तरुण, उत्साही पर्यटक प्रथमेश चे वय अंदाजे २०-२१ वर्षे असेल. नुकतीच पदवी घेऊन कोर्टात वकीलीची प्रॅक्टीस करण्यास त्याने सुरुवात केली. मित्र मैत्रिणींचा जुना ग्रुप अनेक महिन्यांनी एकत्र आला. आणि त्यांनी कॅम्पिंग ला जायचे ठरवले. गुगल इंटरनेट वर सर्च करुन, वेगवेगळ्या कॅम्पसाईट्स ची तुलना करुन त्यांनी निसर्ग शाळा निवडले. प्रथमेश ने आजपर्यंत ट्रेकींग केले होते. पण कॅम्पिंगचा अनुभव तसा पहिलाच. पहिल्या दिवशी संध्याकाळी साइटवर येताना ते अक्षरशः चिंब भिजुनच आले होते. निसर्गशाळेपर्यंत पोहोचणे सुध्दा धाडसाचे आणि निसर्गाच्या अलौकिक चमत्कारांच्या गराड्यातुन येण्यासारखे आहे. त्यातही पावसाळ्यात निसर्गशाळेला पोहोचणे म्हणजे तर एक अफलातुन अनुभव. धुक्यासारख्या भासणा-या ढगातुनच आपली गाडी चालत असते. त्यात धोधो पडणारा पाऊस. https://youtube.com/watch?v=/2dXgPhFzmW8?si=kJSU3vmTJ-6IV583 स्वागत आणि निसर्गशाळेची स्पेशालिटी आमचेकडे कुणाचे येणे नक्की झाले की आम्ही त्यांना सविस्तर आणि अचुक अशी सगळी माहिती देतो. जसे कोणत्या रस्त्याने यायचे, सोबत काय काय आणायचे, काय काळजी घ्यायची, येताना वाटेत काय पाहता येऊ शकते, काय करु नये इत्यादी. साईट वर पोहोचल्याबरोबर, प्रथमेश आणि त्याच्या ग्रुपला त्यांचे टेंट कुठे आहेत ते सांगुन कपडे बदलण्यास सांगितले. कपडे बदलेपर्यंत गरमागरम वाफाळलेला चहा आणि पार्लेजी बिस्कीटे तयारच होती. सगळ्यांनी यथेच्छ चहा बिस्कीट वर ताव मारला. अंधार पडता पडता पोरांनी शेगडी पेटवली. आमचे कडे सर्व कामे स्वःतच करावी लागतात. बार्बेक्यु साठी शेगडी कशी पेटवायची इथुन ते अगदी मॅरीनेशन कसे करायचे, भाजायचे कसे, कोणते तेल वापरायचे हे सर्व आम्ही सर्वांना मुक्तहस्ते सर्व शिकवतो. बदाबदा पाऊस आणि घोंघावणारा वारा, यामुळे शेगडीतील कोळसे लवकर पेटत नव्हते. तरी प्रथमेश आणि गॅंग ने हार न मानता प्रयत्न केले आणि अर्धा तासाने शेगडी पेटवलीच. त्यांनी व्यवस्थित बार्बेक्यु करुन खाल्ले. रात्रीचे जेवण उरकुन सगळे जण शेकोटी भोवती बारा वाजेस्तोवर गप्पा मारीत होते. सकाळी नेहमीप्रमाणे आम्ही नाश्ता करुन रॅपेलिंगसाठी निघालो. आम्ही जिथे रॅपेलिंग करतो त्या कड्यावरुन पावसाळ्यात खुप मोठा जलप्रपात जमीनीवर कोसळतो. पावसाळ्यात इथे धबधबा तयार होतो. अंदाजे ५० फुट उंचीचा हा धबधबा, तस पाहता फार मोठा नाही. सर्वांना प्रात्यक्षिक दाखवावे लागते. त्यासाठी आमचा एखादा कार्यकर्ता (माझे अनेक मित्र निसर्गशाळेचे कार्यकर्ते आहेत!) सर्वात आधी प्रात्यक्षिक दाखवित कड्यावरुन खाली उतरतो. यावेळी अजित नाईक कार्यकर्ता म्हणुन सर्वात आधी खाली उतरला. रॅपलिंग म्हणजे काय? रॅपलिंग हा एक धाडसी खेळ आहे. प्रत्येक खेळामध्ये आनंद असतो तसा यातही आहे. तसेच त्या त्या खेळामध्ये काही अनुषांगिक धोके देखील असतात. रॅपलिंग मधला धोका कोणता? तर यामध्ये