couple romantic camping near pune
We humans are nothing but an integral part of the nature, just like all other creatures incluging huge animals to micro-organisms. We are just like them. We have little upper hand as we can relate to past and draw assumptions to make future even better. And if we use this ability in right way we can take the entire world including all human beings and every single element in the nature to whole new height of harmony. If at all there is any creator, it must have thought of a big role to be played by human being in nature. Are we really playing the role of peace and harmony keeper in nature? A big question, isn’t it! We have even forgotten the basics, the roots of ours so no wonder we have  already forgotten the noble role, awaiting for us to be acted upon. We have even forgotten that we are fundamentally nature. We are not something other than nature. If we restore these principles in life, our lives would thrive. Generations would feel the amazing ability to lead lives in peace and harmony.  Today I am talking only about lives of human being however that’s not it! Let me tell you some fundamental benefits of being into the nature. We are quite away from these benefits now a days. We are on the verge of losing them forever. Common men and women, must learn these benefits so that, everybody in the society can benefit from those. Nature deficit disorder exists, and most of us have it. Richard Louv is a person I look up to all the time. He coined the term “nature deficit disorder” to describe the social, behavioral, and health consequences of alienation from the natural world. Although scientists are just beginning to understand the health impacts of urban, mostly indoor living, one thing is clear — we need to put down our devices and get outside. It’s good for your heart (mind) Japanese researchers have shown that forest bathing, the practice of sitting in the forest, lowers your blood pressure, pulse, and heart rate variability. It has also been shown to decrease stress hormone levels. We at nisargshala, do this activity for our guests. They feel the peace deep inside. You’re less likely to be overweight I am a good example of this. I was trapped in corporate living and overgrown my body weight to everyones surprise. In last two years, I am on the path of “Lets get outside” and the results are just amazing. In both kids and adults, access and exposure to nature has been shown to lower the risk of obesity. This relationship is most likely due to increased physical activity. Additional studies show that forest bathing decreases blood sugar and cortisol, both of which are also associated with obesity. Other precious benefits – You’ll be happier and improve your memory People who live close to nature experience less anxiety and depression. Walking in nature has been shown to improve mood and short-term memory in people with depression, as well as decrease rumination (repetitive, negative thoughts) and brain activity associated with mental illness. You’ll fight off illness more efficiently Again, let quote here, my own example. The last I was in ill-health, was in 2017. Not even seasonal illness could put me to rest in bed.  