जिवलगा राहिले दूर घर माझे’ असो. नुसत्या चित्रमयतेच्या पलीकडचा हा गुण आहे.” , कौशल इनामदार शांताबाईंनी लिहिलेली एक कविता आहे – रिमझिम बरसत श्रावण आलासाजण नाही आला https://youtu.be/nrs5XjdJ-cc श्रावण जसा निसर्गाच्या अनुपम रुपासाठी ओळखला जातो तसाच तो प्रेमी युगलांच्या प्रेम-भावनेच्या अभिव्यक्ति साठी देखील ओळखला जातो. सुमन कल्याणपुरकर यांचे हे भाव-गीत तुम्हाला मंत्रमुग्ध केल्यावाचुन सोडणार नाही. शांता शेळके यांची रचना तुम्हाला नक्कीच आवडेल. मला हे गीत विशेष आवडते कारण यातील भाव गायिकेने अक्षरशः प्रत्यक्षात आणला आहे. गे गीत ऐकताना आपण शांत होऊन जातो. डोळे बंद करावे आणि पुढील हे गीत ऐकावे. झिम झिम झरती श्रावणधारा https://youtu.be/mUUQgTta_MQ शंकर महादेवन यांच्या आवाजातील हे श्रावणगीत तुम्ही कदाचित ऐकले नसेल. आधुनिक संगीत शैलीमध्ये श्रावणाचे तेच मनमोहक रुप आपणास या सुर संगीतामध्ये दिसते. ओल्या सांजवेळी https://youtu.be/Z7oZyPMa3oE वेगवेगळ्या सिनेमांमध्ये देखील श्रावण व श्रावणामध्ये फुललेल्या हळुवार भाव-भावनांचे चित्रण गीतांच्या माध्यमातुन होते. लोकशाहिर, विनोदी सिनेकलाकार दिवंगत दादा कोंडकेंच्या कल्पकतेलादेखील श्रावणाने भुरळ घातली. त्यांच्या वाजवु का या सुपरडुपर हिट चित्रपटातील हे गाणे देखील छान आहे. https://youtu.be/_nwFx3yGN4Y श्रावण आला ग वनी (सिनेमा – व-हाडी आणि वाजंत्री) हे गीत तुम्हाला जुन्या काळात घेऊन जाईल. https://youtu.be/ms3Dss1Gyqk श्रावण म्हणजे जसा निसर्गाचा उत्सव तसाच भारतीय संस्कृतीचा देखील. श्रावणापासुन पुढे अनेक सण-वारांची जणु श्रृंखलाच सुरु होते. आपले हे सारे सण आपणास निसर्गाशी जोडण्यासाठीच आपल्या पुर्वजांनी योजलेले आहेत. नागपंचमी मध्ये नागाची पुजा करण्याची पध्दत काही नवीन नाही आणि जुनी जरी असली तरी विनाकारण नाहीये. कृषि-संस्कृतीमध्ये नाग-सर्प यांना खुप महत्वाचे स्थान आहे. विविध सण-वारांना निसर्गातील विविध घटकांशी मनुष्य जोडला जाईल व मनुष्य हा निसर्गाचा भाग आहे हे विसरणार नाही याची काळजी घेतली आहे. नागपंचमी, मंगळागौर हे सगळे उत्सव स्त्रियांच्या बहरण्यासाठीचेच आहेत. १९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या जिवाचा सखा या चित्रपटातील नागपंचमीचे हे गाणे देखील तुम्हाला आवडेल. https://youtu.be/U9zep85HlqQ पुर्वीच्या काळी नव्या नव-या मंगळागौरीची आतुरतेने वाट पहायच्या. आपल्या नव-याच्या दिर्घायुष्यासाठी यात पुजा धरण्याची प्रथा होती पुर्वी. ही पूजा करायची म्हणजे नव्या नवरी सगळ्या नटून थटून येतात. काही हौशी मुली तर नऊवार साडी आणि त्याला साजेसे सगळे दागिने घालतात.. थाटच असतो छान! शंकराची पिंड करून त्याची पूजा केली जाते. पूजा होईपर्यंत उपास केला जातो. नंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सुग्रास जेवण जेवतात. दुपारच्या वेळी थोडंसं झोपून आपली मंगळागौरीची पूजा छान फुलांनी सजवली जाते आणि वाट पाहातात ती रात्रीच्या जागरणाची. मंगळागौर म्हणजे रात्रीच्या जागरणाचीच ओढ असते. रात्रभर खेळ खेळून, गाणी म्हणून ही मंगळागौर जागवली जाते. ‘पिंगा ग पोरी पिंगा’ हे गाणे तुम्ही कदाचित बाजीराव मस्तानी या चित्रपटात पाहिले असेल. पण हे आणि अशी अनेक गाणी गात-नाचत खेळत नवविवाहिता रात्र जागवुन काढायच्या. नव्यानेच सासुरवाशीन झालेल्या त्या सुकुमार मुलीला तिचे
