डोंगर उतार तसेच माळरानांवर सर्वत्र आढळुन येणारी ही वर्षायु वनस्पती पावसाळ्याच्या शेवटास सर्वांचे लक्ष वेधुन घेते. विविध रंगांची फुले येणा-या प्रजाती यामध्ये आहेत. एखाद्या माळावर अथवा डोंगर उतारावर एकाच रंगाच्या फुलांनी बहरलेले तेरड्याचे ताटवे त्या ठिकाणाला रंगीत करुन टाकतात. गौरी गणपतीच्या दिवसांत तोरणा किल्ल्याचे डोंगर उतार गुलाबी रंगाने रंगविले जातात ते याच फुलांच्या बहराने. शेकडो-हजारो किंवा लाखो वर्षे झाली असतील कदाचित ही वनस्पती तिचे अस्तित्व टिकवुन आहे. दरवर्षी गाई-गुरे-म्हशी-शेळ्या मेंढ्या चरतात, डोंगर-उताराला, माळरानांना वणवे लागतात तरीदेखील या वनस्पतीचे अस्तित्व अद्याप टिकुन आहे. पिकलेल्या फळातुन/ शेंगातुन खाली पडलेले बीज वणव्यासमोर देखील टिकतात व रुजतात. या वनस्पतीला भारताच्या अनेक भाषांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. महाराष्ट्रात मात्र सर्वत्र तेरडा याच नावाने ओळख आहे. इंग्रजी मध्ये balsam, impatiens, jewel weed, ladies’ slippers, rose balsam, spotted snapweed अशा अनेक नावांनी याला ओळ्खले जाते. शास्त्रीय नाव impatiens-balsamina असे आहे तर मराठी मध्ये तेरडा नावा व्यतिरिक्त गुलमेंधी हे देखील नाव काही ठिकाणी (गुजरात जवळचा भाग) वापरले जाते. कोकणात चिर्डा, तेरडा म्हणतात. संस्कृतात दुष्परिजती असे नाव आहे. कश्मिरी भाषेत बन-तिल किंवा ततूर म्हणतात. बंगाली मध्ये दोपाती, गुजराथी  -गुलमेंधी, हिंदी – गुलमेहंदी, कन्नड – कर्ण-कुंडल, मल्यालम मध्ये थिलम अशी वेगवेगळी नावे भारतात वापरली जातात. साधारण गवताचे जसे आयुष्य असते तसेच याचे असते. पाऊस पडायला सुरुवात झाली की मागील वर्षी वा-यासोबत इतस्तत पसरलेले बीज अंकुरतात. गौरी गणपती च्या आसपास फुलांचा बहर असतो. एक फुल एकदा फुलले की ते तीन ते चार दिवस फुललेले राहते. एका झाडास डझनपेक्षा जास्त फांद्यांना फुले येतात. कालांतराने या फुलांच्या शेंड्यांना शेंगा येतात. शेंगा अगदी छोट्या असतात व जसजशा पक्व होऊ लागतात आंत मध्ये बीज देखील तयार होतात. बीज खुपच छोटे म्हणजे खसखस च्या आकारापेक्षाही छोटी असतात. शेंगा परिपक्व झाल्यावर त्यांना अगदी हलकासा स्पर्श जरी झाला तरी फट असा हलका आवाज येऊन ही शेंग टचकन फुटते व बीज विखुरतात. लहान मुलांचा हा आवडता खेळ! यामुळेच याचे बीज संकलन अवघड होऊन जाते. शेंगा फुटण्याच्या या पद्धतीमुळेच या वनस्पती ला इंग्रजीमध्ये टच-मी-नॉट असे देखील म्हणतात. तिकडे इंग्रजीमध्ये touch me not असे ‘लाजाळु या अर्थाने’ म्हंटले जाते. आपण म्हणतो व ओळखतो ती लाजाळु वनस्पती वेगळीच आहे व ती सर्वांना माहीत आहे देखील आहे. जेव्हा ही वनस्पती नवीननवीन उगवते तेव्हा याचे कोवळे देठांची व पानांची भाजी केली जाते असे पीएफएएफ या संकेतस्थळावर समजते.  