मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का !
मध्यंतरानंतर सुनिलजींनी बासरीविषयी अधिक माहिती देत अनेक प्रकारच्या बासरी कश्या असतात ते दाखवले , वाजवुन देखील ऐकवले आणि त्या त्या बासरीचा कोणत्या काळी कधी कसा वापर लोकसंगीत असो वा सिनेमा संगीत असो त्यात झाला ते प्रत्यक्ष वाजवुन दाखवले.