आपण म्हणतो की मनुष्य एक समाजप्रिय प्राणी आहे. सोशल स्पेसीज! आपण खरोखर असे समाज-शील , समुहात राहणारे, एकमेकांना पुरक राहिलो आहोत का? एक मनुष्य म्हणुन खरतर प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. परिस्थिती उत्साहवर्धक जरी नसली तरी अगदीच निराशावादी चित्र नाहीये हे मात्र नक्की. कारण मनुष्य जसा समाजशील आहे तसाच तो निसर्गातील इतर घटक, प्राणी यांच्याकडे पाहुन आजवर खुप काही शिकला आहे. सध्या शिकत आहे आणि भविष्यात देखील शिकत राहिल यात शंका नाही. पण त्यासाठी आपण निसर्गाशी जोडलो गेलो तरच हे शक्य होईल. खालील व्हिडीयो मध्ये दिसणारे दृश्य सह्याद्रीमधील भटक्यांसाठी काही नवीन नाहीये मित्रांनो. ज्याने ज्याने एखाद-दोन जरी ट्रेक सह्याद्रीमध्ये केले असतील त्यांना हा मुंग्यांचा गड नक्कीच दिसला असेल. आम्ही ज्या डोंगर भटक्या ज्येष्टांकडुन ट्रेकींग करायला शिकलो त्यांच्या कडुन आम्हाला या रचनेला ‘गड-मुंगी’ म्हणतात असे समजले. याची विशिष्ट रचना, की जी एखाद्या अभेद्य किल्ल्याच्या तटबंदीसारखी, वर्तुळाकार तटांची बनवलेली असते, ती खरतर वास्तु-स्थापत्या मधील एक अदभुत नमुना आहे. मध्यवर्ती एक द्वार असते, साधारण ३ इंच त्याच्या परिघ असेल. हेच या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार होय. यातुनच आत-बाहेर ये-जा केली जाते. य द्वाराच्या ऊंची सर्वात जास्त असते. जमीनीपासुन साधारण आठ इंचापर्यंत उंची मुख्य द्वाराची असु शकते. त्या भोवताली एखाद्या पाकळ्यांप्रमाणे एका आड दुसरा, मग तिसरा मग चौथा असे तट, ऊंची कमी कमी असलेले बनवलेले असतात. जर असा गड एखाद्या उतारावर असेल तर चढाच्या बाजुने प्रत्येक तटाची ऊंची जास्त असते व उताराकडे ती कमी झालेली असते. या गडांची बांधणी या मुंग्या मुख्यत्वेकरुन पावसाळ्यामध्येच करतात. या बांधकामासाठी सभोवतालची माती मुंग्य गोळा करतात. एक मुंगी ती केवढी आणि तिच्या मुखामध्ये केवढे अशी माती, ती आणु शकणार बरे? इवलासा मातीचा कण प्रत्येक मुंगी घेऊन येते आणि वेगवेगळ्या तटांवर लावते. अभ्यासकांच्या मते, या मातीच्या कणामध्ये मुंग्या त्यांच्या तोंडातुन लाळ किंवा तत्सम द्रव मिसळुन, त्या मातीला चिकट पणा आणीत असाव्यात. या व्हिडीयो मध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की ज्या तटांचे काम पुर्ण झालेले आहे ते तट चकचकीत, गुळगुळगुळीत आहेत. अगदी प्लास्टर केलेल्या भिंतीसारखेच. व बाहेरच्या तटांचे काम अद्याप सुरु असल्याने ते तट तुम्हाला थोडे खडबडीत दिसतील. या विशिष्ट रचनेचे प्रयोजन काय असावे बरे? पावसाच्या पाण्यामुळे जमिनीखालील मुंग्याची वसाहत व्यवस्थित रहावी हेच या रचनेचे मुख्य प्रयोजन असावे असे वाटते. वेगवेगळ्या तटांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या देखील, आणखी बाहेरच्या तटात उघडताना दिसतात. कदाचित पावसाचे पाणी जर पडले तर ते या तटीय रचनेमुळे बाहेर बाहेरच्या तटांत जाऊन शेवटी गडाबाहेर जावे यासाठीच या रचनेचा हेतु असावा. आपल्याकडे मराठी भाषेत या मुंग्यांना वेगळे काही नाव आहे असे ऐकिवात नाही. इंग्रजी मध्ये या मुंग्यांची ओळख Pheidole sykesii अशी केली गेली आहे. या ओळखीमध्ये देखील अद्याप एकमत नाहीये. बायोडाव्हरसिटी लायब्रेरीच्या एका पुस्तकात या मुंग्यांचा उल्लेख सापडतो. या व्यतिरिक्त डोंगर भटक्यांना जर या गड-मुंग्या व त्यांच्या गडा विषयी अधिक माहिती असेल , भविष्यात उपलब्ध झाली तर अवश्य आम्हाला पाठवा. तुमच्या नावासहीत ती माहिती या पानावर संग्रहीत केली जाईल. पहा गड-मुंगीचा हा व्हिडीयो. आवडल्यास नक्की फॉरवर्ड/शेयर करा. धन्यवाद हेमंत सिताराम ववले निसर्गशाळा पुणे
