Now as the entire world is stopped due to novel corona virus; we all have understood the importance of going out. We all are locked down in our homes, some are locked at work places and some are locked down at community hospitals saving lives. I am a trekker. And I go trekking every now and then. I go in wilderness at least once a week. And apart from that I am a daily runner. I run every day. Everything has been stopped now. Things have been stopped only for us to make sure that we have better lives post pandemic. As I spend entire day just sitting at home, watching Television, reading books, surfing internet; I am missing trekking a lot. This thought of trekking made me write an article about trekking so that new comers can benefit from it. There are plenty of articles and videos on internet about what trekking is and the benefits of trekking. You just have to go to google and search with ‘What is trekking’ keywords and you get loads of article links. I am not going to go in the same topic now. Rather I shall be writing something which is least talked about. Why is trekking so expensive? Trekking is basically an activity conducted for more than one day and walking in rustic, natural world. In this activity we have to stay for one or more nights outdoors. Especially in India people go trekking different peaks in Himalayas or regional mountain ranges. Maharashtra has become a trekking hotspot over a few decades now. We have seen great trekkers like Gopal N Dandekar, Anand Palande, Usha Page, Nandu Page are a few names who have trekked Sahyadri and made very useful notes which are helping people like us even now. Over the time, as globalization and IT revolution happened, Maharashtra has become hub for corporate & businesses. This has attracted youth and families to come to Maharashtra. This newly relocated population, with their limited time resources and lack of local knowledge and language, has opened a new horizon for some to organize trekking events in metropolitan cities of Maharashtra. Not only this newly relocated population but also the younger generation of Maharashtra also has adapted to the global business and employment trends. This GenX don’t have time as well patience to study, plan and organize trek themselves. This new generation is totally dependent on trek organizers now a days. So the organizers have to keep the prices as per the industry standards so that they themselves can also lead the same life style as their counter customers are leading. And there is nothing immoral at all in this. They charge for services and food of which the corporate customers are used to. Trekking, as a hobby if one develops strategically, learns and adapts the basics of Trekking, then it’s not expensive. Now a days there is a trend that trekking is something that anyone can buy with money. And that’s the reason many people started selling trekking as a service in which they are offering city facilities to attract more customers. People need bottled water when they go trekking, people want to boose around campfire when they go trekking, people want travel luxury when they go trekking, people want cozy beds when they go trekking, people want super glamorous, shining toilets when they go trekking, People want tasty delicious ready platter food when they go trekking, people want everything without taking efforts and these are the reasons why trekking is so expensive. I remember some of our treks which we