वर्ष २०१९ सरले आणि सरता सरता माझ्यासाठी एक नवीन ओळख निर्माण करुन गेले. सातत्य, चिकाटी, कणखरपणा, ध्येयावरुन चित्त ढळु न देण्याची सवय, अशा अनेक गोष्टी मला माझ्या एका धावण्याच्या व्यायामाने मिळाल्या. सकाळ वर्तमान पत्रातील माझा लेख वाचुन अनेक मित्रांनी फोन केले , कौतुक केले. अनेकांनी त्या लेखातुन प्रेरणा मिळाल्याचे सांगुन ते देखील रनिंग करण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगितले. सोबतच धावणे सुरु कसे करावे? याचे काही नियम किंवा पथ्ये आहेत का? रोज किती धावावे? सुरुवातीला किती धावले पाहिजे व टप्पे कसे कसे असावेत असे बरेच प्रश्न मला विचारले. हा व्यायाम करीत असताना आहार कसा असला पाहिजे याबाबतीत देखील अनेकांनी विचारले. धावणे हा माझा आवडीचा व थोडाबहुत अनुभवाचा विषय देखील झालेला असल्याने , मी वरील प्रश्नांबाबत सर्वांचे शंका समाधान करण्याचा प्रयत्न करीत आहे. आशा आहे या लेखामुळे तुमच्या आयुष्यात थोडाफार तरी सकारात्मक बदल होईल. धावणे का करायचे? याचे उत्तर मी माझ्या मागील लेखामध्ये दिलेच आहे. तरीही थोडक्यात सांगतो. आपण म्हणजे मनुष्य नावाचा प्राणी बनलेला आहेच मुळी धावण्यासाठी. निसर्गाने अथवा देवाने आपणास जसे बनविले आहे त्यामागचा हेतु आहे की आपण धावावे. पुर्वीच्या काळी म्हणजे आदीम काळी आपण वनवासी असताना, अन्नसाखळीतील वरच्या स्तरावरील प्राण्यापासुन आपले  स्वतःचे रक्षण करण्यासाठी धावणे गरजेचे होते. तसेच आपण स्वतःचे पोट भरण्यासाठी, स्थलांतरे करण्यासाठी देखील धावण्याची गरज होती, कारण मनुष्य आदीम काळी भटकाच होता इतर वन्य जीवांप्रमाणे. त्यामुळेच आपल्या शरीराची जडणघडण धावण्यासाठी म्हणुनच बनवली गेली आहे. आपण ज्या साठी बनलो आहोत, ते करणे आपण सोडुन दिले आहे. भलेही आता आपणास शिकार करावी लागत नाही किंवा स्वतः शिकार होण्यापासुन स्वतःला वाचवण्याची देखील गरज नाही. यामुळे आपले धावणे थांबले व आपण अनैसर्गिक जीवन जगु लागलो आहोत. निसर्ग नियमांच्या विरुध्द. त्यामुळेच धावणे करायचे. सुरुवात कधी करायची? खरतर धावणे ही अशी गोष्ट आहे की जी आपोआप करीत असतो, म्हणजे आपणास कुणीही धावायचे कसे हे शिकविलेले नसते तरीही अगदी सर्वांना धावता येते. त्यामुळे जेव्हा आपणास नैसर्गिक रित्या धावता येण्यास जमते अगदी तेव्हापासुनच सुरुवात केली पाहिजे. म्हणजे मग पुढचे सारेच्या सारे आयुष्य निरामय, तंदुरुस्त असे होऊन जाईल. अनेकांनी ही संधी गमावलेली असते, त्यामुळेच असा प्रश्न पडतो की धावण्यास सुरुवात कधी करायची. तर याचे अजुन एक सोपे उत्तर आहे ते म्हणजे अगदी आजपासुन सुरुवात करावी. धावण्यास सुरुवात करण्यासाठी मुहुर्ताची वाट पाहण्याची गरजच नाहीये. जेव्हा समजेल की धावणे गरजेचे आहे तेव्हा लागलीच धावण्यास सुरुवात करावी. धावण्याचा व्यायाम कोण करु शकतो? अगदी कुणीही. शिशु, बाल, किशोर, किशोरी, तरुण, तरुणी, पौढ पुरुष, स्त्रिया, वृध्द , ज्येष्ठ मंडळी. हो कुणीही धावण्याचा व्यायाम करु शकते. तरुणांना वाटत असते की आता गरज नाहीये. वयस्कर लोकांना वाटते की आता आपण धावु शकणार नाही. स्त्रियांना वाटते की हे पुरुषांसाठीच आहे. असे अनेक गैरसमज आहेत धावण्याच्या बाबतीत. मी धावणे सुरु केले व सोबतच या विषयावर संशोधन देखील करीत गेलो. यातुन मला असे समजले की, धावणे कुणीही, कोणत्याही वयात करु शकतात. याला वयाचे लिंगभेदाचे बंधन अजिबात नाही.  