याच संकेतस्थळानुसार याच्या पानांचा रस मोस/चामखीळ घालवण्यासाठी वापरतात तर फुले शीत असल्याने भाजलेल्या जखमेवर गुणकारी आहे असे समजते. फुलांचा रस सर्पदंशावर वापरतात मात्र असा वापर भारतात कुठे केला जातोय हे मात्र स्पष्ट होत नाहीये. बीजांचा उपयोग कर्करोगाच्या उपचारांत देखील करतात तसेच गरोदर महिलेला प्रसुती वेदना येत असताना ताकत यावी म्हणुन देखील बीयांची भुकटी दिली जाते. (कुणीही वैद्यकीय सल्ल्याशिवाय केवळ या लेखाच्या आधारे तेरड्याचा किंवा अन्य कोणत्याही वनस्पतीचा उपयोग औषधासाठी करु नये) हे सर्व उपयोग खरोखरीच महाराष्ट्रात भारतात कुठे केले जातात का याविषयी संशोधन होणे गरजेचे आहे. कदाचित असे उपयोग केले जात असतील पुर्वी पण आपण ते ज्ञान गमावुन बसलो आहोत की काय असे वाटु लागले आहे. ही एक औषधी वनस्पती आहे पण अद्याप यावर भारतात संशोधन नीटसे झाले नाही असे दिसते. भारतात मुबलक प्रमाणात आढळणा-या वनस्पतीच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यास करुन जर उपयुक्त अर्क अथवा अवयव वापरण्याचे तंत्र विकसित झाले तर लाखो लोकांस रोजगार मिळु शकतो. या व्यतिरीक्त परसबागेत अथवा बागेत लावण्यासाठी देखील आपल्याकडे याचा वापर केला जातो. कास पठारावर फुलणारे या फुलांचे ताटवे मन मोहुन टाकतात. गौरी गणपतीमध्ये घरात गौरी बसवताना आवर्जुन तेरडादेखील गौरी शेजारी ठेवला जातो. याचाच एक प्रकार म्हणजे पान तेरडा (Impatiens Aculis Dalz. /  rock balsam) ही वनस्पती देखील मोहक आहे. पान तेरडाचे वैशिष्ट्य असे की ही वनस्पती खडकावर वाढते. पान-तेरड्याचा मी तोरणागडावर काढलेला फोटो खाली आहे. याचाच एक दुरचा भाऊ/बहीण म्हणजे हिमालयन बालसम (Impatiens Glandulifera). काही देशांत हिमालयन बालसम लावण्यास बंदी आहे कारण हे खुप वेगाने पसरते. पांध-या, लाल, जांभळ्या, गुलाबी रंग असलेली तेरड्याची फुले मी पाहिली आहेत. तुमच्या कडे अजुन विशेष माहिती असेल तेरड्याविषयी तर अवश्य कमेंट मध्ये अथवा माझ्या व्हॉट्सॲपवर कळवा जेणे करुन आपण ती माहिती जतन करुन ठेवु! तुमच्या भागात तेरड्याचा काही विशेष उपयोग परंपरागत खाद्य अथवा औषध म्हणुन केला जात असेल तर अवश्य कळवा.
कोणतेही महान काम तुमच्या हातुन होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठातुन पीएच डी घ्यावी लागत नाही. अशी पीएच डी तर सोडाच साधी पदवी, बारावी, दहावी पर्यंत देखील शिक्षण न झालेला एखादा व्यक्ति ध्येयाने पछाडल्याने आणि महानतम कर्म आपल्या हातुन व्हावे म्हणुन गेली जवळजवळ दोन तपे कष्ट उपसत आहे. मनुष्य जन्माने, धनसंपत्तीनेच मोठा होतो असे नाही तर कर्माने देखील तो श्रेष्ठत्व प्राप्त करुन घेऊ शकतो याचे जिवंत म्हणजे आजच्या आपल्या या प्रेरणादायी कथेचे, अस्सल जिंदगीतील नायक आहे. या हिरोची जीवनकथा व त्याचे त्याच्या धेयाप्रती समर्पण पाहिले की तुम्हाला माझ्या या लेखातील पहिल्या वाक्याचे सत्यता पटेल. आपल्या या नायकाचे नाव आहे लाल. एखाद्या सिनेमातील कथा वाटावी इतकी रंजक, करुण, दुखःद जरी असली तरी ही कथा सत्य आहे. प्रत्यक्ष घडली आहे. सकारात्मक बदल होऊ शकतात, एखादा मनुष्य आंतर्बाह्य बदलु शकतो, तो नुसता स्वतःच बदलत नाही तर त्याच्याकडुन महान असे इहलोकी महान असे काम ही होऊ शकते, त्याच्या कडून अनेकजण प्रेरणा देखील घेऊ शकतात; अशा सा-या शक्यतांना पुन्हा एकदा रान मोकळे करुन देणा-या लालचा जन्म कोल्हापुरातील