आपला सह्याद्री अनेक गोष्टींसाठी प्रसिध्द आणि आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली, बहरलेली संस्कृती कशी होती, कशी आहे या विषयी आपण एका लेखामध्ये माहिती घेतली आहेच. तुम्हाला सह्याद्री व त्याची संस्कृती विषयीचा लेख वाचायचा असेल तर इथे क्लिक करा. सोबतच आपण सह्याद्री मधील विविध बेडकांच्या जाती-प्रजाती विषयी देखील माहिती घेतली आहे. सह्याद्रीच्या रानावनांत कोणकोणत्या भाज्या (रानभाज्या) उगवतात व त्या बनवाव्या कशा या विषयी देखील आपण सविस्तर माहिती घेतली आहे. पश्चिम घाटातील बेडुक देखील अभ्यासाचा विषय आहे. या विषयी अधिक माहिती इथे क्लिक करुन मिळेल. आज आपण सह्याद्री तील आणखी एका वैशिष्ट्यपुर्ण जीवा विषयी माहिते करुन घेणार आहोत. तो म्हणजे सह्याद्रीतील खेकडा! माझा ट्रेकिंग पार्टनर अरविंद एक भला मोठा मुठा हातात घेऊन.. आपल्या शहराच्या मावळ पट्ट्यात आढळणा-या दोन मुख्य खेकड्याच्या जाती म्हणजे मुठा खेकडा व काळा खेकडा या होय. पावसाळा सुरु होण्यापुर्वी दुर्गम भागातील लोक जीवनावश्यक सामग्रीची खेरेदी करुनच ठेवतात यात किराणा माल मुख्य असतो. याचे कारण असे की पावसामुळे तालुक्यच्या ठिकाणी जाणे त्यांना शक्य नसते. या सामग्री सोबतच मोट्या प्रमाणात सुकी मासळी देखील विकत घेतली जाते. रानभाज्या व परसबागीतील भाज्यांमुळे फायबर, विटामिन इत्यादींची पुर्तता होते पण प्रोटीनसाठी सुकी मासळी, नदी-नाल्यातील मासे, खुबे व खेकडे यांच्यावर अवलंबुन राहावे लागते. खेकड्यांमुळे भातखाचरांना देखील नुकसान होऊ शकते. भाताची रोपे लहान असताना, खेकडे ही रोपे खाऊ शकतात व त्यामुळे शेतक-यांची मेहनत वाया जाते. त्यामुळे देखील शेतीच्या आसपासच्या परीसरातील खेकडे पकडणे शेतक-यांसाठी अनिवार्य होऊन जाते. मुठा जातीचा खेकडा मी खेकड्यांचा व संस्कृतीचा काही संबंध आहे का हे तपासण्याचा प्रयत्न केल्यावर मला समजले की महादेव कोळी या समाजामध्ये बाळंतिण पुजे मध्ये खेकड्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा काही भागात आहे. तसेही अन्न पुरवठा म्हणुन खेकड्यांचा वापर हा देखील संस्कृतीचाच एक भाग आहे. खेकडा, या विषयावर देखील संशोधनास खुप वाव आहे. ज्याप्रमाणे समुद्रकिनारी खेकड्याची शेती केली जाते त्या प्रमाणेच, पश्चिम घाट माथ्यावर, जिथे खुप जास्त पाऊस पडतो, अशा भागात, जमिनीवरील खेकड्यांची शेती करण्यासाठी खुपच पोषक वातावरण आहे. यामुळे हजारोंच्या संख्येने रोजगार निर्मिती होऊ शकेल. तरुण पिढीने, अभ्यासकांनी, धोरणे बनविणा-यांनी या विषयाकडे देखील लक्ष दिले पाहिजे. आपली कॅम्पसाईट ज्या भागात आहे तिकडे खेकडे पकडण्याचे काम अगदी प्रत्येक घरातील माणसे करतात. प्रत्येक घरी आठवड्यातुन किमान एकदा तरी खेकड्याचे कालवण होतेच होते. खेकडे पकडण्यासाठी (आणि मासे देखील) ही मंडळी एका विशिष्ट साधनाचा उपयोग करतात. हे बांबुचे बनविलेले असते. याला गडदे/गडद असे म्हणतात. या गडद्यामध्ये खेकड्यांसाठी काहीतरी खाद्य टाकले जाते जसे गांडुळ, चिकनचे आतडे, खेणखतातील मोठाले गोल किडे, इत्यादी. खेकडे या गडद्यामध्ये