डोंगर उतार तसेच माळरानांवर सर्वत्र आढळुन येणारी ही वर्षायु वनस्पती पावसाळ्याच्या शेवटास सर्वांचे लक्ष वेधुन घेते. विविध रंगांची फुले येणा-या प्रजाती यामध्ये आहेत. एखाद्या माळावर अथवा डोंगर उतारावर एकाच रंगाच्या फुलांनी बहरलेले तेरड्याचे ताटवे त्या ठिकाणाला रंगीत करुन टाकतात. गौरी गणपतीच्या दिवसांत तोरणा किल्ल्याचे डोंगर उतार गुलाबी रंगाने रंगविले जातात ते याच फुलांच्या बहराने. शेकडो-हजारो किंवा लाखो वर्षे झाली असतील कदाचित ही वनस्पती तिचे अस्तित्व टिकवुन आहे. दरवर्षी गाई-गुरे-म्हशी-शेळ्या मेंढ्या चरतात, डोंगर-उताराला, माळरानांना वणवे लागतात तरीदेखील या वनस्पतीचे अस्तित्व अद्याप टिकुन आहे. पिकलेल्या फळातुन/ शेंगातुन खाली पडलेले बीज वणव्यासमोर देखील टिकतात व रुजतात. या वनस्पतीला भारताच्या अनेक भाषांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. महाराष्ट्रात मात्र सर्वत्र तेरडा याच नावाने ओळख आहे. इंग्रजी मध्ये balsam, impatiens, jewel weed, ladies’ slippers, rose balsam, spotted snapweed अशा अनेक नावांनी याला ओळ्खले जाते. शास्त्रीय नाव impatiens-balsamina असे आहे तर मराठी मध्ये तेरडा नावा व्यतिरिक्त गुलमेंधी हे देखील नाव काही ठिकाणी (गुजरात जवळचा भाग) वापरले जाते. कोकणात चिर्डा, तेरडा म्हणतात. संस्कृतात दुष्परिजती असे नाव आहे. कश्मिरी भाषेत बन-तिल किंवा ततूर म्हणतात. बंगाली मध्ये दोपाती, गुजराथी -गुलमेंधी, हिंदी – गुलमेहंदी, कन्नड – कर्ण-कुंडल, मल्यालम मध्ये थिलम अशी वेगवेगळी नावे भारतात वापरली जातात. साधारण गवताचे जसे आयुष्य असते तसेच याचे असते. पाऊस पडायला सुरुवात झाली की मागील वर्षी वा-यासोबत इतस्तत पसरलेले बीज अंकुरतात. गौरी गणपती च्या आसपास फुलांचा बहर असतो. एक फुल एकदा फुलले की ते तीन ते चार दिवस फुललेले राहते. एका झाडास डझनपेक्षा जास्त फांद्यांना फुले येतात. कालांतराने या फुलांच्या शेंड्यांना शेंगा येतात. शेंगा अगदी छोट्या असतात व जसजशा पक्व होऊ लागतात आंत मध्ये बीज देखील तयार होतात. बीज खुपच छोटे म्हणजे खसखस च्या आकारापेक्षाही छोटी असतात. शेंगा परिपक्व झाल्यावर त्यांना अगदी हलकासा स्पर्श जरी झाला तरी फट असा हलका आवाज येऊन ही शेंग टचकन फुटते व बीज विखुरतात. लहान मुलांचा हा आवडता खेळ! यामुळेच याचे बीज संकलन अवघड होऊन जाते. शेंगा फुटण्याच्या या पद्धतीमुळेच या वनस्पती ला इंग्रजीमध्ये टच-मी-नॉट असे देखील म्हणतात. तिकडे इंग्रजीमध्ये touch me not असे ‘लाजाळु या अर्थाने’ म्हंटले जाते. आपण म्हणतो व ओळखतो ती लाजाळु वनस्पती वेगळीच आहे व ती सर्वांना माहीत आहे देखील आहे. जेव्हा ही वनस्पती नवीननवीन उगवते तेव्हा याचे कोवळे देठांची व पानांची भाजी केली जाते असे पीएफएएफ या संकेतस्थळावर समजते. याच संकेतस्थळानुसार याच्या पानांचा रस मोस/चामखीळ घालवण्यासाठी वापरतात तर फुले शीत असल्याने भाजलेल्या जखमेवर गुणकारी आहे असे समजते. फुलांचा रस सर्पदंशावर वापरतात मात्र असा वापर भारतात कुठे केला जातोय हे मात्र स्पष्ट होत नाहीये. बीजांचा उपयोग कर्करोगाच्या उपचारांत देखील करतात तसेच गरोदर महिलेला प्रसुती वेदना येत असताना ताकत यावी म्हणुन देखील बीयांची भुकटी दिली जाते. (कुणीही वैद्यकीय सल्ल्याशिवाय केवळ या लेखाच्या आधारे तेरड्याचा किंवा अन्य कोणत्याही वनस्पतीचा उपयोग औषधासाठी करु नये) हे सर्व उपयोग खरोखरीच महाराष्ट्रात भारतात कुठे केले जातात का याविषयी संशोधन होणे गरजेचे आहे. कदाचित असे उपयोग केले जात असतील पुर्वी पण आपण ते ज्ञान गमावुन बसलो आहोत की काय असे वाटु लागले आहे. ही एक औषधी वनस्पती आहे पण अद्याप यावर भारतात संशोधन नीटसे झाले नाही असे दिसते. भारतात मुबलक प्रमाणात आढळणा-या वनस्पतीच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यास करुन जर उपयुक्त अर्क अथवा अवयव वापरण्याचे तंत्र विकसित झाले तर लाखो लोकांस रोजगार