एक उदाहरण तर अगदी बोलके आहे. चार वर्षापुर्वीची ही गोष्ट आहे. एका वयस्कर माणसाच्या आजारपणाचा खर्च निघावा म्हणुन त्याची पत्नी, चक्क अनवाणी पायाने मॅरेथॉन मध्ये धावली व जिंकली देखील. त्यावेळी तिचे वय होते ६० वर्षे फक्त. आता मला सांगा, धावण्यासाठी वयाचे, स्त्री-पुरुष असण्याचे काही बंधन आहे का मित्रांनो? अजिबात नाही. सुरुवात कशी करायची? यात कसलेही रॉकेट सायन्स नाहीये. दररोज शक्यतो सकाळी पायात बुट घालुन मैदानावर धावायला जायचे. आपणास धावायची सवय नसेल किंवा आपले वजन प्रमाणापेक्षा खुपच जास्त वाढलेले असेल तर सुरुवातीचे काही आठवडे थोडे कमीच धावा. थोडे कमी म्हणजे किती तर आपले शरीरच आपणास सांगत असते थांबायचे की सुरुच ठेवायचे धावणे ते. आपल्या आतुन आवाज येत असतो तो ऐकला की झाले. दम लागला की थांबावे. मी जेव्हा धावण्यास सुरुवात केली तेव्हा मला दम लागला की मी थांबायचो नाही. मी वेग कमी करायचो. दम लागल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपले शरीर सरळच ठेवायचे. कमरेतुन झुकायचे नाही. आपली छाती, फुफ्फुसे, श्वसनमार्ग सरळ रेषेत असणे गरजेचे असते. दुसरी एक गोष्ट म्हणजे धावताना अथवा दम लागल्यावर देखील तोंडाने श्वास कधीही घेऊ अथवा सोडु नये. तुम्ही जर इंटर्नेट युट्युब वर सर्च कराल तर तुम्हाला रनिंग कसे करायचे हे सांगताना त्या व्हिडीयो मध्ये ज्या पधद्ती सांगितल्या आहेत त्या सामान्यतः पावर रन म्हणजे कमी अंतराच्या शर्यतींसाठी धावायचे कसे हे सांगणा-या असतात. त्यामुळे त्यावर विसंबुन राहु नका. तोंडांने श्वास घेतला तर घसा लवकर कोरडा पडतो. तहान लागते. डीहायड्रेशन होऊन चक्कर देखील येऊ शकते. तसेच तोंडाने श्वास घेण्याचा आणखी एक तोटा असा आहे की, तोंडाने श्वास घेताना आपला आपल्या भावनांवर देखील ताबा राहत नाही. श्वास नेहमी नाकानेच , आणि तो ही दिर्घ-खोल श्वसन असा घ्या व सोडा. हेच तंत्र दैंनदिन जीवनात देखील वापरता येते. जेव्हा जेव्हा म्हणुन राग येतो तेव्हा लक्ष देऊन तुम्ही नाकाने दिर्घश्वसन केले तर क्रोधावर विजय मिळवणे देखील खुपच सोपे होऊन जाते. धावणे तुमच्या जीवनशैलीचा भाग बनले पाहिजे. जरी आपण बनलो धावण्यासाठीच असलो तरीही आपण सगळे एकसारखेच किंवा एकसमान अंतर किंवा धावण्याचा एकसमान अवधी असे काही गृहीत धरु  नये. कारण आपण प्रत्येक जण वेगळे आहोत. आपल्या शरीराला साजेल, रुचेल असे धावणे, तितके धावणे, तितका वेळ धावणे आपण केले पाहिजे. आणि उउतरोत्तर आपल्या क्षमता वाढत जातातच. हा माझा स्वतःच अनुभव आहे. धावताना किंवा कोणताही व्यायाम करताना,लक्षात ठेवा किमान ३० मिनिटे तो व्यायाम केलाच पाहिजे. तसे केले तरच तुमच्या शरीराला त्या व्यायामाचा लाभ होतो. व्यायामास सुरुवात केल्यानंतर २२ मिनिटांनी आपल्या शरीरातील कॅलरीज जळण्यास सुरुवात होत असते. व ती जळण्यास सुरुवात होऊन पुढचे आणखी काही मिनिटे तरी सुरुवातीच्या काळात जळली पाहिजे. त्यामुळे सुरुवात करताना किमान अर्धा तासाचे ध्येय ठेवा. यातही तुम्ही धावणे व चालणे असे मिश्रण करु शकता. तुमच्या शरीराला धावण्याचा सराव होईपर्यंत तुम्ही चालणे देखील करा. म्हणजे सुरुवातीच्या काळात ४ मिनिटे धावल्यानंतर २ मिनिटे चालावे. पुन्हा ४ मिनिटे धावणे,दोन मिनिटे चालणे. एकदा का तुमच्या शरीराला धावण्याचे प्रशिक्षण मिळाले तर तुमचे शरीरच तुम्हाला सांगेल किती धावावे किती चालावे. तुम्ही घरातील बाथरुम मध्ये पाण्याने अंघोळ करण्यापुर्वीच तुम्ही घामाने अंघोळ केलेली असली पाहीजे, इतका वेळ आपण व्यायामासाठी दिला पाहिजे. धावण्यात देखील तुम्ही नाविण्य आणु शकता. मी कधी कधी डोंगरावर पळत जातो, कधी घाट चढतो पळत तर कधी किल्ले चढतो. कधी कुत्र्यासोबत तर कधी जंगलातुन असे वैविध्य मी माझ्या धावण्यात आणतो. एखादा डोंगर, घाटवाट दिसली की मला त्या घाटवातेवरुन धावण्याचा मोह होतो. वेल्ह्यात मी अशा अनेक वाटा शोधल्या आहेत. तोरणा किल्ला मी चहुबाजुंनी पळालो आहे. लक्षात ठेवा, इथे किती अंतर धावलो याला किंवा किती वेगात किती धावलो याला अजिबात महत्व नाहीये. धावणे महत्वाचे. आहार काय करावा? आपला नेहमीचाच आहार करावा. त्यात विशेष काही बदल करण्याची गरज नाही. धावण्याने कॅलरीज