आले की त्यांना बाहेर पडता येत नाही त्यातुन. तुम्ही जर कधी आमच्या कॅम्पसाईट ला आलात तर आवर्जुन गडदे कसे असते हे पहा. लहान मुले देखील खेकडे पकडु शकतात. त्यासोबत खेकडे पकडण्यासाठी आणखी एक पध्दत वापरतात. ती म्हणजे एखाद्या लांब काठीच्या टोकाला गांडुळ अथवा खेकड्याचे कोणतेही खाद्य बांधुन, त्या काठीचे टोक खेकड्याच्या बिळात घालायचे. खाद्याच्या वासाने खेकडा, ते खाद्य खाण्यासाठी त्या काठीला पकडण्याचा प्रयत्न करतो. काठीला थोडे हिसके बसले की पकडणाराला समजते की खेकडा आहे असे. मग हळु हळु ती काठी वर वर उचलायची. काठीच्या पाठोपाठ खेकडा देखील बाहेर येतो, मग चतुराईने, खेकड्याला, त्याच्या पाठीच्या बाजुने पकडायचे. हाताने पकडने हे थोडे जिकीरीचे काम आहे. खेकडा विषारी जरी नसला तरी त्याचा चावा मजबुत असतो. त्यामुळे तुम्हला जर खेकडा हाताने पकडण्याचे कसब माहित नसेल तर त्यापासुन लांब थांबलेले कधीही शहाणपणाचे होय. खालील व्हिडीय मध्ये पहा गडद्यामध्ये खेकडा पकड्याची पध्दत! खेकड्याचे कालवण (कालवण म्हणजे रस्साभाजी) माझे वडील, आम्हाला एक किस्सा नेहमी सांगायचे. माझ्या आईचे माहेर म्हणजे वारकरी कुटुंब. माहेरी त्यांच्याकडे वशाट कधी कुणी केले ही नाही आणि खाल्ले ही नव्हते. लग्नानंतर, बाबुजींनी (वडीलांना आम्ही बाबुजी म्हणायचो!) एकदा खेकडे आणले घरी व आईला कालवण करायला सांगितले. मटण शिजवतात तसे तिने खेकडे, आधी शिजायला ठेवले. पाच मिनिटे गेली, दहा मिनिटे गेली, अर्धा तास, एक तास होऊन गेला, तरीही खेकडे काही शिजेनाच. आई वेळोवेळी हाताने , पातेल्यातील खेकडे दाबुन पहायची. बाबुजींनी विचरले झाले का कालवण, त्यावर ती म्हणाली की खेकडे शिजतच नाहीत. अजुनही कडकच आहेत. तिच्या या उत्तरावर बाबुजींनी कपाळावर हात ठेवला व तिला खेकडा कसा शिजवतात हे शिकवले. तर खेकड्याचे कालवण करणे व ते देखील चवदार, ही एक कलाच आहे. ग्रामीण भागात, प्रत्येक घरात या कलेतील पारंगत गृहीणी अजुनही आहेत. इतक्या वर्षात माझी आई जसे खेकड्याचे कालवण तितके चवदार मी इतरत्र कुठेही खाल्लेले नाही. माझ्या आईच्या हातचे खेकड्याचे कालवण आणि घुग-याचे (काळे घेवडे) कालवण खायला मिळण्यासाठी भाग्य लागते बरका! खालील व्हिडियोमध्ये पहा, खेकड्याचे कालवण करण्याची कोकणी पध्दत. आमच्याकडे कॅम्पिंग ला आलात व खास आग्रह केलात तर आपण मिळुन खेकडे पकडण्यासाठी जाऊ शकतो ;). आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर अवश्य शेयर,फॉरवर्ड करा. आपला हेमंत सिताराम ववले निसर्गशाळा, पुणे. Our Upcoming Events July 2023 Jul 15 15 July 2023 Walk through Clouds & Camp Calling all dreamers and adventurers! Are you ready to experience the extraordinary? Join us on an enchanting journey as we walk through clouds, transcending the ordinary and embracing pure wonder. […] Find out more Jul 22 22 July 2023 Extreme Adventure & Camping Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Calling all adventure enthusiasts! Join us for an adrenaline-pumping Waterfall Rappelling & Monsoon Camping experience at Nisargshala! Feel the rush as you descend down roaring falls and immerse yourself in […] Find out more Jul 29 29 July 2023 Trek to Andhari Jungle & Camping Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Experience Monsoon Magic: Join Our Andhari Jungle Trek & Monsoon Camping at Nisargshala Immerse yourself in the enchanting monsoon season! Join our weekend trek to Andhari Jungle and experience the […] Find out moreAugust 2023 Aug 14 14 August 2023 Thrilling Monsoon Camp for Families Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India A thrilling adventure for entire family, walk through clouds , river crossing and waterfall rappelling. Please click here below to register Find out moreSeptember 2023 Sep 30 30 September 2023 Kutuhal – Younger Kids Camp Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Secure your child’s spot today and let them embark on a magical journey amidst Sahyadri’s natural beauty near Pune. Nature Explorers Camp awaits, ready to create lifelong memories in the […] Find out moreNovember 2023 Nov 25 25 November 2023 Huppya : Kids Nature & Adventure Camp Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Our kids the magic touch of nature, they need to listen to the enchanting music of nature, they must take dip
जुलै महिन्यामध्ये नदी, नाले, ओढे यांना अक्षरशः पुर आणणारा असा झोडपुन काढणारा पाऊस आपण अनुभवला. नदी नाले ओढेच काय घेऊन बसला, आपल्या रस्त्यांवर देखील पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यातच आपले रस्ते व रस्त्यावरील खड्डे यामुळे तर सर्वांनाच हैरान करुन टाकले. मुंबई मधील रस्त्यांवरील महापुर, वाहतुकीच्या समस्या, रेल्वेचे अपघात, दरडी कोसळणे, बांध फुटणे हे सर्व याच महिन्यात होत असते. यावर्षी अतिशय समाधानकारक असा आषाढातील पाऊस झालेला आहे. आषाढातील या पावसाचे हेच तर वैशिष्ट्ये आहे. उन्हाळ्यामध्ये तप्त झालेल्या धरेला तृप्त करणारा, पावसाळ्याच्या सुरुवातीचा पाऊस पेरण्यांसाठी खुप गरजेचा असतो. एकदा पेरण्या झाल्या, भाताची रोपे वीतभार वाढली की मग भातलावणी सुरु होते. या भातलावणी साठी मात्र हलका पाऊस काही कामाचा नसतो. मुसळधार पाऊस पडला नाही तर भात-खाचरे पाण्याने तुडूंब भरणार नाहीत. शहराच्या पश्चिमेला असलेल्या मावळपट्ट्यात, आषाढामध्ये भातलावण्या पुर्ण होतात. श्रावण सुरु होण्यापुर्वीच भात लावण्या झालेल्या असतात. शेतकरी एव्हाना भातलावणी करुन, पेरण्या करुन मोकळा झालेला असतो. अत्यंत धामधुमीचा आषाढ शेतक-यंसाठी कष्ट करण्याचा असतो. आषाढ संपला की मग मात्र सुरु होतो आनंदोत्सव. हा आनंदोत्सव नुसता शेतक-यांसाठीच नसतो, तर तो असतो अवघ्या सृष्टीसाठी. वादळ-वारे एव्हाना शांत झालेले असतात. मुसळधार, झोडपुन काढणारा पावसाची जागा रिमझिम श्रावण सरींनी घेतलेली असते. उन पावसाचा लंपडाव सुरु होतो. त्यातच सप्तरंगी इंद्रधनुष्य, कुठेना कुठे क्षितिजावर मनमोहक नजारा तयार करीत असतो. आषाढातील जीवघेण्या पावसाने सर्वांनाच अक्षरशः नकोसे झालेले असते. मनुष्य जेव्हा शेतीच्या कामात व्यस्त असतो आषाढामध्ये तेव्हा, निसर्गातील इतर प्राणी, पक्षी देखील या जीवघेण्या पावसापासुन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कष्ट उपसत असतात. सर्वांनाच आतुरता असते श्रावणाच्या शुभागमनाची. इतके दिवस पावसाने कहर केलेला असल्याने