मिळु शकतो. या व्यतिरीक्त परसबागेत अथवा बागेत लावण्यासाठी देखील आपल्याकडे याचा वापर केला जातो. कास पठारावर फुलणारे या फुलांचे ताटवे मन मोहुन टाकतात. गौरी गणपतीमध्ये घरात गौरी बसवताना आवर्जुन तेरडादेखील गौरी शेजारी ठेवला जातो. याचाच एक प्रकार म्हणजे पान तेरडा (Impatiens Aculis Dalz. / rock balsam) ही वनस्पती देखील मोहक आहे. पान तेरडाचे वैशिष्ट्य असे की ही वनस्पती खडकावर वाढते. पान-तेरड्याचा मी तोरणागडावर काढलेला फोटो खाली आहे. याचाच एक दुरचा भाऊ/बहीण म्हणजे हिमालयन बालसम (Impatiens Glandulifera). काही देशांत हिमालयन बालसम लावण्यास बंदी आहे कारण हे खुप वेगाने पसरते. पांध-या, लाल, जांभळ्या, गुलाबी रंग असलेली तेरड्याची फुले मी पाहिली आहेत. तुमच्या कडे अजुन विशेष माहिती असेल तेरड्याविषयी तर अवश्य कमेंट मध्ये अथवा माझ्या व्हॉट्सॲपवर कळवा जेणे करुन आपण ती माहिती जतन करुन ठेवु! तुमच्या भागात तेरड्याचा काही विशेष उपयोग परंपरागत खाद्य अथवा औषध म्हणुन केला जात असेल तर अवश्य कळवा.
Now as the entire world is stopped due to novel corona virus; we all have understood the importance of going out. We all are locked down in our homes, some are locked at work places and some are locked down at community hospitals saving lives. I am a trekker. And I go trekking every now and then. I go in wilderness at least once a week. And apart from that I am a daily runner. I run every day. Everything has been stopped now. Things have been stopped only for us to make sure that we have better lives post pandemic. As I spend entire day just sitting at home, watching Television, reading books, surfing internet; I am missing trekking a lot. This thought of trekking made me write an article about trekking so that new comers can benefit from it. There are plenty of articles and videos on internet about what trekking is and the benefits of trekking. You just have to go to google and search with ‘What is trekking’ keywords and you get loads of article links. I am not going to go in the same topic now. Rather I shall be writing something which is least talked about. Why is trekking so expensive? Trekking is basically an activity conducted for more than one day and walking in rustic, natural world. In this activity we have to stay for one or more nights outdoors. Especially in India people go trekking different peaks in Himalayas or regional mountain ranges. Maharashtra has become a trekking hotspot over a few decades now. We have seen great trekkers like Gopal N Dandekar, Anand Palande, Usha Page, Nandu Page are a few names who have trekked Sahyadri and made very useful notes which are helping people like us even now. Over the time, as globalization and IT revolution happened, Maharashtra has become hub for corporate & businesses. This has attracted youth and families to come to Maharashtra. This newly relocated population, with their limited time resources and lack of local knowledge and language, has opened a new horizon for some to organize trekking events in metropolitan cities of Maharashtra. Not only this newly relocated population but also the younger generation of Maharashtra also has adapted to the global business and employment trends. This GenX don’t have time as well patience to study, plan and organize trek themselves. This new generation is totally dependent on trek organizers now a days. So the organizers have to keep the prices as