Now as the entire world is stopped due to novel corona virus; we all have understood the importance of going out. We all are locked down in our homes, some are locked at work places and some are locked down at community hospitals saving lives. I am a trekker. And I go trekking every now and then. I go in wilderness at least once a week. And apart from that I am a daily runner. I run every day. Everything has been stopped now. Things have been stopped only for us to make sure that we have better lives post pandemic. As I spend entire day just sitting at home, watching Television, reading books, surfing internet; I am missing trekking a lot. This thought of trekking made me write an article about trekking so that new comers can benefit from it. There are plenty of articles and videos on internet about what trekking is and the benefits of trekking. You just have to go to google and search with ‘What is trekking’ keywords and you get loads of article links. I am not going to go in the same topic now. Rather I shall be writing something which is least talked about. Why is trekking so expensive? Trekking is basically an activity conducted for more than one day and walking in rustic, natural world. In this activity we have to stay for one or more nights outdoors. Especially in India people go trekking different peaks in Himalayas or regional mountain ranges. Maharashtra has become a trekking hotspot over a few decades now. We have seen great trekkers like Gopal N Dandekar, Anand Palande, Usha Page, Nandu Page are a few names who have trekked Sahyadri and made very useful notes which are helping people like us even now. Over the time, as globalization and IT revolution happened, Maharashtra has become hub for corporate & businesses. This has attracted youth and families to come to Maharashtra. This newly relocated population, with their limited time resources and lack of local knowledge and language, has opened a new horizon for some to organize trekking events in metropolitan cities of Maharashtra. Not only this newly relocated population but also the younger generation of Maharashtra also has adapted to the global business and employment trends. This GenX don’t have time as well patience to study, plan and organize trek themselves. This new generation is totally dependent on trek organizers now a days. So the organizers have to keep the prices as per the industry standards so that they themselves can also lead the same life style as their counter customers are leading. And there is nothing immoral at all in this. They charge for services and food of which the corporate customers are used to. Trekking, as a hobby if one develops strategically, learns and adapts the basics of Trekking, then it’s not expensive. Now a days there is a trend that trekking is something that anyone can buy with money. And that’s the reason many people started selling trekking as a service in which they are offering city facilities to attract more customers. People need bottled water when they go trekking, people want to boose around campfire when they go trekking, people want travel luxury when they go trekking, people want cozy beds when they go trekking, people want super glamorous, shining toilets when they go trekking, People want tasty delicious ready platter food when they go trekking, people want everything without taking efforts and these are the reasons why trekking is so expensive. I remember some of our treks which we did in record low cost. We