निसर्गाकडे, निसर्गाच्या सौंदर्याकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही. पण श्रावणात मात्र उसंत मिळालेल्या माणसाला निसर्गामध्ये झालेल्या अदभुत अशा बदलांचे दर्शन होते. श्रावणातील निसर्गाने भारतातील प्रत्येक भाषेतील साहित्यिकांना मोहीनी घातलेली आपणास दिसते. मराठी मध्ये तर श्रावण आणि कविता, सुमधुर गीते असे समीकरणच झालेले आहे. चला तर मग जाऊयात एका अदभुत अशा श्रावण सफरीवर. विविध कवि, कवयित्रींनी रचलेल्या अजरामर अशा श्रावण-कविता, श्रावण-गीतांनी मराठी मनावर कायमची छाप उमटवलेली आपणास दिसते. मंगेश पाडगावकर कवि म्हणुन प्रसिध्द तर आहेतच पण या श्रावणाने त्यांच्यातील हळवा तत्वज्ञानी, सत्यान्वेषी देखील आपणास दाखवला. श्रावणात त्यांना गवसलेल्या अंतर्यामीच्या सुराचा किनारा मात्र त्यांना सापडला नाही. लता मंगेशकरांच्या सुमधुर आवाजातील हे गीत श्रावणात होणा-या अंतर्यामीच्या मृदुल हिंदोळ्यांचे रुप आपणास शब्दात आणि सुरांत दाखवतात. श्रावणात घन निळा बरसला https://youtu.be/HlqUzghyic8?t=16 श्रावणाचे नाव घ्यावे आणि बालकवींच्या ‘श्रावणमानसी हर्ष मानसी’ य कवितेच्या ओळी आठवणार नाहीत असा मराठी माणुस शोधुन सापडणार नाही. श्रावणमासी हर्ष मानसी https://youtu.be/cP46RcOa7zo कवी कुसुमाग्रजांना श्रावण हासत नाचत येताना दिसतो. गानसम्राज्ञी पद्मजा यांच्या आवाजातील हे श्रावणगीत, कुसुमाग्रजांच्या श्रावण विश्वाचे दर्शन घडाविणारे आहे. हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला https://youtu.be/-AtJvXQRoaM श्रावणात निसर्गाने जणु एक आगळेच, विलोभणीय रुप घेतलेले असते. निसर्गाचे हे रुप कवयित्री इंदिरा संत यांना, एखाद्या मनस्वी चित्रकाराने चितारलेले निसर्गचित्रच भासते. या निसर्गचित्रामध्ये स्पदने आहेत. जिवंतपणा आहे. चेतना आहे. इंदिरा संत यांची कविता – श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण? घातले, झाडले चाफ्याचे शिंपणबांधले, तोडले इंद्राचे तोरण;झाकला, काढला दरवाजा घराचाविझला, तेवला लामण सूर्याचा; उन्हाचे पाटव नेसले, टाकलेवाऱ्याचे पैंजण घातले, फेकले;घातले, धुतले डोळ्यात काजळलावले, पुसले केवडाअत्तर; बांधले, सोडले हिंदोळे हर्षाचेहासले रुसले मयूर मनाचे;श्रावणा, कुणाचे मनस्वी हे क्षणनिसर्गचित्रात पावले स्पंदन? – इंदिरा संत (रंगबावरी) संगीतकार कौशल इनामदार यांचे देखील श्रावण आणि पावसावर खुप प्रेम आहे. त्यांच्या अनेक रचनांपैकी श्रावणाच्या आणि पावसाच्या रचनांमध्ये त्यांनी स्वतःचा प्राण ओतल्याचे आपणास दिसुन येते. इनामदार यांनी शांता शेळके यांच्या श्रावणाच्या या कवितेवर अतिशय मधुर आणि हृद्याला स्पर्श करणारी रचना केली आहे. शांता शेळके यांच्या विषयी ते पुढील शब्दांत लिहितात. “शांताबई शेळकेंच्या गीतलेखनात एक सिनेमॅटिक क्वॉलिटी आहे. एका गीतातून आपल्या डोळ्यांसमोर ते पात्र, तो प्रसंग, ते वातावरण सगळं उभं राहतं. त्यांच्या चित्रपटबाह्य गीतांतूनही आपल्याला हा गुण दिसतो. मग ते ‘तोच चंद्रमा नभात’ असो किंवा ‘जिवलगा राहिले दूर घर माझे’ असो. नुसत्या चित्रमयतेच्या पलीकडचा हा गुण आहे.” , कौशल इनामदार शांताबाईंनी लिहिलेली एक कविता आहे – रिमझिम बरसत श्रावण आलासाजण नाही आला https://youtu.be/nrs5XjdJ-cc श्रावण जसा निसर्गाच्या अनुपम रुपासाठी ओळखला जातो तसाच तो प्रेमी युगलांच्या