एका अगदी छोट्याशा खेड्यात झाला. याचे वडील वनखात्यात रखवालदार म्हणुन केवळ दोन रुपये मजुरीवर नोकरीला होते. त्यामुळे तीन मुलांच्या त्यांच्या संसारात काटेच काटे होते. स्वतःच्या मालकीची शेतजमीन देखील अगदीच कमी असल्याने व कोरडवाहु असल्याने त्यातुन काहीही हशील होत नव्हते. लालच्या जन्मानंतर हे कुटुंब त्यांच्या दानोळी या गावातुन तमदलगे या गावाजवळील वनक्षेत्रात राहण्यासाठी गेले. आपल्या हिरोच्या नकळतच त्याच्यावर इतक्या लहान वयात जंगलांचे संस्कार सुरु झाले.सोबत चौथीपर्यंत शिक्षण देखील याच गावातील शाळेत झाले. सुटीच्या दिवशी वडीलांसोबत जंगलात, वनीकरणात काम करावे लागायचे. त्या काळी रोप बनवण्यासाठी ज्या प्लास्टीकच्या काळ्या पिशव्या मजुरांकडुन मातीने भरुन घेतल्या जात त्याची मजुरी तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल. शंभर पिशव्या मातीने भरुन दिल्यावर एक रुपया मजुरी मिळायची. आपला हिरो देखील वडीलांना त्यांच्या कामात मदत करायचा. कधी पिशव्या भरण्यासाठी तर कधी घायतळाची रोपे जमा करण्यासाठी , तर कधी डोंगर उतारावर मातीच्या ताली बांधण्यासाठी. तब्बल चार वर्षे तमदलगे तील जंगलात वास्तव्य करुन हे कुटुंब पुन्हा मुळ गावी आले. इकडे पाचवीला शाळेत प्रवेश घेऊन शाळेत जाऊ लागलेला लालचे मन मात्र जंगलात रमायचे. त्याला शाळेत जे शिक्षक होते त्यांचे नाव शेडबाळे सर. एकदा शाळेत जायला उशिर झाला म्हणुन शेडबाळे सरांनी मागेपुढे न पाहता लालच्या कानशिलात लगावली. लाल ला हा फटका अगदी वर्मी बसला. त्या दिवसापासुन लाल ने पुन्हा कधीही शाळा पाहिली नाही. जशी त्याने शाळेकडे पाठ फिरवली तसेच शाळेने, शेडबाळे सरांनी देखील कधीही त्याला पुन्हा शाळेत आणण्यासाठी प्रयत्न नाही केला. शेडबाळे सरांमुळे लालची शाळेशी, शिक्षणाशी नाळ तुटली ती कायमचीच. मग काय लाल बेफान सुटला. प्रत्येक गावात असतात तशी टुकार टवाळ माणसांचा वारसा त्याला मित्रमंडळींमुळे कधी लाभला हे त्यालाच काय पण त्याच्या कुटुंबाला देखील समजले नाही. शिक्षण सुटल्यापासुन वैवाहिक जीवन सुरु होईपर्यंत लाल होत्याचा नव्हता झाला होता. योग्य-अयोग्य, नीती-अनीती यांचा कसलाही विचार न करता मिळेल त्या मार्गाने, जसे जमेल तसे, जितके जमतील तितके पैसे कमाविणे हाच त्याचा नेम होता. गाडी रुळावरुन इतकी फाफलत गेली की लाल आता चक्क दारु गाळण्याचा व्यवसाय करु लागला. आज इतक्या वर्षांनी जेव्हा लाल ला याबाबत विचारले तर ते म्हणतात की स्वार्थ आणि मोह मनुष्याला माणुसपण सोडुन वागायला नेहमीच प्रेरीत करीत असतात. संयमाचा अभाव, मोठ्यांचा अनादर, कशाचीही परवा न करणे अशा कारणांमुळे नकळतच कधी ते वाममार्गाला लागले ते त्यांचे त्यांना सुध्दा समजले नाही. लग्न झाले, दोन मुली घरात हसु-रडु लागल्या, खेळु लागल्या. तो काळ पाहता मुलगा व्हायलाच पाहिजे असा हट्ट न करता, एका अर्थने वाम मार्गाला गेलेला लाल मात्र माणुस म्हणुन अजुनही ठाम होता. दोनच मुलींवरच समाधान मानणा-या लालच्या आयुष्याला मात्र पुढे वेगळेच वळण लागणार होते. अनुचित मार्गाचा शेवट नेहमी कुणालाही न आवडणा-या ठिकाणीच