( कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग १, वाचण्यासाठी इथे क्लिक करा ) मी कोकणदिवा, आणि मित्रहो तुम्हाला माहिती असेलच माझी ऊंची रायगडा पेक्षा जास्त आहे. मी रायगडापेक्षा उंच आहे. मला रायगड स्पष्ट दिसतो. त्यावरील नगारखाना दिसतो, जगदिश्वराचा प्रासाद दिसतो, टकमक टोक दिसते, सदर दिसते, बाजरपेठ दिसते! सगळ अगदी स्पष्ट दिसत मला. आजही आणि पुर्वी देखील मी पाहीलाय रायगड माझ्या कातळी नजरांनी. मला व्यवस्थित आठवतय त्या दिवशी रायगडावर, महाराज साहेबांच्या वाड्या मधील सदरेमध्ये सगळे राजघराणे चिंतातुर होऊन बसले होते. एकामागुन एक गुज बातम्या हेरांकडुन राजघराण्याला व कारभा-यांना समजत होत्या. त्यातील पहीली बातमी होती छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेब बादशहाने केलेली क्रुर, अमानवी हत्या. त्या पाठोपाठच अनेक बातम्या येऊन थडकत होत्या. कधी का किल्ला बादशहाने जिंकला तर कधी तो जिंकला. बादशहाने आदिलशहाला धुळीस मिळवल्यावर पुन्हा स्वराज्याचा घास घेण्याचा मोठा डाव रचला. त्याचाच भाग म्हणुन जुल्फिकार खानाला रायगडाला वेढा घालण्यास कोकणात पाठवणे. जुल्फीकार खान कसोशीने रायगडाभोवती फास आवळत होता. एकेक वाट अडवत होता, एकेक गाव मारीत होता. स्वराज्याचा अश्वमेध जितक्या वेगाने दौडत होता, तितक्याच वेगाने औरंगजेब संभाजी राजांच्या हत्येनंतर स्वराज्य गिळण्यासाठी पावले टाकत होता. स्वराज्याचा हा अश्व आता सारथ्या शिवायच पळत होता की काय असे मला कित्येकदा वाटायचे. कारण संभाजीपुत्र राजाराम युवराज अजुअन बाल्यावस्थेतच होते. त्यांना स्वराज्याच्या वारुचा वेग सांभाळता येईल की नाही अशी शंका सगळ्यांनाच होती. कसे ही असले तरी, युवराज राजाराम हेच स्वराज्याचे भविष्य आहे, हे जसे मला समजले, हजारो स्वराज्यनिष्ट मावळ्यांना समजले तसेच औरंगजेबाला सुध्दा समजले. आणि त्यामुळेच जुफिकार खानाला जास्तीची मदत म्हणुन देशावरुन शहाबुद्दीन खानाला, घाट उतरुन जुल्फीकार खानाच्या मदतीला रवाना केले. आणि त्या दिवशी याच बातमीने गडावरील सर्वच जण चिंतेत होते. अनेक गड किल्ले स्वराज्यात सामिल झाले, अनेक स्वराज्यातुन गेले सुध्दा. पण यावेळी नुसते रायगड शत्रुच्या ताब्यात जाण्याची भीती नव्हती. यावेळी, बाळस धरलेल हिंदवी स्वराज्यच, त्याच्या भावी राजासहीत औरंगजेबाच्या क्रुर पंजामध्ये सापडणार आणि जशी अवस्था पराक्रमी शंभु राजांची औरंगजेबाने केली तशीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त भयावह पध्दतीने, स्वराज्याचा हा नवांकुर औरंगजेब कुस्करुन टाकणार. स्वराज्याचा अंत आता निश्चित. आणि पुन्हा सुरु होणार बादहशाची हुजरेगिरी आणि वतनांसाठी आपल्याच भाऊबंदकी, सोयरीकी मध्ये हाणामारी. पुन्हा रयत एखाद्या घाबरलेल्या सशासारखी बादशहा व त्याच्या लबाड लांडग्याच्या भीतीने थरथर कापरे भरुन, भेकडासारखी, मृतवत होणार व तिच्या अन्यायाचे आसुड ओढले जाणार. हा मावळ प्रांत पुन्हा एकदा मुसलमानी अमलाखाली जाणार आणि देवळं रावळावरचे कळस