प्रेम-भावनेच्या अभिव्यक्ति साठी देखील ओळखला जातो. सुमन कल्याणपुरकर यांचे हे भाव-गीत तुम्हाला मंत्रमुग्ध केल्यावाचुन सोडणार नाही. शांता शेळके यांची रचना तुम्हाला नक्कीच आवडेल. मला हे गीत विशेष आवडते कारण यातील भाव गायिकेने अक्षरशः प्रत्यक्षात आणला आहे. गे गीत ऐकताना आपण शांत होऊन जातो. डोळे बंद करावे आणि पुढील हे गीत ऐकावे. झिम झिम झरती श्रावणधारा https://youtu.be/mUUQgTta_MQ शंकर महादेवन यांच्या आवाजातील हे श्रावणगीत तुम्ही कदाचित ऐकले नसेल. आधुनिक संगीत शैलीमध्ये श्रावणाचे तेच मनमोहक रुप आपणास या सुर संगीतामध्ये दिसते. ओल्या सांजवेळी https://youtu.be/Z7oZyPMa3oE वेगवेगळ्या सिनेमांमध्ये देखील श्रावण व श्रावणामध्ये फुललेल्या हळुवार भाव-भावनांचे चित्रण गीतांच्या माध्यमातुन होते. लोकशाहिर, विनोदी सिनेकलाकार दिवंगत दादा कोंडकेंच्या कल्पकतेलादेखील श्रावणाने भुरळ घातली. त्यांच्या वाजवु का या सुपरडुपर हिट चित्रपटातील हे गाणे देखील छान आहे. https://youtu.be/_nwFx3yGN4Y श्रावण आला ग वनी (सिनेमा – व-हाडी आणि वाजंत्री) हे गीत तुम्हाला जुन्या काळात घेऊन जाईल. https://youtu.be/ms3Dss1Gyqk श्रावण म्हणजे जसा निसर्गाचा उत्सव तसाच भारतीय संस्कृतीचा देखील. श्रावणापासुन पुढे अनेक सण-वारांची जणु श्रृंखलाच सुरु होते. आपले हे सारे सण आपणास निसर्गाशी जोडण्यासाठीच आपल्या पुर्वजांनी योजलेले आहेत. नागपंचमी मध्ये नागाची पुजा करण्याची पध्दत काही नवीन नाही आणि जुनी जरी असली तरी विनाकारण नाहीये. कृषि-संस्कृतीमध्ये नाग-सर्प यांना खुप महत्वाचे स्थान आहे. विविध सण-वारांना निसर्गातील विविध घटकांशी मनुष्य जोडला जाईल व मनुष्य हा निसर्गाचा भाग आहे हे विसरणार नाही याची काळजी घेतली आहे. नागपंचमी, मंगळागौर हे सगळे उत्सव स्त्रियांच्या बहरण्यासाठीचेच आहेत. १९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या जिवाचा सखा या चित्रपटातील नागपंचमीचे हे गाणे देखील तुम्हाला आवडेल. https://youtu.be/U9zep85HlqQ पुर्वीच्या काळी नव्या नव-या मंगळागौरीची आतुरतेने वाट पहायच्या. आपल्या नव-याच्या दिर्घायुष्यासाठी यात पुजा धरण्याची प्रथा होती पुर्वी. ही पूजा करायची म्हणजे नव्या नवरी सगळ्या नटून थटून येतात. काही हौशी मुली तर नऊवार साडी आणि त्याला साजेसे सगळे दागिने घालतात.. थाटच असतो छान! शंकराची पिंड करून त्याची पूजा केली जाते. पूजा होईपर्यंत उपास केला जातो. नंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सुग्रास जेवण जेवतात. दुपारच्या वेळी थोडंसं झोपून आपली मंगळागौरीची पूजा छान फुलांनी सजवली जाते आणि वाट पाहातात ती रात्रीच्या जागरणाची. मंगळागौर म्हणजे रात्रीच्या जागरणाचीच ओढ असते. रात्रभर खेळ खेळून, गाणी म्हणून ही मंगळागौर जागवली जाते. ‘पिंगा ग पोरी पिंगा’ हे गाणे तुम्ही कदाचित बाजीराव मस्तानी या चित्रपटात पाहिले असेल. पण हे आणि अशी अनेक गाणी गात-नाचत खेळत नवविवाहिता रात्र जागवुन काढायच्या. नव्यानेच सासुरवाशीन झालेल्या त्या सुकुमार मुलीला तिचे