per the industry standards so that they themselves can also lead the same life style as their counter customers are leading. And there is nothing immoral at all in this. They charge for services and food of which the corporate customers are used to. Trekking, as a hobby if one develops strategically, learns and adapts the basics of Trekking, then it’s not expensive. Now a days there is a trend that trekking is something that anyone can buy with money. And that’s the reason many people started selling trekking as a service in which they are offering city facilities to attract more customers. People need bottled water when they go trekking, people want to boose around campfire when they go trekking, people want travel luxury when they go trekking, people want cozy beds when they go trekking, people want super glamorous, shining toilets when they go trekking, People want tasty delicious ready platter food when they go trekking, people want everything without taking efforts and these are the reasons why trekking is so expensive. I remember some of our treks which we did in record low cost. We did Pratapgad (one night stay), Mahabaleshwar(two night stays), kamalgad(one night stay) a total of 4 night stays trek in just 103 Rs. This cost included mostly transport cost and food ration. We never bought ready platter food or a cup of tea while on treks. We managed to cook everything ourselves with whatever ration that we had. We carried all the grains, necessary masalas, salt, tea powder, milk powder etc with minimum utensils, in every participant’s backpacks. There are many more treks I still remember during which we spent bare minimum money. And one more thing, we still do such treks where in the cost involved is of only for transport and food ration or packed food everybody bring themselves. We don’t buy bottled water whilst trekking. Alternatively you can request locals also to help you with village food which wouldn’t cost much. This way you help generate employment as well to the locals, in right way. If you still rely on some organizer to arrange food for you and arrange luxury for you, then trekking is expensive for you. If you want to develop this hobby you can go along with some group initially and learn best trekking practices. Find your suitable trek mates and stick to them only for the life time if possible. If you could do this, then trekking is not expensive for you. Regards Hemant S Vavale Author of this article, along with Yashdeep and Sanjay run an enterprise with name nisargshala. This place is for city dwellers to experience nature at its best, near Pune. You can do camping, trekking, rappelling, waterfall rappelling, BBQ at our place.
आपण म्हणतो की मनुष्य एक समाजप्रिय प्राणी आहे. सोशल स्पेसीज! आपण खरोखर असे समाज-शील , समुहात राहणारे, एकमेकांना पुरक राहिलो आहोत का? एक मनुष्य म्हणुन खरतर प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. परिस्थिती उत्साहवर्धक जरी नसली तरी अगदीच निराशावादी चित्र नाहीये हे मात्र नक्की. कारण मनुष्य जसा समाजशील आहे तसाच तो निसर्गातील इतर घटक, प्राणी यांच्याकडे पाहुन आजवर खुप काही शिकला आहे. सध्या शिकत आहे आणि भविष्यात देखील शिकत राहिल यात शंका नाही. पण त्यासाठी आपण निसर्गाशी जोडलो गेलो तरच हे शक्य होईल. खालील व्हिडीयो मध्ये दिसणारे दृश्य सह्याद्रीमधील भटक्यांसाठी