पाडुन तिथे मशिदीचे चांद तारे उभे राहणार, घुमट उभे राहणार. आया बहिणींवर पुन्हा एकदा आभाळ कोसळणार. सामान्यांच्या तोंडातील घास पुन्हा एकदा काढला जाणार. सगळ बुडणार, सगळ संपणार. राजवाड्यातील हे चिंतेचे सुर माझ्या कानावर येत होतेच. अशा परीस्थीतीमध्ये ही शांतपणे, बुध्दीचातुर्याने योजना बनवणारे आणि त्या योजनांना धैर्याने, शौर्याने पुर्ण करणारे विदवान आणि शुरवीर देखील काही कमी तयार केले नव्हते स्वराज्याने. स्वराज्य या शब्दामध्येच ती जादु होती, आहे. हे राज्य माझ आहे, स्वःतच आहे. हा भाव फक्त शिवराय, शंभु राजे व काही मोजके सरदार यांच्यामध्येच नव्हता तर तो होता अगदी सामान्यातल्या सामान्य माणसामध्ये सुध्दा होता. व नेमकी हीच स्वराज्याची खरी ताकत होती, की जी औरंगजेबाला माहित नव्हती. शहाबुद्दीन खानाच्या प्रत्येक हालचालीच्या बातम्या हेरांकरवी रायगडावर पोहोचत होत्या. शहाबुद्दीन नक्की कोणता घाट उतरुन कोकणात येणार याविषयी नक्की सांगता येत नव्हते. त्यामुळे कारभा-यंनी सगळ्याच घाटवाटांवरील चौक्यांना सावध रहायला सांगितले. इकडे रायगड लढवायचाय, दुसरीकडे जुल्फीकार खानाबे घातलेल्या वेढ्याचे लचके तोडायचे व तिसरीकडे घाट बंदबस्त करायचे. पण हे सगळे करण्यासाठी पुरेशी कुमक स्वराज्याकडे नव्हती. मातब्बर सरदार मावळे परप्रांतांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याशी लढण्यात गुंतले होते. वेळ कमी होता त्याच प्रमाणे माणसेही कमी होती. माझ्या पायथ्याशीच सांदोशी गाव. महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा पासुनच या गावाचे भाग्य उजळले. थोरली बाजारपेठ येथे भरु लागली. देश विदेशातील व्यापारी इथे येऊन व्यापार करु लागले. समुद्रमार्गे देशावर जाणा-या व्यापा-यांच्या मालाची अदलाबदल, देणेघेणी, आराम अशा अनेक गोष्टींसाठी सांदोशी प्रसिध्दीस आले होते. जुल्फीकार खानाच्या पापी नजरेतुन मात्र हे समृध्द गाव सुटले नाही. जुल्फीकार खानाने ज्याप्रमाणे रायगडाभोवतीची सगळी गावे लुटली त्याप्रमाणेच हे गाव देखील लुटले, मारले, बेचिराख करुन टाकले. या सुल्तनी संकटानंतर गावकरी थोड्या काळाकरता रानावनात आसरा घेऊन राहीले. जुल्फीकार खान थोडा पुढे सरकल्यावर मात्र हळुहळु बापे माणस जमा होऊ लागली व दोचार दिवसांनी बायकापोर, वृध्द लोकदेखील आपापल्या जळुन भस्म झालेल्या घरट्यांना पुन्हा सावरु लागले. चटणीभाकरी अवघड होती, रानवनातुन मिळेल ते खावुन जगायचे होते. पुन्हा शेती करायची होती, धान्य पिकावयचे होते, पुन्हा संसार फुलवायचा होता. काय ही उमेद आणि आशावाद. अहाहा… बा रायगडावर जी योजना बनली त्यानुसार आधीच जीवाजी व त्याचे नाईक, खिंड लढवण्यासाठी सज्ज होते व खिंड लढवत देखील होते. गनिमाच्या येण्याची पक्की बातमी आल्यावर माझ्या शिखरमाथ्यावर आदल्या रात्रीच, गंज पेटवुन रायगडाला वर्दी दिली होती. वेळ कमी होता हातामध्ये. तोपर्यंत गडावर आणखी एक बातमी येऊन धडकली. शिक्रापुरचा वतनदार, माणकोजी पांढरे स्वःतच्या हजारेक माणसांसहीत, शाहबुद्दीनला