होतो. तसेच लालचे देखील झाले. मोठी मुलगी दिड वर्षांची तर छोटी मुलगी फक्त दिड महिन्यांची असताना लाल सांगलीच्या कारागृहात बंदिवान झाला. जेल मध्ये असतानाम, जे काही दिवस शिक्षा  भोगली त्या दिवसांत तावुन सुलाखुन निघालेल्या सोन्यासारखा लालमधे आंतरिक बदल झाला. तो इतका झाला की चक्क जेल मध्ये असतानाच त्याच्या हातुन जेल मधील डझनभर झाडे तुटण्यापासुन वाचली. इलेक्ट्रीकच्या तारांना लागत असल्याने ही भली मोठी झाडे तोडण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला. व त्याप्रमाणे ते काम सुर होणार इतक्यात लाल जेलर साहेबांना म्हणाला की साहेब ही झाडे कापु नका, आपण त्याच्या तेव्हड्याच फांद्या फक्त छाटु ज्या वीजेच्या तारांला लागतात. पण जेलर साहेबांना ही कल्पना जरी आवडली असली तरी ती प्रत्यक्षात करण्यासारखी नाही याचीदेखील त्यांना कल्पना होती. त्यामुळे जेलर साहेबांनी झाडे तोडली जाणारच असे ठरविले. कारण ही झाडे खुपच ऊंच होती. एका अर्थाने हे सारे महान वृक्ष होते. कदाचित शेकडो वर्षे ते ठामपणे त्याच जागी उभे असतील. लाल ला ही अडचण जशी समजली तसे लाल ने जेलर साहेबांना कळवले की लाल स्वतः झाडांवर चढुन फांद्या छाटण्याचे काम करील, ते ही पुर्णपणे त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर. जेलर साहेबांनी यावर विश्वास ठेवुन होकार दिला. ही घटना २००१ ची आहे. हल्लीच म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये लाल जेव्हा या कारागृहाच्या बाजुने , खानभागच्या रस्त्याने जात होते तेव्हा त्यांना ती सारी झाडे दिसली. म्हणजे लाल ने जे काही केले त्यामुळे ते महावृक्ष अजुनही दिमाखात उभे आहेत. त्याम्च्या अंगाखांद्यावर शेकडो हजारो पक्ष्यांची घरटी आहेत. शेकडो लोकांना सावली देणारी ही झाडे आजही जिवंत आहेत याचे बहुंशी श्रेय लाल ला जाते. तुरुंगातील शेवटच्या दिवशी त्याला घरी नेण्यासाठी त्याची पत्नी आणि दोन्ही मुली आल्या. त्या चिमुकल्या दोन्ही मुलींना पाहुन, लाल ने मनाचा निश्चय केला की पुन्हा वाममार्गाला लागायचे नाही. पुढे काय करायचे, कुठे जायचे, घर कसे चालवायचे असे काहीही माहित नव्हते पण मनाचा निश्चय मात्र पक्का होता. म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग असतोच. मार्ग नसला तरी ही सृष्टी तुमच्या निश्चयामुळे तुमच्यासाठी मार्ग तयार करतेच. काहीसे असेच झाले पुढे. स्वतःच्या गावी वाट्याला आलेल्या थोड्याशा शेतात काम सुरु केले. सोबतीला शेळीपालन सुरु केले. अपार कष्ट केले. पण हाताची आणि पोटाची जुळवणी करताना परवड व्हायचीच. आर्थिक बाजु अजुन कच्ची होत गेली. अशातच एका ओळखीतील एका सदगृहस्थाचे पुण्याजवळील पानशेत येथे एक फार्महाऊस असुन त्या फार्म हाऊस ची देखभाल, राखण, तेथे वृक्षारोपण अशा कामांसाठी या गृहस्थाला एका माणसाची गरज होती. लाल ने लागलीच हो म्हंटले व २००३ मध्ये लाल कुटुंबासमवेत पुण्याजवळील पानशेत येथे येऊन राहु लागला. बालपणातच जंगलकडु (बाळकडु म्हणतात ना तसे जंगलकडु) मिळालेले असल्याने लाल ने फार्महाऊस चे रुप पालटुन टाकले. छोट्याशा जागेत त्यांनी पन्नास झाडे लावली व जगविली. लाल चे मालक एक अभ्यासु तसेच पर्यावरणाविषयी आस्था असणारे गृहस्थ. त्यांना वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण, देवराई, दुर्मिळ देशी वृक्षांचे संरक्षण व संवर्धनाची आवड आहे. फार्म हाऊस च्या या मालकाने केवळ स्वतःचे फार्म हाऊसच सांभाळले असे नाही तर पानशेत परीसरात पर्यावरण संरक्षण, संवर्धनासाठी देखील सेवाभावी वृत्तीने कार्य