did in record low cost. We did Pratapgad (one night stay), Mahabaleshwar(two night stays), kamalgad(one night stay) a total of 4 night stays trek in just 103 Rs. This cost included mostly transport cost and food ration. We never bought ready platter food or a cup of tea while on treks. We managed to cook everything ourselves with whatever ration that we had. We carried all the grains, necessary masalas, salt, tea powder, milk powder etc with minimum utensils, in every participant’s backpacks. There are many more treks I still remember during which we spent bare minimum money. And one more thing, we still do such treks where in the cost involved is of only for transport and food ration or packed food everybody bring themselves. We don’t buy bottled water whilst trekking. Alternatively you can request locals also to help you with village food which wouldn’t cost much. This way you help generate employment as well to the locals, in right way. If you still rely on some organizer to arrange food for you and arrange luxury for you, then trekking is expensive for you. If you want to develop this hobby you can go along with some group initially and learn best trekking practices. Find your suitable trek mates and stick to them only for the life time if possible. If you could do this, then trekking is not expensive for you. Regards Hemant S Vavale Author of this article, along with Yashdeep and Sanjay run an enterprise with name nisargshala. This place is for city dwellers to experience nature at its best, near Pune. You can do camping, trekking, rappelling, waterfall rappelling, BBQ at our place.
नेत्रतज्ञ हल्ली ज्या प्रमाणे प्राथमिक नेत्र चिकित्सा करतात, अगदी त्याचप्रमाणे प्राचीन काळीदेखील नेत्र चिकित्सा केली जायची. फरक फक्त एवढाच होता की हल्ली डॉक्टर्स अक्षरे आणि चिन्हे ओळखायला लावतात, तर पुर्वी आकाशातील कृत्तिका नक्षत्र रुग्णास पाहावयास लावुन, प्राथमिक नेत्र चिकित्सा केली जायची. ज्या व्यक्तिला कृत्तिका तारकासमुहामध्ये सहा पेक्षा कमी तारे दिसत त्यास दृष्टीदोष आहे व ज्यास सात किंवा जास्त तारे दिसत, त्यास पुढे हेरगिरी, जासुसी सारख्या क्षेत्रात संधी मिळत असे. ज्यास सहा तारे दिसत, त्याची दृष्टी साधारण म्हणजे व्यवस्थित आहे असे मानले जायचे. पाहिलय का कधी तुम्ही , हे कृत्तिका नक्षत्र, आकाशामध्ये? या दिवसात जर तुम्हाला कृत्तिका पाहायचे असेल तर, संध्याकाळी, म्हणजे काळोख होतानाच, हो अगदी होतानाच व पुढचा काही काळच, हे नक्षत्र, आकाशामध्ये पश्चिम गोलार्धात दिसते. या दिवसांमध्ये अंधार होताना हे नक्षत्र उगवलेले असते. व आकाशात एक चतुर्थांश वरही आलेले असते. सर्व प्रथम आपण कृत्तिका चे चित्र पाहुयात आणि मग त्याची कथा. कृत्तिका या नक्षत्रामध्ये ३०० च्या आसपास तारे, दुर्बिणीतुन पाहता येऊ शकतात. व उघड्या डोळ्यांना ६ ते ७ तारे , विनासायास दिसतात. अत्यंत लक्षणीय अशी ठेवण असलेल्या ह्या तारकासमुहातील मुख्य ६-७ ता-यांच्या भोवती विशिष्ट निळ्या रंगाची प्रभा दिसते. पुण्यातुन जर आपण कृत्तिका, ह्या दिवसांत पहायचा म्हंटले तर संधीकाळानंतर अगदी थोडाच वेळ कृत्तिका बघण्याची संधी मिळते. तेच आपण नोव्हेंबर डिसेंबर जर कृत्तिका पाहु जाल तर, जवळ जवळ ६ ते ७ तास आपण कृत्तिका आकाशामध्ये पाहु शकतो. कृत्तिका उगवताना, तिची जी रचना असते, त्याच्या अगदी उलटी मावळताना दिसते. असे सर्वच तारका समुहांच्या बाबतीत घडत असते. कृत्तिकेच्या आधी अश्विणी, भरणी पश्चिमेकडे मावळतीकडे असतात तर, रोहीणी, मृग मागोमाग, दक्षिण-पुर्व आकाशामध्ये दिसतात. वर हबल टेलीस्कोप मधुन टिपलेले कृत्तिकाचे छायाचित्र आहे. कृत्तिका नक्षत्र पृथ्वीपासुन सुमारे ४०० प्रकाशवर्षे इतके दुर आहे. या तारकापुंजातील सर्वात तेजस्वी तारा म्हणजे अंबा; यास इंग्रजी मधेय Alcyone असे म्हणतात. हल्लीच केलेल्या एका शोधात