येऊन मिळाला होता. शहाबुद्दीनची ताकत वाढली होती. आणि सोबत घाटवाटांची माहिती असणारा माणकोजी सुध्दा मिळाला. माणकोजी सारखे लोक बुडणा-या नावेतुन उडी मारुन, दुस-या सुरक्षित नावेत जातात यामगे फक्त आणि फक्त स्वार्थ व हुजरेगिरी हेच होते. माणसांची जमवाजमव करण्यासाठीचे निरोप सांदोशी आणि आजुबाजुच्या गावांमध्ये तातडीने पोहोचले. कठीण युध्द प्रसंग होणार होता. जीवाजी जरी शुर वीर असला तरी त्याला एवढ्या मोठ्या गनिमाला भिडण्याचा दांडगा अनुभव नव्हता. आणि हे एकट्याचे किंवा नऊ-दहा लोकांचे काम नक्कीच नव्हते. काम मग शाहबुद्दीन आणि माणकोजी ला थांबवणार कोण?  नवीनच उगवु पाहणा-या स्वराज्याचा सुर्याला ग्रहण लावण्यासाठी येणा-या राहु केतुला धुळीस मिळवणार कोण? टिप – या स्वराज्याच्या रक्षकाचा म्हणजेच कोकणदिवा या टेहळणी ठाण्याचा एक व्हिडीयो पाहण्यासाठी इथे क्लिक करा Note – This work of fiction is based on the true incident of valor and bravery exhibited  by Maratha warriors during crucial when Shri Sambhaji Maharaj was killed by Aurangzeb. I keep wandering, trekking, camping the ghats of Sahyadri especially near Pune and get to know really inspiring stories of Marathas. 
shooting stars near pune
Hey sky lovers. The count down has started and we all are eagerly waiting for the most amazing sky show of the year. However this Excitement should not stop us from getting prepared for meteor shower event. In this article, you find out A to Z of how to view meteor shower. Please share with all sky lovers.
Golden backed frog of India
आम्ही कृतज्ञ की कृतघ्न ?   शनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते. अनेक वाहन चालकांना हे माहीतच नाही की समोरुन दुसरी एखादी गाडी आली असता आपल्या गाडीचा दुय्यम प्रकाशझोत लावुन समोरच्या चालकास त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची असते. रात्रीच्या अंधारात अशाप्रकारे डोळे दिपल्यामुळे अनेक अपघात होत असतात. आपल्याकडे समस्या अनेक आहेत. रस्त्यांवर खड्डे असणे, रस्ते अरुंद असणे, रस्त्यावर लाईटस नसणे(ग्रामीण भागात), गतिरोधक नसणे किंवा असले तर त्यांची उंची एवढी जास्त असणे की गाडी सहीत चालकाची हाडे खिळखिळी होणे, अशा अनेक समस्या आहेत. या समस्या बहुंशी शासन यंत्रणेच्या कुचकामामुळे किंवा लोकप्रतिनिधींच्या अज्ञानामुळे आहेत. व त्यामुळे देखील अनेक अपघात होत असतात. नागरीक म्ह्णुन कदाचित या बाबतीत आपण निषेध, तक्रार, पाठपुरावा यापेक्षा अधिक काही करु शकत नाही. परंतु अप्पर आणि डीपर चा उपयोग आपण वाहन चालविताना केला तर आपण काही प्रमाणात तरी डोळे दिपण्यामुळे होणारे अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात करु शकतो. २०११ मध्ये या अशाच डोळे दिपण्यामुळे मला एक अपघात झाला व माझा डावा हात कायमस्वरुपी अधु झाला. मला शनिवारी रात्री देखील अशा डोळे