Rain Forest near Nisargshala Campsite
Whats is a “देवराई”? Its the flora and fauna preserved by the people of the land for centuries in the name of god. We have almost 6 such groves in the perimeter of 10 kms of our camping sites. Many campers ask me what is this “देवराई” . Here is some light on what it really is and how such practices make us unique globally. When the world realized, the threat of global warming, deforestation, our ancestors already have been learning and teaching generations to preserve,protect the ecosystem for thousands of years. Lets understand what’s this.. To make the environment sustainable, a number of measures are necessary to be taken up by the people and government across the globe. Some of these measures are- use of efficient and eco-friendly technologies, sustainable use of resources and adoption of indigenous practices like keeping of sacred groves. Here in the current article we are going to discuss about sacred groves, their meaning, importance and practices.   The word sacred means: considered to be holy or ‘connected with a god’ and the word ‘Grove’ means: a small area of land with trees of particular types grown on it. Thus by combining these two words the final dictionary meaning of the couple of words Sacred Groves is: “A small area of land with particular types of trees grown on it and that are considered to be holy by the local human community. In other words Sacred Groves can be defined as below- An area with particular types of trees dedicated to local deities or ancestral spirits that are protected by local communities through social traditions and taboos incorporating spiritual and ecological values are called as sacred groves. Indian Practice of keeping Sacred Groves The presence of sacred groves of India has been documented since the early 1800s. Sacred Groves of India comprise trees like Deodara (Cedrus deodara), considered to be the “abode of Gods” Sal (Shorea robusta), Rudraksha (Elacocarpus species), Bael (Aegle marmelos), and Ashok (Saraca asoca), and kadam (Anthocephalus kadamba), Pipal (Ficus religiosa), Neem (Azadirachta indica), Banyan tree (Ficus benghalensis): native to India, Mango tree (Mangifera indica) and bushes like, Basil (Ocimum basilicum & Ocimum minimum)    (native to India and Iran) and grass like Doob or Durva (cynodon dactylon) etc. See a video of our guests, involved in an activity of One with Nature @ a Devrai, the sacred grove near Pune To visit such sacred grove, and also to have best ever camping experience, Let’s go camping  