असे समोर आहे आहे की या तारकापुंजातील सर्वच तारे त्यांची तेजस्विता बदलणारे आहेत. यांच्या प्रखरतेमध्ये होणारे हे बदल असंबंध्द म्हणजेच अनियमित आहेत. केवळ एकच तारा ज्याचे नाव Maia आहे, या ता-याची प्रखरता नियमित पणे बदलते. दर दहा दिवसांनी त्याच्या प्रखरतेमध्ये बदल जाणवतो. ही निरीक्षणे व अभ्यास केप्लर स्पेस टेलीस्कोप द्वारे केले आहेत. खालील आकृतीमध्ये तुम्हाला या ता-यांच्या प्रखरतेमध्ये होणारे ब्दल पाहता येतील. मनुष्याला पृथ्वीवर अवतरुन जितका काळ झाला अंदाजे तेवढेच म्हणजे २५ लक्ष वर्षे किंवा त्याहुन थोडेसेच जास्त वय आहे या तारकापुंजाचे. कृत्तिका नक्षत्र, राशी चक्रातील वृषभ राशीचा भाग आहे. वृषभ राशीमध्ये रोहीणी (पुर्ण), कृतिका (तीन चतुर्थांश) व मृग नक्षत्र (अर्धे) यांचा समावेश होतो. आता चित्रांची चित्तरकथा – भगवान भोले भंडारींच्या तेजाने, जन्माला आलेले मुल, सहा कन्यकांद्वारे वाढविले जाते. ह्या सहा कन्यका म्हणजेच कृत्तिका. व त्या मुलाच्या धातृ मातांच्या मुळेच भगवान शंकरांच्या त्या योध्द्या पुत्राला नाव पडले कार्तिकेय. एक कथा पुरांणांकध्ये अशी आहे की, कृत्तिका म्हणजे सहा ऋषिपत्न्या आहे. सप्तर्षी नावाच्या नक्षत्रातील सहा ऋषिंच्या सहा पत्न्या म्हणजे कृत्तिका. संभूती, अनुसुया,क्षमा,प्रीती,सन्नती,अरुंधती आणि लज्जा अशी ह्या कृत्तिकांची नावे आहेत. ( तर सातवे ऋषि वसिष्ट हे त्यांच्या पत्नी सहीतच, सप्तर्षी तारका समुहामध्ये आहेत. वसिष्ट व त्यांची पत्नी अरुंधती, ही एक जुळी ता-यांची रचना आहे. हे दोन्ही तारे, एकमेकांभोवती, अत्यंत संथ गतीने, एकमेकांभोवती फिरत असतात. या विषयी विस्ताराने पुन्हा कधी तरी ) भारताप्रमाणे अन्य संस्कृतींमध्ये देखील, या तारकासमुहाला वेगवेगळ्या नावाने आणि कथांनी ओळखले जाते. मुळ अमेरीकन संस्कृतीमध्ये देखील एक कथा येते. सात मैत्रिणी एकदा, चांदण्या रात्री, गम्मत, छंद म्हणुन दुरवर एका ठिकाणी नाचगाण्यासाठी जातात. तिथे गेल्यावर, नाच गाणे सुरु असताना, अचानक जंगली श्वापदे चहुबाजुंनी त्यांना घेरुन , ठार करणार, इतक्यात, त्या मुली, ज्या खडकावर उभ्या असतात, त्या खडकालाचा प्रार्थना करतात की त्या प्राण्यांपासुन वाचव म्हणुन. क्षणार्धात, तो खडक, असाच्या असा जमीनीपासुन, उंच उंच वाढु लागतो, व एक मोठा पर्वताचा सुळकाच त्या ठिकाणी उभा राहतो. पुढे जाऊन ह्या मुली तारका बनुन आकाशात जातात व तो सुळका आजदेखील उत्तर अमेरीकेमध्ये डेव्हिल्चा मनोरा किंवा पर्वत म्हणुन ओळखला जातो. प्राचीन ग्रीक सभ्यता देखील ह्या तारका म्हणजे मुली आहेत असेच मानायची. ग्रीकांच्या कथेमध्ये, या मुलींच्या मागे कुणी जंगली प्राणी लागलेले नसतात, तर ओरायन नावाचा शिकारी लागलेला असतो. सात वर्षे पळुन पळुन थकल्यावर त्या मुली झीऊस नावाच्या ग्रीक देवतांच्या राजाची प्रार्थना करुन वाचवण्याची विनंती करतात. झीऊस दयाळु होऊन, त्या सात मुलींना आकाशामध्ये स्थिर आणि सुरक्षित करतो. कृत्तिका या तारका समुहास, इंग्रजीमध्ये प्लेडीस असे म्हणतात. आधुनिक खगोलशात्र मानते की, कृत्तिका तारका समुह १० करोड इतक्या वर्षे वयाचा आहे. आणखी एक मतप्रवाह असा ही या पुंजातील काही तारे २५ लाख वर्षे इतक्या वयाचे आहेत. वैदीक काळात कृत्तिका हे पहीले नक्षत्र मानले जायचे. याचा अर्थ असा होता, सुर्य जेव्हा कृत्तिका नक्षत्रात असायचा तेव्हा वसंत ऋतु सुरु व्हायचा, म्हणजेच दिवस व रात्र सारखे असायचे. शतपथ ब्राम्हण नावाच्या एका ग्रंथामध्ये, असा ही उल्लेख आहे की कृत्तिका पुर्वेपासुन ढळत नाही, तर बाकीची नक्षत्रे पुर्वेपासुन हलतात. हे जर खरे मानले तर, याचा अर्थ असा होईल की पुर्वी कधीतरी दिवस व रात्र एकसमान असण्याची, सुर्य कृत्तिकेमध्ये असतानाची असावी लागेल. वसंत विषुव म्हणजेच (मार्च) इक्विनॉक्स मार्च (चैत्र) मध्ये न येता कार्तिक मध्ये येत असावे. सुर्य चंद्र पृथ्वी यांच्या गतिमानतेमुळे, विषुव व संपात बिंदु (मार्च व सप्टेंबर इक्विनॉक्स) पश्चिमेकडे सरकतात. एकुण २६००० वर्षांनी पुन्हा विषुव व संपात पुन्हा त्याच बिंदु वर येतात, हे आधुनिक खगोलशास्त्राने सिध्द केले आहे. याच विषुव बिंदुच्या सरकण्यामुळे कृत्तिका हल्ली