दिपण्यामुळे नीटसे दिसत नव्हते. अंधार होता. समोरुन एकही गाडी येत नसेल तरच रस्ता आणि रस्त्यावरचे खड्डे दिसत. संपुर्ण ३० किमी च्या प्रवासात एक अनाकलनीय गोष्ट जाणवली. दर पाच दहा फुटांवर , रस्त्यात अनेक बेडुक, रस्त्यावर धावणा-या गाड्यांच्या चाकाखाली येऊन, चिरडुन मरुन पडलेले दिसले. हजारोंच्या संख्येने असतील हे बेडुक. कधी कधी माझ्या गाडीच्या समोरुन टुणुक उडी मारताना ही अनेक बेडुक दिसले. लहान, मोठे मध्यम आकाराचे असंख्य बेडुक. एक दोन साप ही रस्त्या ओलांडताना चिरडले गेल्याचे दिसले. बेडुक म्हणा किंवा साप म्हणा, ह्यांना काय गरज आहे रस्त्यावर येण्याची. इथे स्वतच्या गाडीच्या हेडलाईट मुळे  समोरुन गाडी चलवत येणा-या माणसाचे काय हाल होतात याची तमा न बाळगणारा माणुस का म्हनुन ह्या तुच्छ बेडकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतील बरे? रस्ते माणसांनी बनवलेत. माणसांचा अधिकार आहे रस्त्यांवर. त्या रस्त्यांवर बिनधास्त उड्या मारण्याचे धाडस बेडकांनी का करावे. चुक बेडकांचीच आहे. आणि त्या सापांची सुध्दा. रस्ते नसतील तर आमची प्रगती कशी होईल? आमच्या प्रगती साठी आम्ही रस्ते बनवुच आणि जर तुम्ही तुच्छ बेडुक किंवा साप, ससे, हरण भेकर आमच्या रस्त्यावर आले तर आम्ही तुमचा क्षुद्र जीव वाचवण्यासाठी गाडीचे ब्रेक दाबण्याचे कष्ट आम्ही माणसे का बरे घेऊ? ब्रेक दाबला व आमचा वेग कमी झाला तर आमची प्रगती कशी काय होणार बरे? पण चुक बेडकांची हे नक्की. त्यांना समजत नाही का की ह्या सगळ्या डांबरी रस्त्यांवर आले नाही पाहीजे. का बरे एवढ्या मोठ्या संख्येने हे बेडुक रस्त्यावर येऊन जीव गमावत असतील? मला काहीही सुचत नव्हते. मन सुन्न, खिन्न झाले होते. माझ्या वेळ कमी होता. मला कॅम्पसाईटवर आमचे ग्राहक येण्या आधी पोहोचायचे होते. तरी देखील मी जाताना माझ्या गाडीच्या चाकाखाली कुणी ही बेडुक मरणार नाही याची दक्षता घेत गाडी चालवीत गेलो. सोबतच मी एक पट्टेरी मण्यार, म्हणजे अतिविषारी साप, कि जो रस्त्यावर आडवा होता व हळु हळु हालचाल करीत होता असा पाहीला. माझे लक्षात आल्यावर गाडी वळवुन माघारी आलो व गाडीचा प्रकाशझोत त्याच्यावर सोडुन आणि पाय आपटुन त्याला हळु हळु रस्त्याच्या कडेला झाडीत जाण्यास भाग पाडले. आणि दुसरा गवत्या साप. अगदी गवताच्या काडी सारखाच पातळ साप. रस्त्यात जर हा दिसला तर क्वचित असे वाटेल की गवताची काडीच पडली आहे. मी अशा प्रकारे दोन्ही दिसलेल्या सापांना रस्त्याबाहेर हाकलुन लावले. रस्ता काय त्यांच्या बापाचा आहे काय? आले मोठे आमच्या रस्त्यावर. शनिवार रविवार आमचा निसर्गपर्यटनाचा कार्यक्र्म नेहमीप्रमाणेच अमेझींग, ऑसम असा झाला. माघारी निघताना रविवारी पुन्हा अंधारले. संध्याकाळची सांजवेळ. सुर्य पश्चिमेला सिंगापुर रोडच्या पल्याड, क्षितिजाला स्पर्श करता झाला. वेल्ह्याला पोहोचेपर्यंत मी मुद्दामहुन हेल्मेटची काच लावली नव्हती. वेल्हे सोडल्यावर मात्र रस्ता थोडा सुस्थितीत असल्याने, वेग वाढवण्याची संधी मिळते. त्यामुळे