अनेक जण पुण्याजवळील पाच घाटांना भेटी देऊन आले. त्यातील काही निवडक व्हिडीयो तुम्हाला एकाच ठिकाणी पाहता यावेत म्हणुन, सर्व व्हिडीयो एकत्रित केले आहेत, एकाच पेज वर. विशेष म्हणजे हे सर्व व्हिडीयो मागील काही दिवसांतीलच आहेत. मढेघाट पुढील व्हिडीयो, मढेघाट धबधब्याच्या अगदी माथ्यावरुन घेतलेला आहे. असे माथ्यावरुन चित्रीकरण करणे धोकादायक आहे त्यामुळे असा आगाऊपणा करणे टाळा. View this post on Instagram @Top…#Madheghat Waterfall?️ A post shared by Omkar Yadav1212 (@omkaryadav1212) on Jul 14, 2019 at 7:44am PDT मुळशी – ताम्हिनी घाट <> देवकुंड धबधबा – मुळशी View this post on Instagram #devkundwaterfall #devkundwaterfalls #pune? #weekendtrip #monsoon #trucking #beautiful #waterfall #incredibleindia #nature #naturelovers #nature_perfection#gopro #goprohero7black A post shared by Santheep Suresh (@santheepsuresh) on Jul 10, 2019 at 9:16am PDT वरंधा घाट View this post on Instagram Aah!!! Such a peaceful view and atmosphere!!! #ramdasswami #dasbodh #bhor #mahad #shivtarghal #varandhaghat #raigaddistrict #waterfall #naturelover A post shared by AB3 (@anik3t_b) on Jul 7, 2019 at 11:20am PDT लोणावळा – खंडाळा माळशेज घाट
पावसाळी सहली साठी पुण्याजवळील सह्याद्रीचे पाच घाट नेमेची येतो मग पावसाळा, श्रावणात घन निळा, नभ उतरु आलं इत्यादी गीत काव्यांमधुन पावसाळ्याच्या अनुपम सौंदर्याला शब्दात बध्द करीत अनेक कवि गीतकारांनी पावसाळ्याला आणखी जास्तच सुंदर केले आहे. मनुष्यमात्र सतत आनंदाच्या शोधात असतो. हा आनंद त्याला अनेक छोट्या मोठ्या गोष्टींमधुन मिळत असतो. मिळत नसेल तरी मनुष्याला हे चांगलेच ठाऊक आहे की आनंद कसा मिळवायचा. प्रत्येकाची आनंदाची अपेक्षा वेगवेगळी असली तरी भारतात मात्र मोसमी पावसाळ्यामुळे प्रत्येकाचा आनंद कित्येक पटीमध्ये वृध्दींगत होत असतो. विशेषतः पश्चिमघाट माथ्यावर बरसणा-या या पावसाच्या धारा सजीवसृष्टी मध्ये नव चैतन्य निर्माण करतात यात शंका नाही. वृक्ष, वेली, झुडपे, गवताची सळसळणारी पाती, किट मुंग्या, गाई गुरे, जंगली प्राणी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतकरी,,, या सर्वांचा आनंद कित्येक पटीमध्ये वाढत असतो. व हा वृध्दींगत झालेला आनंद दृश्य स्वरुपात आपण अगदी याची देही याची डोळा पाहु शकतो. फक्त त्यासाठी यासा-यांकडे पाहण्याची एक निरलस दृष्टी मात्र आपणाकडे हवी. तुम्ही पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये राहत असाल तर हा लेख तुमच्या साठीच आहे. आज आम्ही तुम्हाला पुण्याच्या जवळ अशा नयनरम्य निसर्गाचे दर्शन, कमीत कमी त्रासामध्ये आणि ट्राफिक जाम शिवाय कसे व कुठे घेता येईल हे सविस्तर व अचुकपणे सांगणार आहोत. पुण्याइतके