पुर्वेला उगवत नाही. उलट गणिते करुन कृत्तिका पुर्वेला उगवायचे हे सिध्द केले गेले आहे. तो काळ होता इस पुर्व २५०० वर्षापुर्वीचा. त्यामुळे, भारतातील नक्षत्रांची यादी जगातील सर्वात जुनी आणि गणितीय सिध्दांतावर आधारीत अशी वैज्ञानिक यादी आहे. याच तारका समुहा मधील HD 23514 नावाच्या एका, सुर्यापेक्षाही मोठ्या ता-याभोवती, धुलीकण सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रंज्ञांच्या मते, धुलीकण सापडणे म्हणजे ता-याभोवती ग्रहांच्या निर्मितीची प्रक्रिया असु शकते. पुढच्या वेळी अशाच एखादी आकाशातील चित्तरकथा जाणुन घेऊयात. आकाशदर्शन आपणा सर्वांनाच आवडते. यासाठीच आम्ही प्रत्येक महिन्यास, काळोख्या रात्रीच्या आसपासच्या शनिवार-रविवारच्या रात्री, आकाशदर्शनच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो. आमचा पुढील आकाशदर्शन (Stargazing near Pune) कार्यक्रम येत्या २५ जानेवारी रोजी आयोजित केला आहे. नावनोंदणी व अधिक माहिती साठी कृपया इथे क्लिक करा.
“हरी अनंत हरी कथा अनंत“ हे हिंदी भक्तिगीत आपण ऐकले असेलच. हरी म्हणजे तो जगन्नियंता. तो सर्वव्यापक, सर्वशक्तिमान की ज्याच्या कल्पनेने हे विश्व जन्माला आले आहे. किंवा हे विश्व म्हणजे ज्याची नुसती लीला आहे. या ब्रह्माम्डाचा पसारा किती असेल तर अनंत आहे. हे ब्रह्मांड अनंत आहे. त्यास आदी नाही की त्यास अंत ही नाही. आपण आपल्या इंद्रीयाच्या मदतीने या विश्वाचे, ब्रह्माम्डाचे आकलन करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण हे ब्रह्मांड नुसते अनादी , अनंत नसुन ते आपल्या इंद्रीयांस अगोचर, अगम्य देखील आहे. तरीदेखील मनुष्याने अगदी प्राचीन काळापासुन या ब्रह्माम्डाचा शोध बाहेर घेण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न केले. या प्रयत्न आपणास बहुतांश यश देखील मिळाले आहे. तरीदेखील आज आपण जेवढे जाणतो ते खुपच तोकडे आहे.या आकाशाविषयी जलद गतीने अभ्यास मागच्या दोन तीन शतकांमध्ये झाला असे अनेकदा म्हंटले जाते. पण हे सत्य नाहीये. आकाश किती व्यापक आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचे वर्तन काय आहे या विषयी खुप खोलवर अभ्यास भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासुन सुरु आहे. ज्ञात लिखित उपलब्ध ग्रंथसंपदेवरुन असे समजते की भास्कराचार्य पहिले व दुसरे यांनी खगोल शास्त्रावर विपुल लिखाण केले. त्यांच्या अनेक सिध्दांताचा आधार वेद वेदांतच होते. वराहमिहिर, आर्यभट हे मागील सहस्त्राकातील अभ्यासक देखील खुप मोलाचे कार्य करुन गेले. तेच काय तर अगदी आपल्या मराठी संत साहित्यामध्ये देखील अंतरीक्ष, म्हणजे आकाशाचे सर्रास वर्णन पहावयास मिळते. उदाहरण दाखल इथे ज्ञानेश्वर माऊलींच्या काही ओव्या देत आहे ज्यामध्ये त्यांनी आकाशाच्या मुलभुत गुणधर्माविषयी सांगितले आहे. आकाश कसे आहे हे माहित असल्याशिवाय त्याचे संदर्भ किंवा उपमा ते वापरु शकले नसते. इतकेच काय तर सामान्य जीवनातील समस्या किंवा समाधान या विषयी बोलताना त्यांनी आकाशाचे संदर्भ दिले आहेत. याचा अर्थ माऊलींच्या श्रोत्यांना देखील आकाशाविषयी व त्याच्या स्वभावाविषयी ज्ञान होतेच. सातवा अध्याय योगमायेचे पडद्यामुळे । ते झाले असती आंधळे । म्हणोनि प्रकाशाचेही बळें । न देखती मज ॥१५८॥एरवी मी नाही । ऐसे कवण वस्तुजात, पाही । कवण जळ रसविरहित राही । सांग अगा, ॥१५९॥पवन कोण न शिवे? । आकाश कोठे न समावे? । हे असो, एक मीचि आघवे । विश्वीं असे ॥१६०॥ बारावा अध्याय वन्हिची ज्वाला जैसी । वायां जाये आकासिं । क्रिया जिरों दे तैसी । शून्यामाजि ॥३२ ॥ व्यापक आणि उदास । जैसें हें आकाश । तैसें जेयाचें मानस । सर्वगत ॥ १८० ॥ जो निंदेतें नेघे। स्तुतितें न श्लाघे । आकाशा न लगे । लेपु जैसा ॥ ६ ॥ हे आकाश कसे आहे? तर ते अनादी आहे! अनंत आहे! अनंत शब्दाचा अर्थ स्पष्ट आहे. ज्याला अंत नाही असे , ते अनंत. त्या सोबतच ज्याची सुरुवात आपणास माहित नाही ते म्हणजे अनादी. आपण पुर्वीपासुन अनादी व अनंत हे शब्द ऐकत आलो आहे. स्वा. सावरकरांची अजरामर कविता “अनादी मी अनंत मी” तर आपल्या सारख्या करोडो मराठी भाषिकांच्या मनावर कायमची कोरली गेली आहे. एकीकडे या ब्रह्मांडाची व्यापकता, ब्रह्मांडाची विस्तार पाहिला की आपणास आपल्या या क्षुद्र मन,अहंकार, बुध्दी जनित स्वःत ची किव आल्यावाचुन राहत नाही. तर दुसरीकडे सावरकरांसारख्या लोकोत्तर माणसाने स्वःतविषयी अर्थातच या समस्त मानवजाती विषयीच एवढे धाडसी विधान करणे हे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजु असल्यासारखी ही दोन विधाने आहेत. आकाश अनंत त्यात आकाशगंगा अनंत, प्रत्येक आकाशगंगेमध्ये तारे (आपल्या सुर्यासारखे) अनंत, आणि ता-यांभोवती फिरणारे ग्रहगोल देखील अनंत. आधुनिक खगोलशास्त्राने (हबल दुर्बिणीच्या मदतीने) या विश्वातील (ब्रह्मांडातील) विविध आकाशगंगांचे निरीक्षण केले. या निरीक्षणात मनुष्यालाअ असे समजले की या ब्रह्मांडामध्ये २०० अब्ज आकाशगंगा आहेत. एक अब्ज म्हणजे १,००,००,००,००० एवढी मोठी संख्या आहे. दोनशे अब्ज म्हणजे २००,००,००,००,००० म्हणजे २ या संख्येवर ११ शुन्य. २०० अब्ज आकाशगंगा या अशा आहेत की ज्या आपणास माहित आहेत. त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त आकाशगंगा ब्रह्मांडामध्ये असण्याची शक्यता आहे. म्हणजे आपली आकाशगंगा सोडली तर किंवा आपली आकाशगंगा विनाश पावली तरी ब्रह्मांडामध्ये १९९९९९९९९९९९ इतक्या आकाशगंगा शिल्लक राहतील. ब्रह्मांडाच्या चलन वलनावर फारसा परिणाम होणार नाही. हबल डीप फिल्ड दुर्बिणीतुन आपण जेवढे पाहु शकलो, तेवढेच हे ब्रह्मांड आहे का? तर याचे उत्तर “कदाचित नाही” असे आहे. हबल ची पाहु शकण्याची क्षमता तेवढी आहे. या क्षमतेच्या पलीकडे असणारे ब्रह्मांड आपण कसे पाहु शकणार? यासाठीच पुढील खुपच महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याचे नाव आहे जेम्स वेब्ब दुर्बिण. वेब्ब दुर्बिणी इन्फ्रा रेड किरणांच्या मदतीने, अनंत आकाशाच्या शक्य तितक्या दुरवर असलेल्या आकाशगंगा, तारे पाहण्याचे काम करणार आहे. वेब्ब दुर्बिणीविषयी अधिक माहिती करुन घेण्यासाठी खालील व्हिडीयो अवश्य पहा. आता आपण आकाशगंगा म्हणजे नेमके काय हे पाहुयात. आकाशगंगा म्हणजे असंख्य अशा ता-यांचा समुह. या समुहातील तारे एका विशिष्ट गतीने व विशिष्ट कक्षेमध्ये, एका विशिष्ट केंद्राभोवती सद सर्वदा भ्रमण करीत असतात. आकाशगंगेचा विस्तार खुपच मोठा असतो. माणसास ज्ञात असलेल्या आकाशगंगापैंकी सर्वात जवळची व आपण (म्हणजे आपली सौरमाला) ज्या आकाशगंगेमध्ये आहोत तिला दुग्ध मेखला किंवा नुसतेच आकाशगंगा असे म्हंटले जाते. आपल्या या दुग्धमेखले मध्ये म्हणजेच आकाशगंगेमध्ये किती तारे आहेत? तर एक प्राथमिक अंदाज याचे उत्तर २०० अब्ज तारे असे देतो. पुन्हा एकदा वर दोनशे अब्ज म्हणजे नक्की किती वाचा. आपल्या दुग्धमेखला या आकाशगंगेचे आमच्या कॅम्पसाईट वरुन केलेले चित्रण वर आहे यापुढे आता आपण पाहुयात सुर्य म्हणजे काय ते. सुर्य म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन वर सांगितलेल्या, आपल्या आकाशगंगेतील २०० अब्ज ता-यांपैकी एक साधारण असा तारा आहे. म्हणजे आपला सुर्य सोडला तर किंवा आपला सुर्य विनाश पावला तरी आकाशगंगेमध्ये १९९९९९९९९९९९ इतके तारे शिल्लक राहतील. आकाशगंगेच्या परिचलनावर आपल्या सौरमालेच्या असण्याने किंवा नसण्याने फार काही फरक पडणार नाही. सुमारे पाच पैकी एका सूर्याएवढ्या आकाराच्या ताऱ्याभोवती पृथ्वीएवढ्या आकाराचा परग्रह त्या ताऱ्याच्या वास्तव्य योग्य क्षेत्रामध्ये परिभ्रमण करतो असा अंदाज लावला जातो. म्हणजे आकाशगंगेमध्ये २०० अब्ज तारे आहेत असे मानले, तर असा अंदाज लावता येतो की, आकाशगंगेमध्ये पृथ्वीएवढ्या आकाराचे संभाव्य वास्तव्य योग्य ११ अब्ज ग्रह आहेत. वर सांगितलेली सर्व माहिती नीट समजण्यासाठी खालील व्हिडीयो अवश्य पहा. हे वर जे काही आकडे मी लिहिले आहेत ते सर्व त्या अनंतातील अगदी क्षुद्र आकडे असण्याची शक्यता आहे. ज्ञात ब्रह्मांड एवढे मोठे आहे की आपण त्याची कल्पना देखील करु शकत नाही तर अज्ञात ब्रह्मांड केवढे असेल आणि किती विस्तीर्ण असेल, किंवा अद्याप आपणास जे प्रश्न पडले देखील नाहीत अशा प्रश्नांची उत्तरे देखील या अज्ञात ब्रह्मांडामध्ये दडली असण्याची शक्यता आहे. तर हे अनादी अनंत आकाश की जे सर्वत्र आहे, दुरवरच्या आकाशगंगांमध्ये ही आहे व अगदी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी पेशीत देखील आहे, त्याच आकाशाचा शोध घेण्याची मानवी मनाची हौस कधी पुर्ण होईल की नाही? यापुढील माझ्या लेखांमध्ये वाचा, आकाशातील विविध चित्तरकथांच्या मालिकेतील धनुर्धराची कथा, पुढील आठवड्यात. धन्यवाद आपला हेमंत सिताराम ववले निसर्गशाळा, पुणे फ्लेमिंगोस मराठी मध्ये रोहित किंवा हंसक असेही म्हणतात रोहित पक्ष्यांच्या अदभुत दुनियेविषयी माहिती करुन घेण्यासाठी इथे क्लिक करा. Upcoming events 19 April 2024 Adventure Camp Kids Event Huppya