Exposure to nature improves immune system function in otherwise healthy people, increasing the production of natural killer cells, an important part of our defense against viruses and cancer. We do better In children, time spent in natural settings decreased ADHD (attention deficit hyperactivity disorder) symptoms. In adults, contact with nature improves focus, concentration, and work productivity. And for adults, it results in better productivity at work. Benefit of exercise without doing any Being outside is good for your health, even without the benefit exercise. But if you do choose to exercise in nature, studies show that you’ll feel a greater sense of revitalization, energy, enjoyment, and satisfaction. Nature is painkiller Just looking at nature scenery in a photo or out a window can reduce our experience of pain. Harmonize with nature’s rhythms Being outdoors, and away from artificial lights, helps synchronize your biology to natural circadian rhythms. Scientists investigating chronobiology, the study of biological rhythms, have shown that our connection to natural light/dark cycles helps to regulate our sleep, our moods, our stress levels, and our hormones. Indeed, feeling of gratification Setting aside artificial stimulation and immersing yourself in nature makes you more aware of your surroundings. You hear the rustle of leaves, the creaking of leaves, and the songs of the birds. It’s mindfulness meditation at its most simple. To our good luck, Pune is such a beautiful city, surrounded all round by amazingly striking natural world. If you keep exploring every weekend, it will take almost three years for you to see all the places. You can get most of these benefits even with sporadic exposure to nature. Even if you can only get out of the city infrequently, it will improve your health in countless ways. What are you waiting for? Regards Hemant S Vavale – 9049002053 Note – Author is engaged in offering nature experiences with the help of different activities in nature. Every weekend he organizes camping event near Pune, in Velhe. These excursions focus on posing direct; Guided experiences to men, women and kids from City, such as camping, hiking, trail walking , heritage walks, heritage hikes, stargazing, One-with-nature, adventure, etc.
camping near pune
निसर्गसौंदर्य हा हल्ली एक परवलीच शब्द झालेला आहे. प्रत्येकाला निसर्गसौंदर्य आवडते. सुंदर असलेल्या निसर्गात जायला आवडते, त्यात रमायला आवडते, त्याचे फोटो काढायला आवडते. हे निसर्ग सौंदर्य म्हणजे नक्की आहे तरी काय? निसर्ग मुळातच सुंदर आहे. त्याला मानवी क्रुत्रिम उपायांची गरज नसते. उलट एखाद भुभाग सुंदर करण्यासाठी मानव जर काही करीत असेल तर ते म्हणजे त्या सुंदर निसर्गाचे विद्रुपीकरणच होय. निसर्ग सुंदर वाटतो, भासतो, अनुभवता येतो, दिसतो याचे कारण नुसते दृश्य स्वरुप असते असे नव्हे. तर त्या निसर्गामध्ये तेथील सर्व सजीव-निर्जीवांमध्ये एक सामंजस्य असते. हे सामंजस्य म्हणजे हारमनीच निसर्गाला सुंदर करीत असते. म्हणजेच काय तर मानवी ह्स्तक्षेप जिकडे नाही तिकडे निसर्ग सुंदर आहे. निसर्ग शाळेच्या पाहुण्यामध्ये