काही नवीन नाहीये मित्रांनो. ज्याने ज्याने एखाद-दोन जरी ट्रेक सह्याद्रीमध्ये केले असतील त्यांना हा मुंग्यांचा गड नक्कीच दिसला असेल. आम्ही ज्या डोंगर भटक्या ज्येष्टांकडुन ट्रेकींग करायला शिकलो त्यांच्या कडुन आम्हाला या रचनेला ‘गड-मुंगी’ म्हणतात असे समजले. याची विशिष्ट रचना, की जी एखाद्या अभेद्य किल्ल्याच्या तटबंदीसारखी, वर्तुळाकार तटांची बनवलेली असते, ती खरतर वास्तु-स्थापत्या मधील एक अदभुत नमुना आहे. मध्यवर्ती एक द्वार असते, साधारण ३ इंच त्याच्या परिघ असेल. हेच या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार होय. यातुनच आत-बाहेर ये-जा केली जाते. य द्वाराच्या ऊंची सर्वात जास्त असते. जमीनीपासुन साधारण आठ इंचापर्यंत उंची मुख्य द्वाराची असु शकते. त्या भोवताली एखाद्या पाकळ्यांप्रमाणे एका आड दुसरा, मग तिसरा मग चौथा असे तट, ऊंची कमी कमी असलेले बनवलेले असतात. जर असा गड एखाद्या उतारावर असेल तर चढाच्या बाजुने प्रत्येक तटाची ऊंची जास्त असते व उताराकडे ती कमी झालेली असते. या गडांची बांधणी या मुंग्या मुख्यत्वेकरुन पावसाळ्यामध्येच करतात. या बांधकामासाठी सभोवतालची माती मुंग्य गोळा करतात. एक मुंगी ती केवढी आणि तिच्या मुखामध्ये केवढे अशी माती, ती आणु शकणार बरे? इवलासा मातीचा कण प्रत्येक मुंगी घेऊन येते आणि वेगवेगळ्या तटांवर लावते. अभ्यासकांच्या मते, या मातीच्या कणामध्ये मुंग्या त्यांच्या तोंडातुन लाळ किंवा तत्सम द्रव मिसळुन, त्या मातीला चिकट पणा आणीत असाव्यात. या व्हिडीयो मध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की ज्या तटांचे काम पुर्ण झालेले आहे ते तट चकचकीत, गुळगुळगुळीत आहेत. अगदी प्लास्टर केलेल्या भिंतीसारखेच. व बाहेरच्या तटांचे काम अद्याप सुरु असल्याने ते तट तुम्हाला थोडे खडबडीत दिसतील. या विशिष्ट रचनेचे प्रयोजन काय असावे बरे? पावसाच्या पाण्यामुळे जमिनीखालील मुंग्याची वसाहत व्यवस्थित रहावी हेच या रचनेचे मुख्य प्रयोजन असावे असे वाटते. वेगवेगळ्या तटांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या देखील, आणखी बाहेरच्या तटात उघडताना दिसतात. कदाचित पावसाचे पाणी जर पडले तर ते या तटीय रचनेमुळे बाहेर बाहेरच्या तटांत जाऊन शेवटी गडाबाहेर जावे यासाठीच या रचनेचा हेतु असावा. आपल्याकडे मराठी भाषेत या मुंग्यांना वेगळे काही नाव आहे असे ऐकिवात नाही. इंग्रजी मध्ये या मुंग्यांची ओळख Pheidole sykesii अशी केली गेली आहे. या ओळखीमध्ये देखील अद्याप एकमत नाहीये. बायोडाव्हरसिटी लायब्रेरीच्या एका पुस्तकात या मुंग्यांचा उल्लेख सापडतो. या व्यतिरिक्त डोंगर भटक्यांना जर या गड-मुंग्या व त्यांच्या गडा विषयी अधिक माहिती असेल , भविष्यात उपलब्ध झाली तर अवश्य आम्हाला पाठवा. तुमच्या नावासहीत ती माहिती या पानावर संग्रहीत केली जाईल. पहा गड-मुंगीचा हा व्हिडीयो. आवडल्यास नक्की फॉरवर्ड/शेयर करा. धन्यवाद हेमंत सिताराम ववले निसर्गशाळा पुणे
आपल्या सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याचे बेलाग सुळके, अतिखोल द-या ,श्वास रोखायला लावणारे कातळ कडे. सह्याद्रीची ओळख म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभारलेले, गगनचुंबी अभेद्य गडकोट. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथली हजारो वर्षांची महान संस्कृती. सह्याद्री ची ओळख म्हणजे याच संस्कृतीतुन जन्माला आलेले एक लोकोत्तर नर-रत्न – छत्रपती शिवाजी. सह्याद्री ची ओळख म्हणजे शिवाजी राज्यांच्या सोबत, कधी कधी त्यांच्याही पुढे जाऊन, प्राणांची बाजी लावणारे सह्याद्रीचे लाखो करोडो सुपुत्र म्हणजे मावळे. सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याच्या अंगाखांद्यावर उगम पावुन, पुर्व दिशेचा लाखो-करोडो हेक्टरचा प्रदेश सुपीक करणा-या नद्या. सह्याद्रीची ओळख म्हणजे कातळ कड्यांवरुन बेधुंद होऊन, खोलवर द-यांमध्ये उड्या घेणारे, स्वतःला झोकुन देणारे हजारो धबधबे. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथला मोसमी, बहारदार पाऊस. सह्याद्रीची ओळख म्हणजे… सह्याद्रीची ओळख नव्याने माझ्या सारख्या भटक्याला अगदी रोज होत असते. जेव्हा जेव्हा मी निसर्गात, सह्याद्रीच्या राकट प्रांगणात जातो तेव्हा तेव्हा, मला सह्याद्री नव्याने ओळख होत असते. सह्याद्री नित्य-नुतन जरी मला वाटत असला तरीही, मित्रानो माहितीये का तुम्हाला की सह्याद्री जगातील सर्वात वयोवृध्द डोंगररांगांमधील एक आहे. सुमारे १५ करोड वर्षांचा आहे बरका आपला लाडका सह्याद्री. म्हणजे १५ करोड वर्षांपुर्वी सह्याद्री (दख्खन पठारासहीत) आशिया खंडाशी जोडला गेला. त्यापुर्वी म्हणजे अंदाजे ४० करोड वर्षांपुर्वी पृथ्वीवर एकच भुखंड होता. मागील शतकातील एक भु-शास्त्रज्ञ आल्फ्रेड वेगेनेर यांनी त्यांचे सगळे आयुष्य खंडांतराच्या (खंडांतर हा मी योजलेला शब्द आहे याला इंग्रजी मध्ये Continent Drifting असे म्हणतात) अभ्यासासाठी वेचले. वेगेनेर यांनी पृथ्वीवरील सर्वात जुन्या, एकमेव असलेल्या भुखंडाला पॅंजेया/पॅंगईया म्हणजे संपुर्ण पृथ्वी असे नाव दिले. साधारण पणे ४५० करोड वर्षापुर्वी, अंतरिक्षामधील धुळ, वायु व इतर अंतरीक्षीय घटकांमुळे पृथ्वीची निर्मिती झाली. त्याच दरम्यान सुपरनोव्हा म्हणजे महाभयंकर विस्फोटामुळे, पृथ्वीचे तापमान वाढुन, धुळीने तयार झालेला तो गोळा वितळला. त्यालाच आपण ज्वालामुखी म्हणतो. हा ज्वालामुखीच जसजसा प्रवाही झाल त पासुन प्रत्यक्ष खडक, पर्वत, डोंगर तयार झाले तेव्हा पृथ्वीवर एकच भुखंड तयार झाला. एकच असलेला हा भुखंड काही काळाने तुटला व अनेक छोटे-मोठे भुखंड वेगवेगळे होऊन पृथ्वीवर विखुरले गेले. खरतर हा खुप मोठा विषय आहे. याविषयी आपण कधीतरी पुन्हा सविस्तर माहिती घेऊ . खालील व्हिडीयो पहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, सह्याद्री व हिमालय कसा अस्तित्वात आला. वर मी सह्याद्रीस वयोवृध्द म्हणालो याचे कारण असे की, हिमालय पर्वत रांग की जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे, ती भारतीय उपखंडाची व आशिया खंडाची धडक झाल्यानंतर अस्तित्वात आली आहे. हिमालयाचा जन्म त्या मानाने खुप अलीकडचा आहे. म्हणुनच सह्याद्रीस मी वयोवृध्द डोंगर असे म्हणतो. सह्याद्रीच्या पुरातन असण्याच्या खाणाखुणा आपणास सह्याद्रीच्या कातळाकड्यांकडे पाहुन दिसतात. नुकताच मी, साल्हेर सालोटा या गडांना भेट देऊन आलो. यातील सालोटाचे कातळ कडे तुटण्याच्या मार्गावर आहेत. एखादा हलका भुकंप देखील सालोट्याचा भुगोल बदलुन टाकेल. अशीच काहीशी अवस्था आपणास सह्याद्री उत्तुंग सुळक्यांची झालेली दिसते. आपल्या मुळशी वेल्हे तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजेच मावळ भाग हा सह्याद्रीचाच भाग होय. मुळशीतील ताम्हिणी म्हणजे हंगामी पावसासाठी भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. तशीच अवस्था भोर – वेल्ह्यातील मावळ पट्ट्याची आहे. कित्येक ठिकाणी पर्जन्यमापकाची उपलब्धता नसल्याने वास्तविक पर्जन्यमान कुठे किती होते याची माहिती मिळत नाही. पण मावळ पट्ट्यात तीन-तीन चार महिने सुर्यनारायणाचे दर्शन होत नाही. काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत इथे वर्षावने होती. ही जंगले इतकी घनदाट होती की उन्हाळ्यामध्ये देखील सुर्यकिरणे जमिनीवर पडत नसत. किर्र्र झाडी, महाकाय वृक्ष, तितक्याच मोठाल्या, जाडजुड, पुरातन वेली हे सारे सह्याद्रीला एका विशिष्ट ऊंचीवर नेऊन ठेवते. सह्याद्रीतील किल्ले हे जितके उत्सुकतेचा विषय आहे तितके जास्त कुतुहलाचा विषय आहे सह्याद्रीतील वनसंपदा. या वनसंपदेमध्ये, दरी-खो-यात, नद्या-नाल्यांत, कातळ-कड्यांवर, धबधब्यांवर, मोकळ्या माळरानांवर एक आख्खी सजीवसृष्टी गेली लाखो वर्षे जगत आहे, हे आपणास ठाऊक आहे काय? नाचणारा बेडुक नावाची एक बेडकाची प्रजाती आहे, ही प्रजाती किमान सात लक्ष वर्षांपासुन सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर नांदते आहे. सरीसृप, उभयचर, जलचर अशा अनेक प्रजाती इथे लक्ष-लक्ष वर्षांपासुन नांदत आहेत. मनुष्यास या सर्वांविषयी जेवढे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त ज्ञान आपण अजुन मिळवायचो आहोत. आपण अनभिज्ञ आहोत. भारताच्या एकुणच हवामानावर परिणाम करणारा मॉन्सुन म्हणजे मोसमी पाऊस भारतात पडतो याचे कारण फक्त आणि फक्त सह्याद्री आहे. एकेकाळी सजीव सृष्टीसाठी नंदनवन असणारा सह्याद्री वर्तमानात सजीवांसाठी शाप ठरत आहे. सजीव म्हणताना मी यांत मनुष्यास देखील मोजले आहे. आज भलेही अज्ञान, दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे मनुष्यास वाटत असेल की तो सुरक्षित आहे, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. व याचे संकेत युनेस्को द्वारे काही वर्षांपुर्वी दिले गेले आहेत. जगातील आठ जागतिक वारसा असलेल्या स्थळांच्या यादीमध्ये सह्याद्रीला स्थान देण्यात आले आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कित्येक सजीव नांदताहेत मित्रहो. फुले येणा-या वृक्ष-वनस्पतींच्या एकुण ७४०२ प्रजाती सह्याद्रीमध्ये आहेत. फुले न येणा-या वनस्पतींच्या अंदाजे १८०० प्रजाती आहेत.सस्तन प्राण्यांच्या १३९ प्रजाती आहेत. पक्षांच्या ५०८ प्रजाती आहेत. १७९ उभयचर, ६००० किटकांच्या प्रजाती, २९० गोड्यापाण्यातील माश्यांच्या प्रजाती आहेत. इथल्या जंगलांची आणखी एक खासियत अशी आहे की, ही जंगले सदाहरीत आहेत. झाडा-झुडूपांच्या इतक्या प्रजाती आहेत की काही झाडांची पाने जरी काही काळापुरती गळली तरी एकुण जंगल मात्र हिरवेगारच दिसते. तुम्हाला हे पहायचे असेल तर याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कोकण दिवा या ट्रेकचा व्हिडीयो अवश्य पहा. सह्याद्री आणि मॉन्सुन चे जसे नाते आहे तसेच नाते सह्याद्री व दुर्मिळ होत असलेल्या प्रदेशनिष्ट (Endemic) प्रजातींचे आहे. जागतिक दृष्टीने पाहिले तर नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीपैकी ३२५ प्रजाती सह्याद्रीमधील आहेत. ही अत्यंत दुखःद गोष्ट आहे. या ३२५ प्रजातींमध्ये २२९ प्रजाती वृक्ष-वनस्पतींच्या, ३१ प्रजाती सस्तन प्राण्यांच्या, १५ पक्ष्यांच्या, ४३ उभयचर, ५ सरपटणारे व एक मासा आहे. यापैकी ५१ प्रजाती कदाचित त्यांच्या अखेरच्या काही पिढ्यांमध्ये आहेत. निसर्गाशी मानवी नाते, काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत तरी सौहार्दाचेच होते असे मी म्हणु शकतो. याचे कारण असे की, मावळ भागातील काही लोकरिती मनुष्य व निसर्ग यातील सौहार्द दाखवणा-या आपणास पहावयास मिळतात. उदा – जेव्हा जुन जुलै मध्ये पावसाला सुरुवात होते, तेव्हा मोठ्या नद्या, धरणांतील मासे अंडी सोडण्याकरीता, नदीच्या उगमस्थानाकडे पोहण्यास सुरुवात करतात. नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने ते पोहतात. हजारो वर्षे मावळात राहणा-या मावळ्यांना, माश्यांच्या या प्रवासाविषयी माहिती अगदी पुर्वापार आहे. असे उलट दिशेने पोहणारे मासे पकडणे व खाणे खुपच सोपे काम आहे. तरीही मावळातील मंडळी, अंडी सोडण्यासाठी प्रवाहाच्या उलट दिशेने जाणारे मासे पकडत नाहीत व खात ही नाहीत. हेच मासे जेव्हा, अंडी सोडतात व पुनः प्रवाहासोबत पोहण्यास सुरुवात करतात तेव्हा, विशिष्ट पध्दतीचे बांबु व लाकडी जाळे तयार करुन मासे पकडले जातात. विशिष्ट पध्दत अशासाठी म्हणायचे की, जाळ्यातील एकेका अटकावाचा आकार एवढा असतो की यात विशिष्ट वयाचाच, विशिष्ट आकाराचाच मास अडकेल. व लहान मासे, की जे अजुन पुर्ण वाढलेले नाहीत ते पुन्हा नदी-धरणात जातात. म्हणजे नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेवर फारसा परिणाम न करताही मावळातील सुज्ञ लोक मांसाहार करीत होते. आजही अशा पध्दती आपणास पहावयास मिळतात. हे नाते देखील, वाढत्या शहरीकरणामुळे , दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींसारखेच, नष्ट होण्याचा मार्गावर आहे. व हेच खरे कारण आहे, सह्याद्रीच्या होत असलेल्या –हासाचे.