Whats is a “देवराई”? Its the flora and fauna preserved by the people of the land for centuries in the name of god. We have almost 6 such groves in the perimeter of 10 kms of our camping sites. Many campers ask me what is this “देवराई” . Here is some light on what it really is and how such practices make us unique globally. When the world realized, the threat of global warming, deforestation, our ancestors already have been learning and teaching generations to preserve,protect the ecosystem for thousands of years. Lets understand what’s this.. To make the environment sustainable, a number of measures are necessary to be taken up by the people and government across the globe. Some of these measures are- use of efficient and eco-friendly technologies, sustainable use of resources and adoption of indigenous practices like keeping of sacred groves. Here in the current article we are going to discuss about sacred groves, their meaning, importance and practices. The word sacred means: considered to be holy or ‘connected with a god’ and the word ‘Grove’ means: a small area of land with trees of particular types grown on it. Thus by combining these two words the final dictionary meaning of the couple of words Sacred Groves is: “A small area of land with particular types of trees grown on it and that are considered to be holy by the local human community. In other words Sacred Groves can be defined as below- An area with particular types of trees dedicated to local deities or ancestral spirits that are protected by local communities through social traditions and taboos incorporating spiritual and ecological values are called as sacred groves. Indian Practice of keeping Sacred Groves The presence of sacred groves of India has been documented since the early 1800s. Sacred Groves of India comprise trees like Deodara (Cedrus deodara), considered to be the “abode of Gods” Sal (Shorea robusta), Rudraksha (Elacocarpus species), Bael (Aegle marmelos), and Ashok (Saraca asoca), and kadam (Anthocephalus kadamba), Pipal (Ficus religiosa), Neem (Azadirachta indica), Banyan tree (Ficus benghalensis): native to India, Mango tree (Mangifera indica) and bushes like, Basil (Ocimum basilicum & Ocimum minimum) (native to India and Iran) and grass like Doob or Durva (cynodon dactylon) etc. See a video of our guests, involved in an activity of One with Nature @ a Devrai, the sacred grove near Pune To visit such sacred grove, and also to have best ever camping experience, Let’s go camping