Monsoon Road-trips near Pune Monsoon is fascinating as always. It amplifies happiness in multi folds for the people who depend on monsoon and also for the bio diversity around. Monsoon gives a make over to earth, especially to the western ghats of India. Why not go on a monsoon ride near Pune then? We are fortunate enough to have Western ghats around Pune. There are many monsoon destinations you can choose from for your monsoon drive or ride experience. Today, let’s get to know more about all these destinations and some tips, tricks and precautions to take while planning your monsoon ride near Pune. Velhe – Nisargshala overnight camping An overnight monsoon trip with adventure and stay in tents, with mouth watering, live BBQ, authentic village food and an experience of being into the paradise. Want to experience the monsoon to its best? Want to enjoy monsoon traffic free and hassle free? Want get away from crowd and rowdy public who booze and dance vulgar at Public tourists places(Like Mulshi)…Want to escape your hi-fi gadgets for a day or two? If your answer is Yes to all above questions, then Nisargshala is the destination you must to be at. There are many destinations one or overnight trips can be arranged to, like Madhe Ghat, Torna fort, Rajgad Fort, Ufanda Ghat, Rayling PLateau, etc. You get best of both the worlds. A drive through scenic western ghats, which is going to free from road jams. Instead of horns honking you might get to hear chirping of birds, whooping of langoors and mating calls from peahens. If you are planning to book a trip with Nisargshala, don’t forget to ask us about this scenic route to Nisargshala. At Nisargshala camping you would get to pitch your own tent, roast your BBQ, meditate at the river bank and also do some great adventure waterfall rappelling at the nearby waterfall. Once you are done with your camping and adventure @ Nisargshala, you can visit places like Madheghat, Torna fort, Rajgad fort, etc. Waterfall Rappelling @ nisargshala All time favorite MULSHI What you should see in Mulshi? Palase Waterfall, Kundalika Valley, Plus Valley, ghangad Fort, Telbail How to avoid traffic jams on Mulshi Road trips? Road to take – As it’s the most visited and crowded place near Pune with better road conditions and less distance, you should be more careful while planning this ride. You should start early from Pune. Use google traffic alerts to know the traffic jams to and fro. For last 4 weekends, I drove in the evening from Pune to Pirangut. And i have observed heavy traffic jams in Bhugaon area. Tourists who come back from Mulshi, dont follow traffic rules and make 3-4 lanes of vehicle towards Pune, ultimately results in heavy traffic jams of approximately 2 to 3 hours. To avoid this, know the alternate roads to reach Pune. First Option is Take left from Ghotawade Phata to go to Hinjawadi IT park, then Hinjawadi and then Wakad and then Bengalore highway. Second Option is Take left from Lawale Phata, via Lawale, Nande, Sus village reach Bengalore highway. These