आपल्या सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याचे बेलाग सुळके, अतिखोल द-या ,श्वास रोखायला लावणारे कातळ कडे. सह्याद्रीची ओळख म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभारलेले, गगनचुंबी अभेद्य गडकोट. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथली हजारो वर्षांची महान संस्कृती. सह्याद्री ची ओळख म्हणजे याच संस्कृतीतुन जन्माला आलेले एक लोकोत्तर नर-रत्न – छत्रपती शिवाजी. सह्याद्री ची ओळख म्हणजे शिवाजी राज्यांच्या सोबत, कधी कधी त्यांच्याही पुढे जाऊन, प्राणांची बाजी लावणारे सह्याद्रीचे लाखो करोडो सुपुत्र म्हणजे मावळे. सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याच्या अंगाखांद्यावर उगम पावुन, पुर्व दिशेचा लाखो-करोडो हेक्टरचा प्रदेश सुपीक करणा-या नद्या. सह्याद्रीची ओळख म्हणजे कातळ कड्यांवरुन बेधुंद होऊन, खोलवर द-यांमध्ये उड्या घेणारे, स्वतःला झोकुन देणारे हजारो धबधबे. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथला मोसमी, बहारदार पाऊस. सह्याद्रीची ओळख म्हणजे… सह्याद्रीची ओळख नव्याने माझ्या सारख्या भटक्याला अगदी रोज होत असते. जेव्हा जेव्हा मी निसर्गात, सह्याद्रीच्या राकट प्रांगणात जातो तेव्हा तेव्हा, मला सह्याद्री नव्याने ओळख होत असते. सह्याद्री नित्य-नुतन जरी मला वाटत असला तरीही, मित्रानो माहितीये का तुम्हाला की सह्याद्री जगातील सर्वात वयोवृध्द डोंगररांगांमधील एक आहे. सुमारे १५ करोड वर्षांचा आहे बरका आपला लाडका सह्याद्री. म्हणजे १५ करोड वर्षांपुर्वी सह्याद्री (दख्खन पठारासहीत) आशिया खंडाशी जोडला गेला. त्यापुर्वी म्हणजे अंदाजे ४० करोड वर्षांपुर्वी पृथ्वीवर एकच भुखंड होता. मागील शतकातील एक भु-शास्त्रज्ञ आल्फ्रेड वेगेनेर यांनी त्यांचे सगळे आयुष्य खंडांतराच्या (खंडांतर हा मी योजलेला शब्द आहे याला इंग्रजी मध्ये Continent Drifting असे म्हणतात) अभ्यासासाठी वेचले. वेगेनेर यांनी पृथ्वीवरील सर्वात जुन्या, एकमेव असलेल्या भुखंडाला पॅंजेया/पॅंगईया म्हणजे संपुर्ण पृथ्वी असे नाव दिले. साधारण पणे ४५० करोड वर्षापुर्वी, अंतरिक्षामधील धुळ, वायु व इतर अंतरीक्षीय घटकांमुळे पृथ्वीची निर्मिती झाली. त्याच दरम्यान सुपरनोव्हा म्हणजे महाभयंकर विस्फोटामुळे, पृथ्वीचे तापमान वाढुन, धुळीने तयार झालेला तो गोळा वितळला. त्यालाच आपण ज्वालामुखी म्हणतो. हा ज्वालामुखीच जसजसा प्रवाही झाल त पासुन प्रत्यक्ष खडक, पर्वत, डोंगर तयार झाले तेव्हा पृथ्वीवर एकच भुखंड तयार झाला. एकच असलेला हा भुखंड काही काळाने तुटला व अनेक छोटे-मोठे भुखंड वेगवेगळे होऊन पृथ्वीवर विखुरले गेले. खरतर हा खुप मोठा विषय आहे. याविषयी आपण कधीतरी