did Pratapgad (one night stay), Mahabaleshwar(two night stays), kamalgad(one night stay) a total of 4 night stays trek in just 103 Rs. This cost included mostly transport cost and food ration. We never bought ready platter food or a cup of tea while on treks. We managed to cook everything ourselves with whatever ration that we had. We carried all the grains, necessary masalas, salt, tea powder, milk powder etc with minimum utensils, in every participant’s backpacks. There are many more treks I still remember during which we spent bare minimum money.   And one more thing, we still do such treks where in the cost involved is of only for transport and food ration or packed food everybody bring themselves. We don’t buy bottled water whilst trekking. Alternatively you can request locals also to help you with village food which wouldn’t cost much. This way you help generate employment as well to the locals, in right way. If you still rely on some organizer to arrange food for you and arrange luxury for you, then trekking is expensive for you. If you want to develop this hobby you can go along with some group initially and learn best trekking practices. Find your suitable trek mates and stick to them only for the life time if possible. If you could do this, then trekking is not expensive for you. Regards Hemant S Vavale Author of this article, along with Yashdeep and Sanjay run an enterprise with name nisargshala. This place is for city dwellers to experience nature at its best, near Pune. You can do camping, trekking, rappelling, waterfall rappelling, BBQ at our place.
Star gazing
You don’t have to be an expert astronomer for star gazing with kids; you can learn right alongside them. Stargazing as a family can be a lot of fun, but what you do need is time and patience—if you have a hard time locating objects in the sky, imagine how hard it can be for a 6 year old! The most important thing that you can do for your child is to help them to appreciate the beauty of the night sky, and to help them become children who look up and wonder. Provide opportunity One of the roadblocks for parents stargazing with their children is the timing—it obviously has to happen at night, right? While actual “star”gazing needs to happen when it’s dark, there are some astronomical events that can be seen in the daytime such as eclipses, viewing the moon at certain phases, and rare planet transits across the sun. These can provide some great introductory opportunities for children, but the real excitement definitely happens at night. It is certainly a great idea to learn a constellation or two, or find out which planets are in the sky so that you can point them out to your children on the way to the car after seeing a late night movie. These can be great learning opportunities for your children, but to really inspire a sense of wonderment about the sky, you need to be intentional about setting aside “stargazing time”. If you are a family that regularly camps, this can be a great time to stargaze. You are often already up later than usual, and normally in a dark area away from city lights. Another idea is to set up a “family stargazing party” in your own backyard or someplace close to home—just keep in mind that the amount of