जर आयोजकांकडुन एखादी चुक झाली तर खेळाडुच्या जीवाला देखील धोका यात होऊ शकतो. रॅपेलिंग करण्यासाठी आमच्या येणारे लोक सर्वच नवीन असतात. त्यामुळे त्यांच्याकडुन चुका होणारच आणि होतात देखील. पण आयोजक म्हणजे आम्ही रॅपेलिंगच्या आधीच सर्व प्रकारे सुरक्षा चाचण्या घेऊनच खेळास सुरुवात करीत असतो. प्रत्येक दोर, प्रत्येक गाठ तीन तीन चार चार वेळा तपासली जाते. या खेळासाठी काही विशेष साधने देखील वापरावी लागतात. त्यांची देखील तपासणी वेळोवेळी करणे अत्यंत गरजेचे असते. जसे हार्नेस कुठे फाटलेले किंवा उसवलेले तर नाही ना? कॅराबिनर नीट काम करतात ना? त्यांचे स्क्रु फिरत आहेत ना? इत्यादी. निसर्गशाळेचे प्रशिक्षित आणि अनुभवी मार्गदर्शक अनेकांना प्रश्न पडतो की हेमंत हे सगळे कुठे शिकला? तसा प्रथमेश ला सुध्दा पडला. त्याने तसे मला विचारले. सर्वांनाच ऐकु जाईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये मी माझ्या गिर्यारोहनातील प्रशिक्षण आणि प्रमाणपत्राविषयी माहिती दिली. यशदिप आणि मी दोघांनीही ही या सर्व क्रिडाप्रकारात जगातील सर्वोत्कृष्ट संस्थेकडुन प्रशिक्षण घेतले आहे. त्या संस्थेचे नाव आहे नेहरु इंस्टीट्युट ऑफ माऊंटेनीयरींग, उत्तरकाशी, हिमालय. हे सगळे ऐकल्यावर सर्वांना अजुन जास्त आधार वाटतो. तुम्ही अन्य कुठे ही अशा क्रिडाप्रकारासाठी जरी गेलात तरी लक्षात ठेवा, जे कोणी आयोजक आणि प्रत्यक्ष ॲडव्हेंचर लीडर्स आहेत, त्यांचे प्रशिक्षणाविषयी माहीती जरुर घ्या. भारतात अशा मोजक्याच संस्था आहेत जिथे या सर्व क्रिडाप्रकारांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळते. त्यांची नावे अशी खाली आहेत. नेहरु इन्स्टीट्युट ऑफ माऊंटेनीयरींग – ही निम सरकारी संस्था आहे व यातील प्रशिक्षक आर्मी मधील असतात. क्वचित नागरीक देखील यात प्रशिक्षक म्हणुन असु शकतात पण ते निष्णात असावयास ह्वेत तरच त्यांना तशी संधी दिली जाते हिमालयन माऊंटेनीयरींग इन्स्टीट्युट , दार्जीलिंग जवाहर इन्स्टीट्युट ऑफ माऊंटेनीयरींग ॲन्ड विंटर स्पोर्ट्स, पेहलगाम अटल बिहारी इन्स्टीट्युट ऑफ माऊंटेनीयरींग ॲन्ड अलाईड स्पोर्ट्स, मनाली Dorota Oeiknigh from Poland did rappelling at nisargshala थरार की थरथराट? असो. अजित रॅपलिंग करुन खाली उतरला. त्याच्या मागे आणखी दोन जणांनी रॅपेलिंग केले. रॅपलिंग आणि वॉटरफॉल रॅपलिंग मध्ये तस पाहता फरक काहीच नाही. वॉटरफॉल रॅपलिंग मध्ये कड्यावरुन जलप्रपात पुर्ण वेगाने आणि ताकतीने खाली पडत असतो. तर नुसत्या रॅपेलिंग मध्ये कडा कोरडा असतो. पाणी नसते. दोन्ही मध्ये, खाली उतरण्याचे कौशल्य तेच असते. जसे दोन्ही पायात आपल्या उंची नुसार विशिष्ट अंतर ठेवणे जेणे करुन आपला तोल जाणार नाही, गुडघे सरळ ठेवणे जेणे करुन पायावर आणि कमरेवर ताण येणार नाही, इत्यादी. पहिले दोन तीन फुट उतरताना सर्वच जण घाबरतात पण