आपला सह्याद्री अनेक गोष्टींसाठी प्रसिध्द आणि आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली, बहरलेली संस्कृती कशी होती, कशी आहे या विषयी आपण एका लेखामध्ये माहिती घेतली आहेच. तुम्हाला सह्याद्री व त्याची संस्कृती विषयीचा लेख वाचायचा असेल तर इथे क्लिक करा. सोबतच आपण सह्याद्री मधील विविध बेडकांच्या जाती-प्रजाती विषयी देखील माहिती घेतली आहे. सह्याद्रीच्या रानावनांत कोणकोणत्या भाज्या (रानभाज्या) उगवतात व त्या बनवाव्या कशा या विषयी देखील आपण सविस्तर माहिती घेतली आहे. पश्चिम घाटातील बेडुक देखील अभ्यासाचा विषय आहे. या विषयी अधिक माहिती इथे क्लिक करुन मिळेल. आज आपण सह्याद्री तील आणखी एका वैशिष्ट्यपुर्ण जीवा विषयी माहिते करुन घेणार आहोत. तो म्हणजे सह्याद्रीतील खेकडा! माझा ट्रेकिंग पार्टनर अरविंद एक भला मोठा मुठा हातात घेऊन.. आपल्या शहराच्या मावळ पट्ट्यात आढळणा-या दोन मुख्य खेकड्याच्या जाती म्हणजे मुठा खेकडा व काळा खेकडा या होय. पावसाळा सुरु होण्यापुर्वी दुर्गम भागातील लोक जीवनावश्यक सामग्रीची खेरेदी करुनच ठेवतात यात किराणा माल मुख्य असतो. याचे कारण असे की पावसामुळे तालुक्यच्या ठिकाणी जाणे त्यांना शक्य नसते. या सामग्री सोबतच मोट्या प्रमाणात सुकी मासळी देखील विकत घेतली जाते. रानभाज्या व परसबागीतील भाज्यांमुळे फायबर, विटामिन इत्यादींची पुर्तता होते पण प्रोटीनसाठी सुकी मासळी, नदी-नाल्यातील मासे, खुबे व खेकडे यांच्यावर अवलंबुन राहावे लागते. खेकड्यांमुळे भातखाचरांना देखील नुकसान होऊ शकते. भाताची रोपे लहान असताना, खेकडे ही रोपे खाऊ शकतात व त्यामुळे शेतक-यांची मेहनत वाया जाते. त्यामुळे देखील शेतीच्या आसपासच्या परीसरातील खेकडे पकडणे शेतक-यांसाठी अनिवार्य होऊन जाते. मुठा जातीचा खेकडा मी खेकड्यांचा व संस्कृतीचा काही संबंध आहे का हे तपासण्याचा प्रयत्न केल्यावर मला समजले की महादेव कोळी या समाजामध्ये बाळंतिण पुजे मध्ये खेकड्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा काही भागात आहे. तसेही अन्न पुरवठा म्हणुन खेकड्यांचा वापर हा देखील संस्कृतीचाच एक भाग आहे. खेकडा, या विषयावर देखील संशोधनास खुप वाव आहे. ज्याप्रमाणे समुद्रकिनारी खेकड्याची शेती केली जाते त्या प्रमाणेच, पश्चिम घाट माथ्यावर, जिथे खुप जास्त पाऊस पडतो, अशा भागात, जमिनीवरील खेकड्यांची शेती करण्यासाठी खुपच पोषक वातावरण आहे. यामुळे हजारोंच्या संख्येने रोजगार निर्मिती होऊ शकेल. तरुण पिढीने, अभ्यासकांनी, धोरणे बनविणा-यांनी या विषयाकडे देखील लक्ष दिले पाहिजे. आपली कॅम्पसाईट ज्या भागात आहे तिकडे खेकडे पकडण्याचे काम अगदी प्रत्येक घरातील माणसे करतात. प्रत्येक घरी आठवड्यातुन किमान एकदा तरी खेकड्याचे कालवण होतेच होते. खेकडे पकडण्यासाठी (आणि मासे देखील) ही मंडळी एका विशिष्ट साधनाचा उपयोग करतात. हे बांबुचे बनविलेले असते. याला गडदे/गडद असे म्हणतात. या गडद्यामध्ये खेकड्यांसाठी काहीतरी खाद्य टाकले जाते जसे गांडुळ, चिकनचे आतडे, खेणखतातील मोठाले गोल किडे, इत्यादी. खेकडे या गडद्यामध्ये आले की त्यांना बाहेर पडता येत नाही त्यातुन. तुम्ही जर कधी आमच्या कॅम्पसाईट ला आलात तर आवर्जुन गडदे कसे असते हे पहा. लहान मुले देखील खेकडे पकडु शकतात. त्यासोबत खेकडे पकडण्यासाठी आणखी एक पध्दत वापरतात. ती म्हणजे एखाद्या लांब काठीच्या टोकाला गांडुळ अथवा खेकड्याचे कोणतेही खाद्य बांधुन, त्या काठीचे टोक खेकड्याच्या बिळात घालायचे. खाद्याच्या वासाने खेकडा, ते खाद्य खाण्यासाठी त्या काठीला पकडण्याचा प्रयत्न करतो. काठीला थोडे हिसके बसले की पकडणाराला समजते की खेकडा आहे असे. मग हळु हळु ती काठी वर वर उचलायची. काठीच्या पाठोपाठ खेकडा देखील बाहेर येतो, मग चतुराईने, खेकड्याला, त्याच्या पाठीच्या बाजुने पकडायचे. हाताने पकडने हे थोडे