भाग्यवान शहर कदाचितच इतर कोणतेच नसेल. घाटमाथ्यापासुन साधारण ४० किमी अंतरावर घाटमाथा शहराच्या पश्चिमेला आहे. व पावसाळ्याच्या ख-या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी घाटमाथ्या शिवाय आणखी दुसरी कोणतीही सुंदर जागा दुसरी कोणतीही नाही यात संशय नाही. चला तर बघुयात पुण्याजवळ कुठे कुठे पावसाळी भटकंतीचा मस्तवाल अनुभव घेता येईल ते. तस पाहता पुण्यापासुन १०० किमी अंतराच्या आत अक्षरक्षः ३० ते ४० ठिकाणे आहेत जिथे जाता येउ शकते. या सर्व ठिकाणी सह्याद्रीतील घोंघावणा-या वा-यावर स्वार होणा-या जलधारा आपण नुसत्याच पाहु शकत नाही तर प्रत्यक्ष अंगावर देखील घेऊ शकतो. या प्रत्येक ठिकाणी आपण सगळेच जाऊ शकतो असे नाही. काही ठिकाणी ट्रेकर्स, भटके, रॉक क्लांईबर्स च जाऊ शकतात. तर काही ठिकाणी जाणे जिकीरीचे होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला पुण्याच्या जवळ, तरीही घाटी पावसाचा आनंद घेण्यासाठी जिथे जाता येईल अश्या पाच सह्याद्रीच्या घाटांविषयी सांगणार आहोत. हे पाच घाट म्हणजे सह्याद्रीची पाच रत्नेच आहे जी पुण्यापासुन अगदीच जवळ आणि स्वर्गासम सुंदर आहेत. मढे घाट – अगदी पहाटे पासुन ते मध्यरात्री पर्यंत, पाऊस कसा कोसळतो, आपणासमोर पावसाच्या धारा कशा एका पाठोपाठ ढगातुन धरतीवर पडतात, नद्या, धबधबे कसे दुथडी भरुन वाहतात, हे सगळे निसर्गाचाच एक भाग बनुन अनुभवता येईल या पावसाळी सहलीमध्ये. धबधबा नुसताच पाहणे नाही, हा घाट पुण्यापासुन ७० ते ९० किमी एवढ्या अंतरावर आहे. पुण्यापासुन इथे जाण्यासाठी बेंगलोर हायवे ने. बेंगलोर कडे निघावे व चेलाडी फाट्यापासुन उजवीकडुन, नसरापुर हुन पुढे वेल्हे गाठावे. वेल्ह्यामध्ये चहा नाश्ता करुन, मढे घाटावर जाता येईल. अंतर १७ किमी आहे. इथुन पुढे घाट रस्ता सुरु होतो. रस्ता अरुंद व वळणावळणाचा आहे. पटाईत गाडी चालवणारेच फक्त इकडे गाडी चालवु शकतात. त्यातच पाऊस सुरु असेल तर गाडी चालवणे आणखी अवघड जाते. मढे घाट हा ऐतिहासिक घाट आहे. सिंहगडावर हौतात्म्य आलेले तानाजी मालुसरे यांचा मृतदेह याच घाटाने कोकणात त्यांच्या गावी नेला होता. बोली भाषेत मृतदेहास मढ म्हणतात त्यामुळे या घाटास मढे घाट असे नाव पडले. जुन्या घाट पाय-या अजुन ही इथे दिसतात. यासाठी तुम्हाला थोडे अधिक खाली उतरावे लागेल. पण पावसाळ्यात शक्यतो घाटात खाली उतरणे टाळावे. साधारण १२० फुटांचा जलप्रपात तुम्हाला इथे अगदी समोरुन पाहता येतो. जीवाही काळजी घेत, कसलाही आगाऊ पणा न करता निसर्गाचा आनंद घ्यावा. मागील काही वर्षांमध्ये या घाटात, कड्यावरुन पडुन अनेकजणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे मद्यपान करुन या परीसरामध्ये फिरकणे टाळा. २४ तास पोलिस देखील असतात इथे त्यामुळे जर कुणी दारु पिताना सापडलाच तर त्याला तुरुंग वारी नक्कीच. रस्ते अरुंद असल्याने शक्यतो १७ सीटर बस पेक्षा मोठी वाहनाने प्रवास करणे टाळा. मढे घाटाची सहल एका दिवसाचीच आहे. पण तुम्हाला जर मढे घाट पाहुन, मुक्काम करायचा असेल व सोबतच वॉटरफॉल रॅपलिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या