एकदा तंत्र समजले आणि दिलेल्या सुचनांचे नीट पालन केले की मग भीती संपते आणि सुरु होतो निसर्गाच्या रौद्र रुपाशी खेळण्याचा आनंद. हा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे. यामध्ये सगळ्यात मोठा घटक असतो तो म्हणजे आपल्या भीतीवर , भयावर आपणच मिळवलेला विजय. ज्यावेळी खेळाडुस जीव जाण्याची भीती वाटते तेव्हा जे काही होते मला त्या खेळाडुच्या डोळ्यात बघायला मिळत असते. प्रथमेश ने रॅपेलिंगला सुरुवात केली खरी पण त्याची भीती म्मला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. अर्थात ही भीती अनाठायी असते. सर्वांना बजावुन सांगितलेले असते की तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही दोन्ही हात जरी सोडले तरी तुम्ही पडणार नाही. माझ्या हातामध्ये एक सुरक्षा दोरी असते, तसेच खाली जो कार्यकर्ता असतो त्याच्या हातामध्ये देखील सुरक्षा असते. त्यामुळे काळजीचे काहीच कारण नसते. हे सगळे प्रात्यक्षिक सुरु असतानाच सांगितलेले असते, त्यांनी ऐकलेले असते, तरीही भीती वाटतेच. भय हा मानवी स्वभाव आहे. यात गैर किंवा कमीपणा असे काहीच नाही. कठीण प्रसंगी आपले अस्तित्व टिकले पाहीजे, कायम राहिले पाहीजे या मुलभुत सहज प्रवृत्तीतुन निर्माण झालेली एक बिकट, निर्णयक्षमता नसलेली अवस्था म्हणजे भय होय. या अवस्थेमध्ये आपण वर्तमान विसरुन जातो. समोरील संकटच आपल्या बुध्दीचा ताबा घेते आणि आपण काहीही ठरवु शकत नाही. परिस्थीती जसे आपल्याला करायला लावेल तसे आपण करत जातो. तोल जातो, शरीरातील सगळी शक्ती हातामध्ये आपोआप येते, पाय घसरतो, कधीकधी खेळाडु ला वाटते की तो पडला. हे सगळे होत असताना, त्या व्यक्तिच्या चेहरा व डोळे असे काही हालचाली करतात की पाहणाराला (अनेकदा मीच असतो किंवा यशदिप) वाटते की त्या खेळाडु साक्षात मृत्युच समोर पाहिला की काय? भीतीची चरम सीमा म्हणजे खेळाडु हातपाय गाळुन, गलितगात्र होऊन जातो. मी वरुन ज्या काही सुचना देत असतो त्याकडे त्याचे लक्ष नसते. त्याला एकच दिसत असते ते म्ह्णजे …………. . प्रथमेशच्या डोळ्यामध्ये आणि चेह-यावर त्याने त्या अवस्थे मध्ये जे काही पाहिले त्याचे प्रतिबिंब मी स्पष्ट पाहत होतो. विजय ही विजय या अवस्थेमध्ये तो खेळाडु नाना प्रकारे स्वतःचा जीव
Have a look at your camping moments at nisargshala and add more photos in comment of you and your gang, family camping at our campsite,
Nature shows us it’s beauty and glory in countless shapes, forms, and colors. What is the most beautiful about it? That is impossible to say with all her surprises and secrets, magical sceneries? Still, one of the most dramatic and breathtaking creations of nature is certainly the waterfall. Watch a gushing waterfall we tried to embrace on our recent nature excursion.