जिकीरीचे काम आहे. खेकडा विषारी जरी नसला तरी त्याचा चावा मजबुत असतो. त्यामुळे तुम्हला जर खेकडा हाताने पकडण्याचे कसब माहित नसेल तर त्यापासुन लांब थांबलेले कधीही शहाणपणाचे होय. खालील व्हिडीय मध्ये पहा गडद्यामध्ये खेकडा पकड्याची पध्दत! खेकड्याचे कालवण (कालवण म्हणजे रस्साभाजी) माझे वडील, आम्हाला एक किस्सा नेहमी सांगायचे. माझ्या आईचे माहेर म्हणजे वारकरी कुटुंब. माहेरी त्यांच्याकडे वशाट कधी कुणी केले ही नाही आणि खाल्ले ही नव्हते. लग्नानंतर, बाबुजींनी (वडीलांना आम्ही बाबुजी म्हणायचो!) एकदा खेकडे आणले घरी व आईला कालवण करायला सांगितले. मटण शिजवतात तसे तिने खेकडे, आधी शिजायला ठेवले. पाच मिनिटे गेली, दहा मिनिटे गेली, अर्धा तास, एक तास होऊन गेला, तरीही खेकडे काही शिजेनाच. आई वेळोवेळी हाताने , पातेल्यातील खेकडे दाबुन पहायची. बाबुजींनी विचरले झाले का कालवण, त्यावर ती म्हणाली की खेकडे शिजतच नाहीत. अजुनही कडकच आहेत. तिच्या या उत्तरावर बाबुजींनी कपाळावर हात ठेवला व तिला खेकडा कसा शिजवतात हे शिकवले. तर खेकड्याचे कालवण करणे व ते देखील चवदार, ही एक कलाच आहे. ग्रामीण भागात, प्रत्येक घरात या कलेतील पारंगत गृहीणी अजुनही आहेत. इतक्या वर्षात माझी आई जसे खेकड्याचे कालवण तितके चवदार मी इतरत्र कुठेही खाल्लेले नाही. माझ्या आईच्या हातचे खेकड्याचे कालवण आणि घुग-याचे (काळे घेवडे) कालवण खायला मिळण्यासाठी भाग्य लागते बरका! खालील व्हिडियोमध्ये पहा, खेकड्याचे कालवण करण्याची कोकणी पध्दत. आमच्याकडे कॅम्पिंग ला आलात व खास आग्रह केलात तर आपण मिळुन खेकडे पकडण्यासाठी जाऊ शकतो ;). आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर अवश्य शेयर,फॉरवर्ड करा. आपला हेमंत सिताराम ववले निसर्गशाळा, पुणे. Our Upcoming Events July 2023 Jul 15 15 July 2023 Walk through Clouds & Camp Calling all dreamers and adventurers! Are you ready to experience the extraordinary? Join us on an enchanting journey as we walk through clouds, transcending the ordinary and embracing pure wonder. […] Find out more Jul 22 22 July 2023 Extreme Adventure & Camping Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Calling all adventure enthusiasts! Join us for an adrenaline-pumping Waterfall Rappelling & Monsoon Camping experience at Nisargshala! Feel the rush as you descend down roaring falls and immerse yourself in […] Find out more Jul 29 29 July 2023 Trek to Andhari Jungle & Camping Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Experience Monsoon Magic: Join Our Andhari Jungle Trek & Monsoon Camping at Nisargshala Immerse yourself in the enchanting monsoon season! Join our weekend trek to Andhari Jungle and experience the […] Find out moreAugust 2023 Aug 14 14 August 2023 Thrilling Monsoon Camp for Families Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India A thrilling adventure for entire family, walk through clouds , river crossing and waterfall rappelling. Please click here below to register Find out moreSeptember 2023 Sep 30 30 September 2023 Kutuhal – Younger Kids Camp Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Secure your child’s spot today and let them embark on a magical journey amidst Sahyadri’s natural beauty near Pune. Nature Explorers Camp awaits, ready to create lifelong memories in the […] Find out moreNovember 2023 Nov 25 25 November 2023 Huppya : Kids Nature & Adventure Camp Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Our kids the magic touch of nature, they need to listen to the enchanting music of nature, they must take dip