अनेकजण मला विचारतात की तुम्ही रस्त्याने जागोजागी निसर्गशाळेचे बोर्ड का लावित नाही. असे केल्याने तुमचे ठिकाण ग्राहकांना सापडणे सोपे होईल व तुमची जाहिरात देखील होईल. मी नेहमीच सर्वांना छान कल्पना आहे असे म्हणुन त्यांचे समाधान करतो. अगदीच कुणी इच्छुक असेल ऐकायला तरच मी माझ्या निसर्गसौंदर्याच्या कल्पनेला या बोर्ड व होर्डींग मुळे कसा बाध येतो हे सांगतो. एक काळ होता, कोथरुड ओलांडुन, पिरंगुट कडे गाडी निघाली की, अप्रतिम निसर्गसौंदर्याचा अनुभव प्रवाश्यांना यायचा. सुंदर हिरवाई, डोंगर, नाले हे सगळे अगदी रस्त्यवरुन दिसायचे. आता चित्र बदलले आहे. एनडीये चौक ते मुळशी दहा हजारांच्या वर विविध फलक रस्त्याने लावले आहेत. यातील मोजके कायदेशीर परवानग्या घेऊन लावले आहेत, बाकी सारेच्या सारे बेकायदेशीर तर आहेतच पण त्याही पेक्षा जास्त ते परिसराला कुरुप करणारे आहेत. यात दुकांनाचे फलक, बांधकाम व्यावसायिकांचे फलक, नेत्यांच्या वाढदिवसांचे फलक, हॉटेलांचे फलक, हॉस्पिटल वाल्यांचे फलक, दवाखान्यांचे फलक, चिकन दुकानदारांचे फलक, स्वीट दुकानदारांचे फलक, टेलरचे फलक, ब्युटी पार्लरचे फलक, फलक फलक नुसते फलक. जिकडे पहाव तिकडे फलक. दुकानाचा , दुकानाच्या वर असलेला फलक एक वेळ आपण समजु शकतो, पण दिकानासमोरच, रस्त्यावरुन ये जा करणा-या वाहन चालकांना आणि प्रवाश्यांना सहज दिसावे म्हणुन, रस्त्याला काटकोनात, लोखंडी फ्रेम मध्ये उभे केलेले, वीजेच्या खांबावर बांधलेले, झाडांना लटवलेले, भिंतींवर लावलेले, असे सगळे फलक अजाणतेपणी, प्रत्येक प्रवाश्याला अशांत करतात. प्रवाश्यांना हे समजत देखील नाही की त्यांना जबरदस्तीने, अनावश्यक जाहीरातबाजीला बळी पडावे लागत आहे. आपण पाहिलेले प्रत्येक दृश्य आपल्या अंतर्मनामध्ये नोंदले जाते. ही नोंद अनावश्यक असते. हे सारे आहे दृष्टी प्रदुषण. एखाद्या सुंदर निसर्गदॄश्यामध्ये, ज्यामध्ये कसलीही इमारत नाही, कसला ही कचरा नाही, प्लास्टीक नाही; जे काही आहे ते केवळ सगळे नैसर्गिक आहे. तर अशा सुंदर प्रदेशात मध्ये जर मी निसर्गशाळेचा बोर्ड लावला तर काय होईल? तर याने त्या नैसर्गिक सौंदर्याला बाध येईल. गाडीतुन प्रवास करीत असताना, आमच्या ग्राहकांना निसर्गसौंदर्याचा जो अनुभव घेता येतो, जे सौंदर्य पाहता येते ते सर्वांनाच आवडते. आणि आमच्या ग्राहकांशिवाय देखील हजारो लोक या रस्त्यांनी प्रवास करीत असतात. या सर्वांना निर्भेळ निसर्ग पाहता यावा, अनुभवता यावा ही आमची प्रांजळ भावना या मागे आहे. अर्थात माझ्या एकट्याने असा विचार केल्याने फार काही फरक पडेल असे अजिबात नाही. अन्य व्यावसायिक अगदी शे-दोशने मीटर अंतरावर त्यांच्या व्यवसायाच्या, रिसॉर्ट्स च्या जाहीरातीचे आणि दिशादर्शनाचे फलक लावतात. आणि हे सारे फलक निसर्गसौंदर्याला बाध आणतात. निसर्ग पाहायला येणा-या सर्वच पर्यटकांचा हा जन्म सिध्द अधिकार आहे. किमान आमच्या कडुन तरी या अधिकाराला बाध येणार नाही याची आम्ही दक्षता घेत असतो.   आणि राहिला प्रश्न दिशादर्शकांचा, तर त्यासाठी गुगल मॅपचा पर्याय आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना व्यवस्थित समजावुन देतो. त्यामुळे आमचे ग्राहक, आमच्या कॅम्पसाईट पर्यंत न चुकता येतात. एखाद दुसरा चुकतो देखील. चुकण्याचे कारण सुचनांचे नीट पालन न करणे हे असते. गुगल मॅप जिथपर्यंत घेऊन येतो , तिथे आमचा एक बोर्ड, दिशादर्शनाच्या बाणासहित असतो. पण हा फलक कायमस्वरुपी नाही. हा फलक ग्राहक पोहोचण्याच्या काही तास आधी तिथे लावला जातो व अपेक्षित ग्राहक पोहोचले की तिथुन काढला जातो. हा आमचा एक तोकडा प्रयत्न आहे, निसर्गसौंदर्य अबाधित राखण्याचा. अधिकाधिक लोकांनी /व्यावसायिकांनी से केले तर दृष्टी-प्रदुषण कमी होईल.   हेमंत ववले ९०४९००२०५३ निसर्गशाळा, पुणे