alternative road you can take while coming back from your Mulshi trip, you also choose to take these roads while going to Mulshi. Observe the lane discipline to avoid traffic bottlenecks. Avoid throwing thrash in the nature. Strictly avoid in take of liquor on a monsoon trip. If you see people boozing and creating chaos with loud music, immediately inform police. Sharing the phone number of local police station – 020 2294 3133. Mobile – 9850087499 . Keep it saved in your mobile. Lonavala In the peak monsoon season, the local govt body, keeps t Bhushi dam closed for tourists due to many unwanted accidents and deaths occured in last few years. If that is the case in your trip to Lonavala, what other places you must visit? Yes, there are plenty of equally beautiful places the area. To name few, Korigad, Telbail, Karla and Bhaje caves,Lohgad and Visapur Forts, Dukes nose, Kune Waterfall. Its recommended that you get a local guide with you if you don’t want to miss anything. Also please make a note that tourists should use public transport wiz the Mumbai-Pune Local train and then use local transport options. This will help reduce traffic jams and you will have worry free and hassle free monsoon trip near Pune to Lonavala. Keep Lonawala Police station Phone number handy in case you need any help or even if you want misbehaviour of other people to bring police’s notice. Lonawala Police station – 02114 273 036 Beautiful view of Sahyadri range with a cloud cover from Lonavala Malshej Ghat Approximately 120 kms from Pune. This ride is one of the best monsoon rides. Get your packed and belongings covvered in plastic and get wet in the waterfalls in the ghat. From a particular point in this ghat, you can see a reverse waterfall towards the direction of Harishchandra Gad. Less Traffic when compared to Mulshi, this road gets enough space to breathe and if vehicle drivers observe lane discipline, all can enjoy smooth traffic and have wonderful monsoon ride. But on weekends, heavy traffic is observed in last few years. Tourists from Mumbai visit this ghat a lot. Ale Phata Police station – 02132263033 Varandha Ghat Approximately 100 kms from Pune, this destination and also the roadtrip is a great experience in the monsoon. You can take Pune Begaluru highway and take right for Bhor town. Use google maps with directions navigation. What else you can see around? …Shivthar Ghal(शिवथर घळ). This is a sacred place underneath a waterfall, in a cave. His holiness Ramdas Swami, a poet revolutionary saint during the times of The Great Raja Shivaji. If you have some more information, that you think is useful to make someone’s monsoon trip even better and safe, please feel free to contact me on whatsapp (9049002053), I can add that information also in the article with due credits.