light around will determine how many objects you will be able to see in the night sky. Comfortable environment The best way to ensure a positive experience for you and your child is to provide a relaxing and cozy setting. Standing up with your neck craned to look up is only comfortable if you plan to be out for just a short time. If your plan is to be out for longer than a few minutes, have a blanket to lie down on or reclining beach-style chairs to relax in. Have with you any materials that you might need—a planisphere, a flashlight (paint the lens with red nail polish so that it’s not too bright), and guidebooks from the local library. Snacks Snacks are a great thing to have for children if they start to get bored—why not go with the theme and get Moonpies or make Meteorite Krispie Treats. This can inspire a lot of fun with young children, and you can re-name almost anything with a “space” name— i.e. “Cosmic Crackers” or “Martian Milk Chocolate”. For older children, bring their favorite snack along as a special treat. While a nice summer night is probably the most comfortable, consider stargazing in the winter. Early winter nights are ideal for children who have earlier bedtimes. Just put on your winter gear and don’t forget the hot chocolate! Bring something else to do While we would all love for our children to have the time of their lives gazing up at the sky for hours, this might not be a reality for most children. Have some things planned other than just stargazing. Bring along your Stargazing Diary. Have your iPhone programmed with a special playlist of space-themed songs, or just a few of everyone’s favorites.Check out a few astronomy books from the library and take some time to read various constellation myths. Whatever you do, please take this time to put away the media devices! This is a great opportunity to “unplug” with your child. Resist the temptation to quickly check your email, messages, whatsapp or send that text that you forgot about earlier in the day. Your children will take your lead on this. If you bring your laptop along, it won’t be long before they are begging to watch that YouTube video or check Facebook. Does it work? how? Keep the developmental stage and attention span of your children in mind as you begin to look at constellations and other objects. I have found that one or two new constellations are about all that most people (including adults!) can remember at a time. It’s best to focus on remembering one constellation than introducing 7 or 8 that you can’t remember.  The ability to “connect the dots” of a constellation in the sky can be very hard for children depending on their developmental stage. For children who have a hard time “seeing” the constellations, encourage them to find their own. They can look for different shapes that the stars make in the sky, or find the first letter of their name in the stars. Utilize your child’s imagination—have them make up their own myths about constellations that they see. Check out books from the library on constellation myths and use this time to tell a few stories. Why wait? Get out and go star gazing with kids For any query regarding booking, kindly contact – 09049002053 / 07709007641 Note – If both the mobile numbers above are not reachable call 09822042117  