आपण म्हणतो की मनुष्य एक समाजप्रिय प्राणी आहे. सोशल स्पेसीज! आपण खरोखर असे समाज-शील , समुहात राहणारे, एकमेकांना पुरक राहिलो आहोत का? एक मनुष्य म्हणुन खरतर प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. परिस्थिती उत्साहवर्धक जरी नसली तरी अगदीच निराशावादी चित्र नाहीये हे मात्र नक्की. कारण मनुष्य जसा समाजशील आहे तसाच तो निसर्गातील इतर घटक, प्राणी यांच्याकडे पाहुन आजवर खुप काही शिकला आहे. सध्या शिकत आहे आणि भविष्यात देखील शिकत राहिल यात शंका नाही. पण त्यासाठी आपण निसर्गाशी जोडलो गेलो तरच हे शक्य होईल. खालील व्हिडीयो मध्ये दिसणारे दृश्य सह्याद्रीमधील भटक्यांसाठी काही नवीन नाहीये मित्रांनो. ज्याने ज्याने एखाद-दोन जरी ट्रेक सह्याद्रीमध्ये केले असतील त्यांना हा मुंग्यांचा गड नक्कीच दिसला असेल. आम्ही ज्या डोंगर भटक्या ज्येष्टांकडुन ट्रेकींग करायला शिकलो त्यांच्या कडुन आम्हाला या रचनेला ‘गड-मुंगी’ म्हणतात असे समजले. याची विशिष्ट रचना, की जी एखाद्या अभेद्य किल्ल्याच्या तटबंदीसारखी, वर्तुळाकार तटांची बनवलेली असते, ती खरतर वास्तु-स्थापत्या मधील एक अदभुत नमुना आहे. मध्यवर्ती एक द्वार असते, साधारण ३ इंच त्याच्या परिघ असेल. हेच या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार होय. यातुनच आत-बाहेर ये-जा केली जाते. य द्वाराच्या ऊंची सर्वात जास्त असते. जमीनीपासुन साधारण आठ इंचापर्यंत उंची मुख्य द्वाराची असु शकते. त्या भोवताली एखाद्या पाकळ्यांप्रमाणे एका आड दुसरा, मग तिसरा मग चौथा असे तट, ऊंची कमी कमी असलेले बनवलेले असतात. जर असा गड एखाद्या उतारावर असेल तर चढाच्या बाजुने प्रत्येक तटाची ऊंची जास्त असते व उताराकडे ती कमी झालेली असते. या गडांची बांधणी या मुंग्या मुख्यत्वेकरुन पावसाळ्यामध्येच करतात. या बांधकामासाठी सभोवतालची माती मुंग्य गोळा करतात. एक मुंगी ती केवढी आणि तिच्या मुखामध्ये केवढे अशी माती, ती आणु शकणार बरे? इवलासा मातीचा कण प्रत्येक मुंगी घेऊन येते आणि वेगवेगळ्या तटांवर लावते. अभ्यासकांच्या मते, या मातीच्या कणामध्ये मुंग्या त्यांच्या तोंडातुन लाळ किंवा तत्सम द्रव मिसळुन, त्या मातीला चिकट पणा आणीत असाव्यात. या व्हिडीयो मध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की ज्या तटांचे काम पुर्ण झालेले आहे ते तट चकचकीत, गुळगुळगुळीत आहेत. अगदी प्लास्टर केलेल्या भिंतीसारखेच. व बाहेरच्या तटांचे काम अद्याप सुरु असल्याने ते तट तुम्हाला थोडे खडबडीत दिसतील. या विशिष्ट रचनेचे प्रयोजन काय असावे बरे? पावसाच्या पाण्यामुळे जमिनीखालील मुंग्याची वसाहत व्यवस्थित रहावी हेच या रचनेचे मुख्य प्रयोजन असावे असे वाटते. वेगवेगळ्या तटांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या देखील, आणखी बाहेरच्या तटात उघडताना दिसतात. कदाचित पावसाचे पाणी जर पडले तर ते या तटीय रचनेमुळे बाहेर बाहेरच्या तटांत जाऊन शेवटी गडाबाहेर जावे यासाठीच या रचनेचा हेतु असावा. आपल्याकडे मराठी भाषेत या मुंग्यांना वेगळे काही नाव आहे असे ऐकिवात नाही. इंग्रजी मध्ये या मुंग्यांची ओळख Pheidole sykesii अशी केली गेली आहे. या ओळखीमध्ये देखील अद्याप एकमत नाहीये. बायोडाव्हरसिटी लायब्रेरीच्या एका पुस्तकात या मुंग्यांचा उल्लेख सापडतो. या व्यतिरिक्त डोंगर भटक्यांना जर या गड-मुंग्या व त्यांच्या गडा विषयी अधिक माहिती असेल , भविष्यात उपलब्ध झाली तर अवश्य आम्हाला पाठवा. तुमच्या नावासहीत ती माहिती या पानावर संग्रहीत केली जाईल. पहा गड-मुंगीचा हा व्हिडीयो. आवडल्यास नक्की फॉरवर्ड/शेयर करा. धन्यवाद हेमंत सिताराम ववले निसर्गशाळा पुणे