पुन्हा सविस्तर माहिती घेऊ . खालील व्हिडीयो पहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, सह्याद्री व हिमालय कसा अस्तित्वात आला. वर मी सह्याद्रीस वयोवृध्द म्हणालो याचे कारण असे की, हिमालय पर्वत रांग की जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे, ती भारतीय उपखंडाची व आशिया खंडाची धडक झाल्यानंतर अस्तित्वात आली आहे. हिमालयाचा जन्म त्या मानाने खुप अलीकडचा आहे. म्हणुनच सह्याद्रीस मी वयोवृध्द डोंगर असे म्हणतो. सह्याद्रीच्या पुरातन असण्याच्या खाणाखुणा आपणास सह्याद्रीच्या कातळाकड्यांकडे पाहुन दिसतात. नुकताच मी, साल्हेर सालोटा या गडांना भेट देऊन आलो. यातील सालोटाचे कातळ कडे तुटण्याच्या मार्गावर आहेत. एखादा हलका भुकंप देखील सालोट्याचा भुगोल बदलुन टाकेल. अशीच काहीशी अवस्था आपणास सह्याद्री उत्तुंग सुळक्यांची झालेली दिसते.   आपल्या मुळशी वेल्हे तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजेच मावळ भाग हा सह्याद्रीचाच भाग होय. मुळशीतील ताम्हिणी म्हणजे हंगामी पावसासाठी भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. तशीच अवस्था  भोर – वेल्ह्यातील मावळ पट्ट्याची आहे. कित्येक ठिकाणी पर्जन्यमापकाची उपलब्धता नसल्याने वास्तविक पर्जन्यमान कुठे किती होते याची माहिती मिळत नाही. पण मावळ पट्ट्यात तीन-तीन चार महिने सुर्यनारायणाचे दर्शन होत नाही. काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत इथे वर्षावने होती. ही जंगले इतकी घनदाट होती की उन्हाळ्यामध्ये देखील सुर्यकिरणे जमिनीवर पडत नसत. किर्र्र झाडी, महाकाय वृक्ष, तितक्याच मोठाल्या, जाडजुड, पुरातन वेली हे सारे सह्याद्रीला एका विशिष्ट ऊंचीवर नेऊन ठेवते. सह्याद्रीतील किल्ले हे जितके उत्सुकतेचा विषय आहे तितके जास्त कुतुहलाचा विषय आहे सह्याद्रीतील वनसंपदा. या वनसंपदेमध्ये, दरी-खो-यात, नद्या-नाल्यांत, कातळ-कड्यांवर, धबधब्यांवर, मोकळ्या माळरानांवर एक आख्खी सजीवसृष्टी गेली लाखो वर्षे जगत आहे, हे आपणास ठाऊक आहे काय? नाचणारा बेडुक नावाची एक बेडकाची प्रजाती आहे, ही प्रजाती किमान सात लक्ष वर्षांपासुन सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर नांदते आहे. सरीसृप, उभयचर, जलचर अशा अनेक प्रजाती इथे लक्ष-लक्ष वर्षांपासुन नांदत आहेत. मनुष्यास या सर्वांविषयी जेवढे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त ज्ञान आपण अजुन मिळवायचो आहोत. आपण अनभिज्ञ आहोत. भारताच्या एकुणच हवामानावर परिणाम करणारा मॉन्सुन म्हणजे मोसमी पाऊस भारतात पडतो याचे कारण फक्त आणि फक्त सह्याद्री आहे. एकेकाळी सजीव सृष्टीसाठी नंदनवन असणारा सह्याद्री वर्तमानात सजीवांसाठी शाप ठरत आहे. सजीव म्हणताना मी यांत मनुष्यास देखील मोजले आहे. आज भलेही अज्ञान, दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे मनुष्यास वाटत असेल की तो सुरक्षित आहे, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. व याचे संकेत युनेस्को द्वारे काही वर्षांपुर्वी दिले गेले आहेत. जगातील आठ जागतिक वारसा असलेल्या स्थळांच्या यादीमध्ये सह्याद्रीला स्थान देण्यात आले आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कित्येक सजीव नांदताहेत मित्रहो. फुले येणा-या वृक्ष-वनस्पतींच्या एकुण ७४०२ प्रजाती सह्याद्रीमध्ये आहेत. फुले न येणा-या वनस्पतींच्या अंदाजे १८०० प्रजाती आहेत.