Who doesn’t want such an vicinity where there is absolutely no disturbance and where there is thorough peace. We all love such an experience. However, you can get such an ambience only when you trek, hike, camp in the real nature, up the mountains.
The Pleiades constellation - Stargazing near Pune
नेत्रतज्ञ हल्ली ज्या प्रमाणे प्राथमिक नेत्र चिकित्सा करतात, अगदी त्याचप्रमाणे प्राचीन काळीदेखील नेत्र चिकित्सा केली जायची. फरक फक्त एवढाच होता की हल्ली डॉक्टर्स अक्षरे आणि चिन्हे ओळखायला लावतात, तर पुर्वी आकाशातील कृत्तिका नक्षत्र रुग्णास पाहावयास लावुन, प्राथमिक नेत्र चिकित्सा केली जायची. ज्या व्यक्तिला कृत्तिका तारकासमुहामध्ये सहा पेक्षा कमी तारे दिसत त्यास दृष्टीदोष आहे व ज्यास सात किंवा जास्त तारे दिसत, त्यास पुढे हेरगिरी, जासुसी सारख्या क्षेत्रात संधी मिळत असे. ज्यास सहा तारे दिसत, त्याची दृष्टी साधारण म्हणजे व्यवस्थित आहे असे मानले जायचे. पाहिलय का कधी तुम्ही , हे कृत्तिका नक्षत्र, आकाशामध्ये? या दिवसात जर तुम्हाला कृत्तिका पाहायचे असेल तर, संध्याकाळी, म्हणजे काळोख होतानाच, हो अगदी होतानाच व पुढचा काही काळच, हे नक्षत्र, आकाशामध्ये पश्चिम गोलार्धात दिसते. या दिवसांमध्ये अंधार होताना हे नक्षत्र उगवलेले असते. व आकाशात एक चतुर्थांश वरही आलेले असते. सर्व प्रथम आपण कृत्तिका चे चित्र पाहुयात आणि मग त्याची कथा. कृत्तिका या नक्षत्रामध्ये ३०० च्या आसपास तारे, दुर्बिणीतुन पाहता येऊ शकतात. व उघड्या डोळ्यांना ६ ते ७ तारे , विनासायास दिसतात. अत्यंत लक्षणीय अशी ठेवण असलेल्या ह्या तारकासमुहातील मुख्य ६-७ ता-यांच्या भोवती विशिष्ट निळ्या रंगाची प्रभा दिसते. पुण्यातुन जर आपण कृत्तिका, ह्या दिवसांत पहायचा म्हंटले तर संधीकाळानंतर अगदी थोडाच वेळ कृत्तिका बघण्याची संधी मिळते. तेच आपण नोव्हेंबर डिसेंबर जर कृत्तिका पाहु जाल तर, जवळ जवळ ६ ते ७ तास आपण कृत्तिका आकाशामध्ये पाहु शकतो. कृत्तिका उगवताना, तिची जी रचना असते, त्याच्या अगदी उलटी मावळताना दिसते. असे सर्वच तारका समुहांच्या बाबतीत घडत असते. कृत्तिकेच्या आधी अश्विणी, भरणी पश्चिमेकडे मावळतीकडे असतात तर, रोहीणी, मृग मागोमाग, दक्षिण-पुर्व आकाशामध्ये दिसतात. वर हबल टेलीस्कोप मधुन टिपलेले कृत्तिकाचे छायाचित्र आहे. कृत्तिका नक्षत्र पृथ्वीपासुन सुमारे ४०० प्रकाशवर्षे इतके दुर आहे.  या तारकापुंजातील सर्वात तेजस्वी तारा म्हणजे अंबा; यास इंग्रजी मधेय Alcyone असे म्हणतात. हल्लीच केलेल्या एका शोधात असे समोर आहे आहे की या तारकापुंजातील सर्वच तारे त्यांची तेजस्विता बदलणारे आहेत. यांच्या प्रखरतेमध्ये होणारे हे बदल असंबंध्द म्हणजेच अनियमित आहेत. केवळ एकच तारा ज्याचे नाव Maia आहे, या ता-याची प्रखरता नियमित पणे बदलते. दर दहा दिवसांनी त्याच्या प्रखरतेमध्ये बदल जाणवतो. ही निरीक्षणे व अभ्यास केप्लर स्पेस टेलीस्कोप द्वारे केले आहेत. खालील आकृतीमध्ये तुम्हाला या ता-यांच्या प्रखरतेमध्ये होणारे ब्दल पाहता येतील. मनुष्याला पृथ्वीवर अवतरुन जितका काळ झाला अंदाजे तेवढेच म्हणजे २५ लक्ष वर्षे किंवा त्याहुन थोडेसेच जास्त वय आहे या तारकापुंजाचे. कृत्तिका नक्षत्र, राशी चक्रातील वृषभ राशीचा भाग आहे. वृषभ राशीमध्ये रोहीणी (पुर्ण), कृतिका (तीन चतुर्थांश) व मृग नक्षत्र (अर्धे) यांचा समावेश होतो. आता चित्रांची चित्तरकथा – भगवान भोले भंडारींच्या तेजाने, जन्माला आलेले मुल, सहा कन्यकांद्वारे वाढविले जाते. ह्या सहा कन्यका म्हणजेच कृत्तिका. व त्या मुलाच्या धातृ मातांच्या मुळेच भगवान शंकरांच्या त्या योध्द्या पुत्राला नाव पडले कार्तिकेय. एक कथा पुरांणांकध्ये अशी आहे की, कृत्तिका म्हणजे सहा ऋषिपत्न्या आहे. सप्तर्षी नावाच्या नक्षत्रातील सहा ऋषिंच्या सहा पत्न्या म्हणजे