Young Enthusiast tourists Prathamesh is hardly 21 years old., a young chap, a newly certified law practitioner. It had been months he had met his college buddies. As they met after almost five months, they decided to spend quality time together. They wanted to go away from all the chaos of the city life. They didn’t want any noise and wanted a place which would offer them basic amenities and loads of peace and serene beauty of nature. They googled and compared different campsites near Pune. Finally they concluded to camp at Nisargshala, last weekend. Welcome and Nisargshala Specialty BBQ Prathamesh had done many treks before this but camping at such a place which completely away from noise and air pollution was his first experience. When they arrived the campsite, they were all wet in the rain showers, while on the way to Nisargshala. Enroute Nisargshala we literally drive through the clouds. As we cross Velhe village, the drive becomes adventurous and and joyous. Keeping Budhla (One of the watch towers of fort Torna) on the left, as we drive further towards Nisargshala, we drive along a ridge which is formed by two valleys. Especially in Monsoon driving from the ridge is great experience. If some group confirms their camping with us, we make sure they accurate and proper instructions about how to reach the campsite, which route to take, which route’s road condition is good and which is bad, what all places one can visit enroute to Nisargshala, etc. Also we provide all information about the basics of camping and what care we should take when we are in the jungle like area. As Prathamesh and his gang arrived the camp site , they were totally wet. So I showed them their thents and asked them to get changed quickly to have tea with biscuits. After having tea and biscuits they lit up the BBQ grill after tiring efforts of half an hour. As it was raining with and windy all over, lighting up the grill was a challenge. And that’s the fun when you are camping in wild. It started getting darker and cicadas made sure that the night time experience is more intense by making noise from all the directions. Then was the time to grill the BBQ. There is technique to best cook BBQ on the charcoal grill. We teach all the participants how cook/ roast BBQ, how to use oil or butter, how to put the flame down and almost everything of BBQ. Many of our guests have tried BBQ at home after learning it at Nisargshala. This time, as I saw the youngsters shivering with cold and they looked hungry also so I arranged a whole chicken and decided to offer them stuffed whole chicken. They all liked it so much that their reaction was like this should be one of the best BBQ experience they have ever had. They kept on having good time around bonfire till late night. The tents were all waterproof and warm. I don’t even remember what time they called off the day. Next morning after the breakfast, we set off for waterfall rappelling. The place where we do rappelling is hardly 20 minutes’ walk from wonderful natural world. This particular cliff is approximately 50 feet high. In summer this cliff is dry. However in monsoon it turns into an astonishing waterfall. Water adds up from many small stream in the mountain finally makes it a big waterfall. Water literally pours from this much height. Even it’s a 50 ft waterfall, still it makes a perfect waterfall to try a novice’s hand on waterfall rappelling. By the time I finished with anchoring the ropes, testing and re-testing the load bearing capacity as well the knots, Prathamesh and his troop were already at the rappelling site. Our first task was to give a demonstration to the participants. One of our (Nisargshala) team members normally demonstrates how rappelling has to be done. While demonstrating he rappels down the fall. This time we had Ajit Naik (owner of www.hydraulicsparesindia.com and a successful entrepreneur) as the volunteer. I am lucky to have many of my friends join me as volunteers at Nisargshala. Many are big tycoons in their respective industries. What is rappelling? Rappelling an adventure sport. This sport offers thrill and amazing feeling of victory. Like each sport has its own hazards, Rappelling also carries some of its own life threatening hazards. What are the threats associated with rappelling? If the organiser commits any inaccuracy, the very life of the participant is at stake. This much dangerous rappelling activity is !! The participants who come for rappelling, are granted to make slipups as they are new to this sport. And they do blunders while rappelling down the waterfall. However the organisers, Nisargshala in this case make sure that each and everything is tested and safe. The rescue set up must also be ready before someone rappels down the waterfall. Trained and experienced instructors of Nisargshala Many participants, look closely how I set up the anchors, how I tie knots and tests everything. Curiously Prathamesh asked where I learnt all this. Now for me this was an opportunity to build confidence in the participants about their instructor. In a very loud voice, I told them about my training of mountaineering and certification. As I finished telling this, I could see increase in comfort level of all the participants. Yashdeep and I, both got trained in all mountaineering skill in one the best institutes in the world. Whereever you go for rappelling, don’t forget to ask the instructors where they got trained and certified from? It’s very important as you know; you are dealing with greatest fear ahead. Some quality institutes in India where such trainings are conducted are as follows. Nehru Institute of Mountaineering – This is a government body and the instructors of this are in the army. Rarely citizens may also be as coaches but they are given an opportunity