सस्तन प्राण्यांच्या १३९ प्रजाती आहेत. पक्षांच्या ५०८ प्रजाती आहेत. १७९ उभयचर, ६००० किटकांच्या प्रजाती, २९० गोड्यापाण्यातील माश्यांच्या प्रजाती आहेत. इथल्या जंगलांची आणखी एक खासियत अशी आहे की, ही जंगले सदाहरीत आहेत. झाडा-झुडूपांच्या इतक्या प्रजाती आहेत की काही झाडांची पाने जरी काही काळापुरती गळली तरी एकुण जंगल मात्र हिरवेगारच दिसते. तुम्हाला हे पहायचे असेल तर याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कोकण दिवा या ट्रेकचा व्हिडीयो अवश्य पहा. सह्याद्री आणि मॉन्सुन चे जसे नाते आहे तसेच नाते सह्याद्री व दुर्मिळ होत असलेल्या प्रदेशनिष्ट (Endemic) प्रजातींचे आहे. जागतिक दृष्टीने पाहिले तर नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीपैकी ३२५ प्रजाती सह्याद्रीमधील आहेत. ही अत्यंत दुखःद गोष्ट आहे. या ३२५ प्रजातींमध्ये २२९ प्रजाती वृक्ष-वनस्पतींच्या, ३१ प्रजाती सस्तन प्राण्यांच्या, १५ पक्ष्यांच्या, ४३ उभयचर, ५ सरपटणारे व एक मासा आहे. यापैकी ५१ प्रजाती कदाचित त्यांच्या अखेरच्या काही पिढ्यांमध्ये आहेत. निसर्गाशी मानवी नाते, काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत तरी सौहार्दाचेच होते असे मी म्हणु शकतो. याचे कारण असे की, मावळ भागातील काही लोकरिती मनुष्य व निसर्ग यातील सौहार्द दाखवणा-या आपणास पहावयास मिळतात. उदा – जेव्हा जुन जुलै मध्ये पावसाला सुरुवात होते, तेव्हा मोठ्या नद्या, धरणांतील मासे अंडी सोडण्याकरीता, नदीच्या उगमस्थानाकडे पोहण्यास सुरुवात करतात. नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने ते पोहतात. हजारो वर्षे मावळात राहणा-या मावळ्यांना, माश्यांच्या या प्रवासाविषयी माहिती अगदी पुर्वापार आहे. असे उलट दिशेने पोहणारे मासे पकडणे व खाणे खुपच सोपे काम आहे. तरीही मावळातील मंडळी, अंडी सोडण्यासाठी प्रवाहाच्या उलट दिशेने जाणारे मासे पकडत नाहीत व खात ही नाहीत. हेच मासे जेव्हा, अंडी सोडतात व पुनः प्रवाहासोबत पोहण्यास सुरुवात करतात तेव्हा, विशिष्ट पध्दतीचे बांबु व लाकडी जाळे तयार करुन मासे पकडले जातात.  विशिष्ट पध्दत अशासाठी म्हणायचे की, जाळ्यातील एकेका अटकावाचा आकार एवढा असतो की यात विशिष्ट वयाचाच, विशिष्ट आकाराचाच मास अडकेल. व लहान मासे, की जे अजुन पुर्ण वाढलेले नाहीत ते पुन्हा नदी-धरणात जातात. म्हणजे नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेवर फारसा परिणाम न करताही मावळातील सुज्ञ लोक मांसाहार करीत होते. आजही अशा पध्दती आपणास पहावयास मिळतात. हे नाते देखील, वाढत्या शहरीकरणामुळे , दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींसारखेच, नष्ट होण्याचा मार्गावर आहे. व हेच खरे कारण आहे, सह्याद्रीच्या होत असलेल्या –हासाचे.