आपल्या सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याचे बेलाग सुळके, अतिखोल द-या ,श्वास रोखायला लावणारे कातळ कडे. सह्याद्रीची ओळख म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभारलेले, गगनचुंबी अभेद्य गडकोट. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथली हजारो वर्षांची महान संस्कृती. सह्याद्री ची ओळख म्हणजे याच संस्कृतीतुन जन्माला आलेले एक लोकोत्तर नर-रत्न – छत्रपती शिवाजी. सह्याद्री ची ओळख म्हणजे शिवाजी राज्यांच्या सोबत, कधी कधी त्यांच्याही पुढे जाऊन, प्राणांची बाजी लावणारे सह्याद्रीचे लाखो करोडो सुपुत्र म्हणजे मावळे. सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याच्या अंगाखांद्यावर उगम पावुन, पुर्व दिशेचा लाखो-करोडो हेक्टरचा प्रदेश सुपीक करणा-या नद्या. सह्याद्रीची ओळख म्हणजे कातळ कड्यांवरुन बेधुंद होऊन, खोलवर द-यांमध्ये उड्या घेणारे, स्वतःला झोकुन देणारे हजारो धबधबे. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथला मोसमी, बहारदार पाऊस. सह्याद्रीची ओळख म्हणजे… सह्याद्रीची ओळख नव्याने माझ्या सारख्या भटक्याला अगदी रोज होत असते. जेव्हा जेव्हा मी निसर्गात, सह्याद्रीच्या राकट प्रांगणात जातो तेव्हा तेव्हा, मला सह्याद्री नव्याने ओळख होत असते. सह्याद्री नित्य-नुतन जरी मला वाटत असला तरीही, मित्रानो माहितीये का तुम्हाला की सह्याद्री जगातील सर्वात वयोवृध्द डोंगररांगांमधील एक आहे. सुमारे १५ करोड वर्षांचा आहे बरका आपला लाडका सह्याद्री. म्हणजे १५ करोड वर्षांपुर्वी सह्याद्री (दख्खन पठारासहीत) आशिया खंडाशी जोडला गेला. त्यापुर्वी म्हणजे अंदाजे ४० करोड वर्षांपुर्वी पृथ्वीवर एकच भुखंड होता. मागील शतकातील एक भु-शास्त्रज्ञ आल्फ्रेड वेगेनेर यांनी त्यांचे सगळे आयुष्य खंडांतराच्या (खंडांतर हा मी योजलेला शब्द आहे याला इंग्रजी मध्ये Continent Drifting असे म्हणतात) अभ्यासासाठी वेचले. वेगेनेर यांनी पृथ्वीवरील सर्वात जुन्या, एकमेव असलेल्या भुखंडाला पॅंजेया/पॅंगईया म्हणजे संपुर्ण पृथ्वी असे नाव दिले. साधारण पणे ४५० करोड वर्षापुर्वी, अंतरिक्षामधील धुळ, वायु व इतर अंतरीक्षीय घटकांमुळे पृथ्वीची निर्मिती झाली. त्याच दरम्यान सुपरनोव्हा म्हणजे महाभयंकर विस्फोटामुळे, पृथ्वीचे तापमान वाढुन, धुळीने तयार झालेला तो गोळा वितळला. त्यालाच आपण ज्वालामुखी म्हणतो. हा ज्वालामुखीच जसजसा प्रवाही झाल त पासुन प्रत्यक्ष खडक, पर्वत, डोंगर तयार झाले तेव्हा पृथ्वीवर एकच भुखंड तयार झाला. एकच असलेला हा भुखंड काही काळाने तुटला व अनेक छोटे-मोठे भुखंड वेगवेगळे होऊन पृथ्वीवर विखुरले गेले. खरतर हा खुप मोठा विषय आहे. याविषयी आपण कधीतरी पुन्हा सविस्तर माहिती घेऊ . खालील व्हिडीयो पहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, सह्याद्री व हिमालय कसा अस्तित्वात आला. वर मी सह्याद्रीस वयोवृध्द म्हणालो याचे कारण असे की, हिमालय पर्वत रांग की जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे, ती भारतीय उपखंडाची व आशिया खंडाची धडक झाल्यानंतर अस्तित्वात आली आहे. हिमालयाचा जन्म त्या मानाने खुप अलीकडचा आहे. म्हणुनच सह्याद्रीस मी वयोवृध्द डोंगर असे म्हणतो. सह्याद्रीच्या पुरातन असण्याच्या खाणाखुणा आपणास सह्याद्रीच्या कातळाकड्यांकडे पाहुन दिसतात. नुकताच मी, साल्हेर सालोटा या गडांना भेट देऊन आलो. यातील सालोटाचे कातळ कडे तुटण्याच्या मार्गावर आहेत. एखादा हलका भुकंप देखील सालोट्याचा भुगोल बदलुन टाकेल. अशीच काहीशी अवस्था आपणास सह्याद्री उत्तुंग सुळक्यांची झालेली दिसते.   