कृत्तिका. संभूती, अनुसुया,क्षमा,प्रीती,सन्नती,अरुंधती आणि लज्जा अशी ह्या कृत्तिकांची नावे आहेत. ( तर सातवे ऋषि वसिष्ट हे त्यांच्या पत्नी सहीतच, सप्तर्षी तारका समुहामध्ये आहेत. वसिष्ट व त्यांची पत्नी अरुंधती, ही एक जुळी ता-यांची रचना आहे. हे दोन्ही तारे, एकमेकांभोवती, अत्यंत संथ गतीने, एकमेकांभोवती फिरत असतात. या विषयी विस्ताराने पुन्हा कधी तरी ) भारताप्रमाणे अन्य संस्कृतींमध्ये देखील, या तारकासमुहाला वेगवेगळ्या नावाने आणि कथांनी ओळखले जाते. मुळ अमेरीकन संस्कृतीमध्ये देखील एक कथा येते. सात मैत्रिणी एकदा, चांदण्या रात्री, गम्मत, छंद म्हणुन दुरवर एका ठिकाणी नाचगाण्यासाठी जातात. तिथे गेल्यावर, नाच गाणे सुरु असताना, अचानक जंगली श्वापदे चहुबाजुंनी त्यांना घेरुन , ठार करणार, इतक्यात, त्या मुली, ज्या खडकावर उभ्या असतात, त्या खडकालाचा प्रार्थना करतात की त्या प्राण्यांपासुन वाचव म्हणुन. क्षणार्धात, तो खडक, असाच्या असा जमीनीपासुन, उंच उंच वाढु लागतो, व एक मोठा पर्वताचा सुळकाच त्या ठिकाणी उभा राहतो. पुढे जाऊन ह्या मुली तारका बनुन आकाशात जातात व तो सुळका आजदेखील उत्तर अमेरीकेमध्ये डेव्हिल्चा मनोरा किंवा पर्वत म्हणुन ओळखला जातो. प्राचीन ग्रीक सभ्यता देखील ह्या तारका म्हणजे मुली आहेत असेच मानायची. ग्रीकांच्या कथेमध्ये, या मुलींच्या मागे कुणी जंगली प्राणी लागलेले नसतात, तर ओरायन नावाचा शिकारी लागलेला असतो. सात वर्षे पळुन पळुन थकल्यावर त्या मुली झीऊस नावाच्या ग्रीक देवतांच्या राजाची प्रार्थना करुन वाचवण्याची विनंती करतात. झीऊस दयाळु होऊन, त्या सात मुलींना आकाशामध्ये स्थिर आणि सुरक्षित करतो. कृत्तिका या तारका समुहास, इंग्रजीमध्ये प्लेडीस असे म्हणतात. आधुनिक खगोलशात्र मानते की, कृत्तिका तारका समुह १० करोड इतक्या वर्षे वयाचा आहे. आणखी एक मतप्रवाह असा ही या पुंजातील काही तारे २५ लाख वर्षे इतक्या वयाचे आहेत. वैदीक काळात कृत्तिका हे पहीले नक्षत्र मानले जायचे. याचा अर्थ असा होता, सुर्य जेव्हा कृत्तिका नक्षत्रात असायचा तेव्हा वसंत ऋतु सुरु व्हायचा, म्हणजेच दिवस व रात्र सारखे असायचे. शतपथ ब्राम्हण नावाच्या एका ग्रंथामध्ये, असा ही उल्लेख आहे की कृत्तिका पुर्वेपासुन ढळत नाही, तर बाकीची नक्षत्रे पुर्वेपासुन हलतात. हे जर खरे मानले तर, याचा अर्थ असा होईल की पुर्वी कधीतरी दिवस व रात्र एकसमान असण्याची, सुर्य कृत्तिकेमध्ये असतानाची असावी लागेल. वसंत विषुव म्हणजेच (मार्च) इक्विनॉक्स मार्च (चैत्र) मध्ये न येता कार्तिक मध्ये येत असावे.   सुर्य चंद्र पृथ्वी यांच्या गतिमानतेमुळे, विषुव व संपात बिंदु (मार्च व सप्टेंबर इक्विनॉक्स) पश्चिमेकडे सरकतात. एकुण २६००० वर्षांनी पुन्हा विषुव व संपात पुन्हा त्याच बिंदु वर येतात, हे आधुनिक खगोलशास्त्राने सिध्द केले आहे. याच विषुव बिंदुच्या सरकण्यामुळे कृत्तिका हल्ली पुर्वेला उगवत नाही. उलट गणिते करुन कृत्तिका पुर्वेला उगवायचे हे सिध्द केले गेले आहे. तो काळ होता इस पुर्व २५०० वर्षापुर्वीचा. त्यामुळे, भारतातील नक्षत्रांची यादी जगातील सर्वात जुनी आणि गणितीय सिध्दांतावर आधारीत अशी वैज्ञानिक यादी आहे. याच तारका समुहा मधील  HD 23514 नावाच्या एका, सुर्यापेक्षाही मोठ्या ता-याभोवती, धुलीकण सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रंज्ञांच्या मते, धुलीकण सापडणे म्हणजे ता-याभोवती ग्रहांच्या निर्मितीची प्रक्रिया असु शकते. पुढच्या वेळी अशाच एखादी आकाशातील चित्तरकथा जाणुन घेऊयात. आकाशदर्शन आपणा सर्वांनाच आवडते. यासाठीच आम्ही प्रत्येक महिन्यास, काळोख्या रात्रीच्या आसपासच्या शनिवार-रविवारच्या रात्री, आकाशदर्शनच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो. आमचा पुढील आकाशदर्शन (Stargazing near Pune) कार्यक्रम येत्या २५ जानेवारी रोजी आयोजित केला आहे. नावनोंदणी व अधिक माहिती साठी कृपया इथे क्लिक करा.