कॅम्प्ससाईटवर तुमचे स्वागत आहे. वॉटर फॉल रॅपलिंगचा थरार काय असतो हे या व्हिडीयो मध्ये पहा. निसर्गशाळा सह्याद्रीच्या कुशीत जरी असली तरी गाडीने तिथपर्यंत पोहोचता येऊ शकते. पुण्यापासुन अगदी ६०/७० किमी अंतरावर असलेल्या या कॅम्पसाईटपासुन राजगड, तोरणा, मधेघाट, उफांड्या घाट, गोट खिंड, रायलिंग पठार, लिंगाणा अशी पुण्यातील रत्ने अवघ्या काही किमी अंतरावर आहे. आयोजकांशी आधीच बोलुन तुम्ही यापैकी एखाद्या ठिकाणी जाण्याचा बेत तयार करु शकता. नळ चालु केल्यावर ज्याप्रमाणे पाणी बदाबदा पडते, त्याप्रमाणे कोसळणा-या पावसात तुमचा टेंट लागलेला असतो. तरीही पाण्याचा एकही थेंब या टेट मध्ये येत नाही. बाहेर थंड वारे घोंघावत असले तरी टेंट मध्ये मात्र उब असते. मध्यरात्री जेव्हा टेंट पडणा-या पावसाच्या थेंबांच्या आवाजाने तुम्हाला जाग येते तेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्यापासुन पाऊस फक्त एकच हाताच्या अंतरावर पडत असतो तरीही तो तुम्हाला स्पर्श करु शकत नाही. अशा या भन्नाट पावसाळी सहलीचा आनंद तुम्हाला घेता येईल फक्त निसर्गशाळेमध्येच. मावळातील रानभाज्या – ओळख, गुणधर्म व पाककृती – हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा. ताम्हिणी घाट – सदा सर्वदा सर्वांच्या आवडीचे मुळशी धरण परिसर पुणेकरांचे सर्वात आवडते व लाडके पावसाळी डेस्टीनेशन म्हणजे मुळशी. मुळशी , ताम्हिणी घाट जरी सर्वांचे आकर्षण असले तरी या एक दिवसीय पावसाळी सहलीनंतर येणारा मनस्ताप व ट्राफिक जाम मध्ये तासनतास कंटाळवाण वाट बघण, पर्यटकांना नकोस वाटत. या ट्राफिक जाम मुळे फक्त पर्यटकांनाच त्रास होत नाही तर स्थानिकांना देखील खुप त्रासाला सामोरे जावे लागते. याला काही पर्याय आहे. असे काही करता येईल का की जेणेकरुन या ट्राफिकच्या समस्येचा त्रास थोडा का होईना कमी करता येईल? होय या ट्राफिक जाम च्या समस्येवर उपाय आहे. तो म्हणजे गुगल मॅप्सच्या मदतीने पर्यायी रस्ते शोधुन त्या पर्यायी रस्त्यांनी प्रवास करणे. कोणते आहेत हे पर्यायी रस्ते. चला तर मग आपण पाहुयात. मुळशीला जाताना फारसे ट्राफीक जाम नसते. मुख्य अडचण होते ती माघारी शहरात येताना. तर शहरात येताना तीन/चार मुख्य ठिकाणी खुप मोठे जाम होत असतात. हे जाम आपण टाळु शकतो. पहिला आहे, पौड गाव. या गावचा ट्राफिक जाम टाळण्यासाठी, मुळशी वरुन माघारी येताना, माले गावापासुन पौड ला न येता, संभवे गावास जावे. संभवे गावातुन सरळ भादस, शिळेश्वर, आसदे,खुबवली, रावडे अशी गावे करीत पौड कोळवण रोड ला यावे. पौड कोळवण रोडला लागल्यावर पौड कडे वळुन, अगदी एक दोन किमी अंतरावरुन लगेच दारवली, आंबडवेट गावाकडे , डावीकडे वळावे. या रस्त्याने सरळ गेलात तर तुम्हाला भरे फाटा लागेल, तेथुन तुम्ही डावीकडे वळा व पुढे हिंजवडी किंवा सुस मार्गे पुणे गाठा. हा रस्ता सुरुवातीपासुन संभवे पासुन काही ठिकाणी खराब जरी असला तरी तुमचे ट्राफीक मधील किमान तीन तास वाचवु शकतो. या पर्यायी रस्त्याने तुम्ही पौड, घोटावडे फाटा, पिरंगुट, भुगाव, चांदणी चौक या सगळ्या ठिकाणचे ट्राफिक टाळु शकता. ट्राफिक टाळल्यामुळे नक्कीच