आपल्या मुळशी वेल्हे तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजेच मावळ भाग हा सह्याद्रीचाच भाग होय. मुळशीतील ताम्हिणी म्हणजे हंगामी पावसासाठी भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. तशीच अवस्था  भोर – वेल्ह्यातील मावळ पट्ट्याची आहे. कित्येक ठिकाणी पर्जन्यमापकाची उपलब्धता नसल्याने वास्तविक पर्जन्यमान कुठे किती होते याची माहिती मिळत नाही. पण मावळ पट्ट्यात तीन-तीन चार महिने सुर्यनारायणाचे दर्शन होत नाही. काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत इथे वर्षावने होती. ही जंगले इतकी घनदाट होती की उन्हाळ्यामध्ये देखील सुर्यकिरणे जमिनीवर पडत नसत. किर्र्र झाडी, महाकाय वृक्ष, तितक्याच मोठाल्या, जाडजुड, पुरातन वेली हे सारे सह्याद्रीला एका विशिष्ट ऊंचीवर नेऊन ठेवते. सह्याद्रीतील किल्ले हे जितके उत्सुकतेचा विषय आहे तितके जास्त कुतुहलाचा विषय आहे सह्याद्रीतील वनसंपदा. या वनसंपदेमध्ये, दरी-खो-यात, नद्या-नाल्यांत, कातळ-कड्यांवर, धबधब्यांवर, मोकळ्या माळरानांवर एक आख्खी सजीवसृष्टी गेली लाखो वर्षे जगत आहे, हे आपणास ठाऊक आहे काय? नाचणारा बेडुक नावाची एक बेडकाची प्रजाती आहे, ही प्रजाती किमान सात लक्ष वर्षांपासुन सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर नांदते आहे. सरीसृप, उभयचर, जलचर अशा अनेक प्रजाती इथे लक्ष-लक्ष वर्षांपासुन नांदत आहेत. मनुष्यास या सर्वांविषयी जेवढे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त ज्ञान आपण अजुन मिळवायचो आहोत. आपण अनभिज्ञ आहोत. भारताच्या एकुणच हवामानावर परिणाम करणारा मॉन्सुन म्हणजे मोसमी पाऊस भारतात पडतो याचे कारण फक्त आणि फक्त सह्याद्री आहे. एकेकाळी सजीव सृष्टीसाठी नंदनवन असणारा सह्याद्री वर्तमानात सजीवांसाठी शाप ठरत आहे. सजीव म्हणताना मी यांत मनुष्यास देखील मोजले आहे. आज भलेही अज्ञान, दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे मनुष्यास वाटत असेल की तो सुरक्षित आहे, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. व याचे संकेत युनेस्को द्वारे काही वर्षांपुर्वी दिले गेले आहेत. जगातील आठ जागतिक वारसा असलेल्या स्थळांच्या यादीमध्ये सह्याद्रीला स्थान देण्यात आले आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कित्येक सजीव नांदताहेत मित्रहो. फुले येणा-या वृक्ष-वनस्पतींच्या एकुण ७४०२ प्रजाती सह्याद्रीमध्ये आहेत. फुले न येणा-या वनस्पतींच्या अंदाजे १८०० प्रजाती आहेत.सस्तन प्राण्यांच्या १३९ प्रजाती आहेत. पक्षांच्या ५०८ प्रजाती आहेत. १७९ उभयचर, ६००० किटकांच्या प्रजाती, २९० गोड्यापाण्यातील माश्यांच्या प्रजाती आहेत. इथल्या जंगलांची आणखी एक खासियत अशी आहे की, ही जंगले सदाहरीत आहेत. झाडा-झुडूपांच्या इतक्या प्रजाती आहेत की काही झाडांची पाने जरी काही काळापुरती गळली तरी एकुण जंगल मात्र हिरवेगारच दिसते. तुम्हाला हे पहायचे असेल तर याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कोकण दिवा या ट्रेकचा व्हिडीयो अवश्य पहा. सह्याद्री आणि मॉन्सुन चे जसे नाते आहे तसेच नाते सह्याद्री व दुर्मिळ होत असलेल्या प्रदेशनिष्ट (Endemic) प्रजातींचे आहे. जागतिक दृष्टीने पाहिले तर नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीपैकी ३२५ प्रजाती सह्याद्रीमधील आहेत. ही अत्यंत दुखःद गोष्ट आहे. या ३२५ प्रजातींमध्ये २२९ प्रजाती वृक्ष-वनस्पतींच्या, ३१ प्रजाती सस्तन प्राण्यांच्या, १५ पक्ष्यांच्या, ४३ उभयचर, ५ सरपटणारे व एक मासा आहे. यापैकी ५१ प्रजाती कदाचित त्यांच्या अखेरच्या काही पिढ्यांमध्ये आहेत. निसर्गाशी मानवी नाते, काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत तरी सौहार्दाचेच होते असे मी म्हणु शकतो. याचे कारण असे की, मावळ भागातील काही लोकरिती मनुष्य व निसर्ग यातील सौहार्द दाखवणा-या आपणास पहावयास मिळतात. उदा – जेव्हा जुन जुलै मध्ये