हेल्मेटची काच लावुन थोडा वेग वाढवला. आणि पुन्हा दिसायला लागले त्या राज्य मार्ग क्र. ६५ वर मृतुचे तांडव. फुटाफुटवर बेडुक उड्या मारुन मारुन रस्ता ओलाम्डण्याच्या प्रयत्नात वाहनांच्या चाकाखाली जीव देत होते. पुन्हा तेच प्र्श्न कशासाठी हे बेडुक मरणाला मिठी मारण्यासाठी रस्त्यावर येत होते? तीच खिन्नता. गाडी खड्ड्यांमध्ये आदळत होती, त्यामुळे गाडीच्या वेगवेगळ्या भागांचा आवाज येत होता. हेल्मेटच्या काचेच्या बेचंगळीतुन वा-याचा आवाज येत होता, मध्ये फटाक्यांचा आवाज, मध्येच एखाद्या गाडीच्या कर्णकर्कश्श हॉर्नचा आवाज. इतके सगळे आवाज असताना देखील स्मशान शांततेचा अनुभव येत होता. जीवे जीवस्य जीवनम असे आपण म्हणतो. त्यामुळे एखाद्या प्राण्याला दुस-या प्राण्याने भुक भागवण्यासाठी मारणे हे ठिक आहे. पण ह्या असंख्य बेडकांच्या मरणाने कुणाची भुक भागतेय? कुणाला काय फायदा होतोय? विशेषतः माणसाला काय उपयोग होतोय का?   आणखी एक गोष्ट मला जाणवली ह्या ३० किमी च्या राइड मध्ये. वेल्ह्याकडुन पुणे बेंगलोर हाय वे कडे येताना,गुंजवणी नदी रस्त्याला काहीशी समांतर, एखाद्या किमी च्या अंतरावर वाहते. म्हणजे पुण्याकडे येताना माझ्या उजवीकडे नदी आणि डावीकडे डोंगररांग. हा क्रम थोडा नीट पाहु. माझ्या डावीकडे सर्वात आध डोंगररांग आहे. ही डोंगररांग देखील रस्त्याला समांतरच आहे. डोंगर , मग डोंगर उतार, मग सखल भाग. ह्या सखल भागात भात खाचरे, काही गावे आणि मग रस्ता आणि उजवीकडे पुन्हा भातशेती आणि नदी. बेडकांच्या उड्यामारण्या मध्ये एक साधर्म होते. सर्व बेडुक रस्त्याच्या डावीकडुन उजवी जाण्याच्या प्रयत्नातअसताना उड्या मारीत रस्त्यावर येऊन चिरडले जात होते. काल रात्री हे माझ्या लक्षात आले नव्हते. निसर्गचक्राच्या अनेकविध आ-यांपैकीच ही एक आरी असावी असे मला तरी वाटते. पावसाळा संपलाय. डोंगर, डोंगर उतार व नंतरच्या सखल भागातील पाणी हळु हळु कमी कमी होत जाणार. बेडुक जरी उभयचर असला तरी पाणी व जमीन एकत्रित म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. नैसर्गिक बदलांची चाहुल ह्या बेडकांना लागली नसेल कशावरुन? कदाचित त्यामुळे हे बेडुक भविष्यात जिथे मुबलक पाणी असेल अशा ठिकाणी स्थलांतर करीत असतील. त्या बिचा-यांना काय माहीत रस्ता म्हणजे काय? ते पाण्याच्या दिशेने प्रवासास निघाले आणि माणसाच्य प्रगतीच्या वाटेने त्यांना रस्त्यावरच निष्ठुरपणे मारले. प्रत्येक जीव निसर्गाची अप्रतिम अशी कलाकृती आहे. प्रत्येक जीवामध्ये वैश्विक चैतन्याच्या आविष्कार होत असतो. प्रत्येक जीव निसर्गातील महान अशा सामंजस्याचा (हार्मनी) एक महत्वाचा घटक आहे. असे असताना आपण, म्हणजे मनुष्याने, अशा निष्पाप बेडकांना विनाकारण का बरे मारावे? विकास प्रगती साधताना रस्ते बनणारच. पण आपण हे का विसरतोय की रस्त्यावर चालणा-या गाडीचे स्टीयरींग आपल्या हातात आहे. ब्रेक लावणे, मर्यादीत वेग ठेवणे आपल्या हातात आहे. आपण निसर्गातील आपल्या सहचरांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न