आपल्या सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याचे बेलाग सुळके, अतिखोल द-या ,श्वास रोखायला लावणारे कातळ कडे. सह्याद्रीची ओळख म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभारलेले, गगनचुंबी अभेद्य गडकोट. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथली हजारो वर्षांची महान संस्कृती. सह्याद्री ची ओळख म्हणजे याच संस्कृतीतुन जन्माला आलेले एक लोकोत्तर नर-रत्न – छत्रपती शिवाजी. सह्याद्री ची ओळख म्हणजे शिवाजी राज्यांच्या सोबत, कधी कधी त्यांच्याही पुढे जाऊन, प्राणांची बाजी लावणारे सह्याद्रीचे लाखो करोडो सुपुत्र म्हणजे मावळे. सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याच्या अंगाखांद्यावर उगम पावुन, पुर्व दिशेचा लाखो-करोडो हेक्टरचा प्रदेश सुपीक करणा-या नद्या. सह्याद्रीची ओळख म्हणजे कातळ कड्यांवरुन बेधुंद होऊन, खोलवर द-यांमध्ये उड्या घेणारे, स्वतःला झोकुन देणारे हजारो धबधबे. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथला मोसमी, बहारदार पाऊस. सह्याद्रीची ओळख म्हणजे… सह्याद्रीची ओळख नव्याने माझ्या सारख्या भटक्याला अगदी रोज होत असते. जेव्हा जेव्हा मी निसर्गात, सह्याद्रीच्या राकट प्रांगणात जातो तेव्हा तेव्हा, मला सह्याद्री नव्याने ओळख होत असते. सह्याद्री नित्य-नुतन जरी मला वाटत असला तरीही, मित्रानो माहितीये का तुम्हाला की सह्याद्री जगातील सर्वात वयोवृध्द डोंगररांगांमधील एक आहे. सुमारे १५ करोड वर्षांचा आहे बरका आपला लाडका सह्याद्री. म्हणजे १५ करोड वर्षांपुर्वी सह्याद्री (दख्खन पठारासहीत) आशिया खंडाशी जोडला गेला. त्यापुर्वी म्हणजे अंदाजे ४० करोड वर्षांपुर्वी पृथ्वीवर एकच भुखंड होता. मागील शतकातील एक भु-शास्त्रज्ञ आल्फ्रेड वेगेनेर यांनी त्यांचे सगळे आयुष्य खंडांतराच्या (खंडांतर हा मी योजलेला शब्द आहे याला इंग्रजी मध्ये Continent Drifting असे म्हणतात) अभ्यासासाठी वेचले. वेगेनेर यांनी पृथ्वीवरील सर्वात जुन्या, एकमेव असलेल्या भुखंडाला पॅंजेया/पॅंगईया म्हणजे संपुर्ण पृथ्वी असे नाव दिले. साधारण पणे ४५० करोड वर्षापुर्वी, अंतरिक्षामधील धुळ, वायु व इतर अंतरीक्षीय घटकांमुळे पृथ्वीची निर्मिती झाली. त्याच दरम्यान सुपरनोव्हा म्हणजे महाभयंकर विस्फोटामुळे, पृथ्वीचे तापमान वाढुन, धुळीने तयार झालेला तो गोळा वितळला. त्यालाच आपण ज्वालामुखी म्हणतो. हा ज्वालामुखीच जसजसा प्रवाही झाल त पासुन प्रत्यक्ष खडक, पर्वत, डोंगर तयार झाले तेव्हा पृथ्वीवर एकच भुखंड तयार झाला. एकच असलेला हा भुखंड काही काळाने तुटला व अनेक छोटे-मोठे भुखंड वेगवेगळे होऊन पृथ्वीवर विखुरले गेले. खरतर हा खुप मोठा विषय आहे. याविषयी आपण कधीतरी पुन्हा सविस्तर माहिती घेऊ . खालील व्हिडीयो पहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, सह्याद्री व हिमालय कसा अस्तित्वात आला. वर मी सह्याद्रीस वयोवृध्द म्हणालो याचे कारण असे की, हिमालय पर्वत रांग की जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे, ती भारतीय उपखंडाची व आशिया खंडाची धडक झाल्यानंतर अस्तित्वात आली आहे. हिमालयाचा जन्म त्या मानाने खुप अलीकडचा आहे. म्हणुनच सह्याद्रीस मी वयोवृध्द डोंगर असे म्हणतो. सह्याद्रीच्या पुरातन असण्याच्या खाणाखुणा आपणास सह्याद्रीच्या कातळाकड्यांकडे पाहुन दिसतात. नुकताच मी, साल्हेर सालोटा या गडांना भेट देऊन आलो. यातील सालोटाचे कातळ कडे तुटण्याच्या मार्गावर आहेत. एखादा हलका भुकंप देखील सालोट्याचा भुगोल बदलुन टाकेल. अशीच काहीशी अवस्था आपणास सह्याद्री उत्तुंग सुळक्यांची झालेली दिसते. आपल्या मुळशी वेल्हे तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजेच मावळ भाग हा सह्याद्रीचाच भाग होय. मुळशीतील ताम्हिणी म्हणजे हंगामी पावसासाठी भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. तशीच अवस्था भोर – वेल्ह्यातील मावळ पट्ट्याची आहे. कित्येक ठिकाणी पर्जन्यमापकाची उपलब्धता नसल्याने वास्तविक पर्जन्यमान कुठे किती होते याची माहिती मिळत नाही. पण मावळ पट्ट्यात तीन-तीन चार महिने सुर्यनारायणाचे दर्शन होत नाही. काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत इथे वर्षावने होती. ही जंगले इतकी घनदाट होती की उन्हाळ्यामध्ये देखील सुर्यकिरणे जमिनीवर पडत नसत. किर्र्र झाडी, महाकाय वृक्ष, तितक्याच मोठाल्या, जाडजुड, पुरातन वेली हे सारे सह्याद्रीला एका विशिष्ट ऊंचीवर नेऊन ठेवते. सह्याद्रीतील किल्ले हे जितके उत्सुकतेचा विषय आहे तितके जास्त कुतुहलाचा विषय आहे सह्याद्रीतील वनसंपदा. या वनसंपदेमध्ये, दरी-खो-यात, नद्या-नाल्यांत, कातळ-कड्यांवर, धबधब्यांवर, मोकळ्या माळरानांवर एक आख्खी सजीवसृष्टी गेली लाखो वर्षे जगत आहे, हे