पावसाला सुरुवात होते, तेव्हा मोठ्या नद्या, धरणांतील मासे अंडी सोडण्याकरीता, नदीच्या उगमस्थानाकडे पोहण्यास सुरुवात करतात. नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने ते पोहतात. हजारो वर्षे मावळात राहणा-या मावळ्यांना, माश्यांच्या या प्रवासाविषयी माहिती अगदी पुर्वापार आहे. असे उलट दिशेने पोहणारे मासे पकडणे व खाणे खुपच सोपे काम आहे. तरीही मावळातील मंडळी, अंडी सोडण्यासाठी प्रवाहाच्या उलट दिशेने जाणारे मासे पकडत नाहीत व खात ही नाहीत. हेच मासे जेव्हा, अंडी सोडतात व पुनः प्रवाहासोबत पोहण्यास सुरुवात करतात तेव्हा, विशिष्ट पध्दतीचे बांबु व लाकडी जाळे तयार करुन मासे पकडले जातात.  विशिष्ट पध्दत अशासाठी म्हणायचे की, जाळ्यातील एकेका अटकावाचा आकार एवढा असतो की यात विशिष्ट वयाचाच, विशिष्ट आकाराचाच मास अडकेल. व लहान मासे, की जे अजुन पुर्ण वाढलेले नाहीत ते पुन्हा नदी-धरणात जातात. म्हणजे नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेवर फारसा परिणाम न करताही मावळातील सुज्ञ लोक मांसाहार करीत होते. आजही अशा पध्दती आपणास पहावयास मिळतात. हे नाते देखील, वाढत्या शहरीकरणामुळे , दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींसारखेच, नष्ट होण्याचा मार्गावर आहे. व हेच खरे कारण आहे, सह्याद्रीच्या होत असलेल्या –हासाचे.
In the wake of new times and modernity, our lives have changed drastically. For some of us, who are in their 40s to 50s, can still remember the time they have spent as a child, outdoors. Those were actually unstructured hours of daily life of any child, of that time. During that period of time spent outdoors, a kid unknowingly learnt loads of basic life principles. Apart from the life lessons, these hours spent outdoors, helped us keep our mental, emotional and physical states up to the mark. What has changed now? We remember, our elders (who could be in their 60s to 70s), scold us for spending time indoor, especially the TV time. The term idiot box, such came into existence and had acquired value in daily lives of many, those days. But still, TV time was there, so is now.  What has changed in great deal now? The massive urbanization, especially in India, is the new thing, which embarked in the journey of development. Development or the process of development or the policies made for development unwillingly made such dramatic changes in the lives of citizens that, though we know we are destroying natural world, we must be exposed more often to nature, we can’t do it. Urbanization is the real threat; we, our present days kids, and the generations to come are exposed to in great extent. There has to be a fool-proof, long term solution to this major issue. This solution demands policy makers to think with this paradigm. However, what, as commoner, each individual, kid can do to minimize the ill-effects of this urbanization? Before understanding what we, as an individual can do, lets first try to understand what are the actual threats we are exposed to, as an individual. loss of green space Parental fears and control Traffic Perceived risk of nature Stranger danger Authorities ‘Arms-closed’ conservation These are effects and to some extent reasons to NDD! What is NDD? NDD is a term coined by Richard Louv, in his best seller book ‘The child in the woods’. NDD stands for Nature Deficit Disorder. It’s a disorder which, like any other disorder can be diagnosed and be cured with correct alternatives. How do we diagnose NDD? Because nature deficit disorder is not meant to be a medical diagnosi (and is not recognized as one), researchers have not assessed the effects of nature deficit disorder. However, Richard Louv uses the term to point to some negative effects of spending less time in nature: Children have limited respect for their immediate natural surroundings. Louv believes that the effects of nature deficit disorder on our children will be an even bigger problem in the future. “An increasing pace in the last three decades, approximately, of a rapid disengagement between children and direct experiences in nature…has profound implications, not only for the health of future generations but for the health of the Earth itself”. The effects from nature deficit disorder could lead to the first generation being at risk of having a shorter lifespan than their parents. Attention disorders and depression may develop. “It’s a problem because kids who don’t get nature-time seem more prone to anxiety, depression and attention-deficit problems”.[citation needed] Louv suggests that going outside and being in the quiet and calm place can help greatly. According to a University of Illinois study, interaction with nature reduces symptoms of ADD in children.[medical citation needed] According to this study, “exposure to ordinary natural settings in the course of common after-school and weekend activities may be widely effective in reducing attention deficit symptoms in children”.Attention Restoration Theory develops this idea further, both in short term restoration of one’s abilities, and the long term ability to cope with stress and adversity. Following the development of ADD and mood disorders, lower grades in school also seem to be related to NDD. Louv claims that “studies of students in California and nationwide show that schools that use outdoor classrooms and other forms of experiential education produce significant student gains in social studies, science, language arts, and math”. How to treat NDD? In an interview on Public School Insight, Louv stated some positive effects of treating nature deficit disorder, “everything from a positive effect on the attention span to stress reduction to creativity, cognitive development, and their sense of wonder and connection to the earth”. Researchers and medical practitioners have not confirmed these effects. A relationship between the length of time of exposure to sunlight (by being outdoors) and a lesser incidence of myopia has been observed. In Indian context, is this threat a real one? And if yes, how do we tackle it? Yes the threat is very much real for Indians and the generations to come. As stated earlier, we are facing it big way these days, compared to some decades before. And the reason, but obvious, is URBANIZATION. To safeguard yourself and your kids, you must go out in the nature quite often and play freely. That’s it! Regards Hemant S Vavale Pune