आपणास ठाऊक आहे काय? नाचणारा बेडुक नावाची एक बेडकाची प्रजाती आहे, ही प्रजाती किमान सात लक्ष वर्षांपासुन सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर नांदते आहे. सरीसृप, उभयचर, जलचर अशा अनेक प्रजाती इथे लक्ष-लक्ष वर्षांपासुन नांदत आहेत. मनुष्यास या सर्वांविषयी जेवढे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त ज्ञान आपण अजुन मिळवायचो आहोत. आपण अनभिज्ञ आहोत. भारताच्या एकुणच हवामानावर परिणाम करणारा मॉन्सुन म्हणजे मोसमी पाऊस भारतात पडतो याचे कारण फक्त आणि फक्त सह्याद्री आहे. एकेकाळी सजीव सृष्टीसाठी नंदनवन असणारा सह्याद्री वर्तमानात सजीवांसाठी शाप ठरत आहे. सजीव म्हणताना मी यांत मनुष्यास देखील मोजले आहे. आज भलेही अज्ञान, दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे मनुष्यास वाटत असेल की तो सुरक्षित आहे, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. व याचे संकेत युनेस्को द्वारे काही वर्षांपुर्वी दिले गेले आहेत. जगातील आठ जागतिक वारसा असलेल्या स्थळांच्या यादीमध्ये सह्याद्रीला स्थान देण्यात आले आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कित्येक सजीव नांदताहेत मित्रहो. फुले येणा-या वृक्ष-वनस्पतींच्या एकुण ७४०२ प्रजाती सह्याद्रीमध्ये आहेत. फुले न येणा-या वनस्पतींच्या अंदाजे १८०० प्रजाती आहेत.सस्तन प्राण्यांच्या १३९ प्रजाती आहेत. पक्षांच्या ५०८ प्रजाती आहेत. १७९ उभयचर, ६००० किटकांच्या प्रजाती, २९० गोड्यापाण्यातील माश्यांच्या प्रजाती आहेत. इथल्या जंगलांची आणखी एक खासियत अशी आहे की, ही जंगले सदाहरीत आहेत. झाडा-झुडूपांच्या इतक्या प्रजाती आहेत की काही झाडांची पाने जरी काही काळापुरती गळली तरी एकुण जंगल मात्र हिरवेगारच दिसते. तुम्हाला हे पहायचे असेल तर याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कोकण दिवा या ट्रेकचा व्हिडीयो अवश्य पहा. सह्याद्री आणि मॉन्सुन चे जसे नाते आहे तसेच नाते सह्याद्री व दुर्मिळ होत असलेल्या प्रदेशनिष्ट (Endemic) प्रजातींचे आहे. जागतिक दृष्टीने पाहिले तर नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीपैकी ३२५ प्रजाती सह्याद्रीमधील आहेत. ही अत्यंत दुखःद गोष्ट आहे. या ३२५ प्रजातींमध्ये २२९ प्रजाती वृक्ष-वनस्पतींच्या, ३१ प्रजाती सस्तन प्राण्यांच्या, १५ पक्ष्यांच्या, ४३ उभयचर, ५ सरपटणारे व एक मासा आहे. यापैकी ५१ प्रजाती कदाचित त्यांच्या अखेरच्या काही पिढ्यांमध्ये आहेत. निसर्गाशी मानवी नाते, काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत तरी सौहार्दाचेच होते असे मी म्हणु शकतो. याचे कारण असे की, मावळ भागातील काही लोकरिती मनुष्य व निसर्ग यातील सौहार्द दाखवणा-या आपणास पहावयास मिळतात. उदा – जेव्हा जुन जुलै मध्ये पावसाला सुरुवात होते, तेव्हा मोठ्या नद्या, धरणांतील मासे अंडी सोडण्याकरीता, नदीच्या उगमस्थानाकडे पोहण्यास सुरुवात करतात. नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने ते पोहतात. हजारो वर्षे मावळात राहणा-या मावळ्यांना, माश्यांच्या या प्रवासाविषयी माहिती अगदी पुर्वापार आहे. असे उलट दिशेने पोहणारे मासे पकडणे व खाणे खुपच सोपे काम आहे. तरीही मावळातील मंडळी, अंडी सोडण्यासाठी प्रवाहाच्या उलट दिशेने जाणारे मासे पकडत नाहीत व खात ही नाहीत. हेच मासे जेव्हा, अंडी सोडतात व पुनः प्रवाहासोबत पोहण्यास सुरुवात करतात तेव्हा, विशिष्ट पध्दतीचे बांबु व लाकडी जाळे तयार करुन मासे पकडले जातात. विशिष्ट पध्दत अशासाठी म्हणायचे की, जाळ्यातील एकेका अटकावाचा आकार एवढा असतो की यात विशिष्ट वयाचाच, विशिष्ट आकाराचाच मास अडकेल. व लहान मासे, की जे अजुन पुर्ण वाढलेले नाहीत ते पुन्हा नदी-धरणात जातात. म्हणजे नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेवर फारसा परिणाम न करताही मावळातील सुज्ञ लोक मांसाहार करीत होते. आजही अशा पध्दती आपणास पहावयास मिळतात. हे नाते देखील, वाढत्या शहरीकरणामुळे , दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींसारखेच, नष्ट होण्याचा मार्गावर आहे. व हेच खरे कारण आहे, सह्याद्रीच्या होत असलेल्या –हासाचे.