We humans are nothing but an integral part of the nature, just like all other creatures incluging huge animals to micro-organisms. We are just like them. We have little upper hand as we can relate to past and draw assumptions to make future even better. And if we use this ability in right way we can take the entire world including all human beings and every single element in the nature to whole new height of harmony. If at all there is any creator, it must have thought of a big role to be played by human being in nature. Are we really playing the role of peace and harmony keeper in nature? A big question, isn’t it! We have even forgotten the basics, the roots of ours so no wonder we have already forgotten the noble role, awaiting for us to be acted upon. We have even forgotten that we are fundamentally nature. We are not something other than nature. If we restore these principles in life, our lives would thrive. Generations would feel the amazing ability to lead lives in peace and harmony. Today I am talking only about lives of human being however that’s not it! Let me tell you some fundamental benefits of being into the nature. We are quite away from these benefits now a days. We are on the verge of losing them forever. Common men and women, must learn these benefits so that, everybody in the society can benefit from those. Nature deficit disorder exists, and most of us have it. Richard Louv is a person I look up to all the time. He coined the term “nature deficit disorder” to describe the social, behavioral, and health consequences of alienation from the natural world. Although scientists are just beginning to understand the health impacts of urban, mostly indoor living, one thing is clear — we need to put down our devices and get outside. It’s good for your heart (mind) Japanese researchers have shown that forest bathing, the practice of sitting in the forest, lowers your blood pressure, pulse, and heart rate variability. It has also been shown to decrease stress hormone levels. We at nisargshala, do this activity for our guests. They feel the peace deep inside. You’re less likely to be overweight I am a good example of this. I was trapped in corporate living and overgrown my body weight to everyones surprise. In last two years, I am on the path of “Lets get outside” and the results are just amazing. In both kids and adults, access and exposure to nature has been shown to lower the risk of obesity. This relationship is most likely due to increased physical activity. Additional studies show that forest bathing decreases blood sugar and cortisol, both of which are also associated with obesity. Other precious benefits – You’ll be happier and improve your memory People who live close to nature experience less anxiety and depression. Walking in nature has been shown to improve mood and short-term memory in people with depression, as well as decrease rumination (repetitive, negative thoughts) and brain activity associated with mental illness. You’ll fight off illness more efficiently Again, let quote here, my own example. The last I was in ill-health, was in 2017. Not even seasonal illness could put me to rest in bed. Exposure to nature improves immune system function in otherwise healthy people, increasing the production of natural killer cells, an important part of our defense against viruses and cancer. We do better In children, time spent in natural settings decreased ADHD (attention deficit hyperactivity disorder) symptoms. In adults, contact with nature improves focus, concentration, and work productivity. And for adults, it results in better productivity at work. Benefit of exercise without doing any Being outside is good for your health, even without the benefit exercise. But if you do choose to exercise in nature, studies show that you’ll feel a greater sense of revitalization, energy, enjoyment, and satisfaction. Nature is painkiller Just looking at nature scenery in a photo or out a window can reduce our experience of pain. Harmonize with nature’s rhythms Being outdoors, and away from artificial lights, helps synchronize your biology to natural circadian rhythms. Scientists investigating chronobiology, the study of biological rhythms, have shown that our connection to natural light/dark cycles helps to regulate our sleep, our moods, our stress levels, and our hormones. Indeed, feeling of gratification Setting aside artificial stimulation and immersing yourself in nature makes you more aware of your surroundings. You hear the rustle of leaves, the creaking of leaves, and the songs of the birds. It’s mindfulness meditation at its most simple. To our good luck, Pune is such a beautiful city, surrounded all round by amazingly striking natural world. If you keep exploring every weekend, it will take almost three years for you to see all the places. You can get most of these benefits even with sporadic exposure to nature. Even if you can only get out of the city infrequently, it will improve your health in countless ways. What are you waiting for? Regards Hemant S Vavale – 9049002053 Note – Author is engaged in offering nature experiences with the help of different activities in nature. Every weekend he organizes camping event near Pune, in Velhe. These excursions focus on posing direct; Guided experiences to men, women and kids from City, such as camping, hiking, trail walking , heritage walks, heritage hikes, stargazing, One-with-nature, adventure, etc.
निसर्गसौंदर्य हा हल्ली एक परवलीच शब्द झालेला आहे. प्रत्येकाला निसर्गसौंदर्य आवडते. सुंदर असलेल्या निसर्गात जायला आवडते, त्यात रमायला आवडते, त्याचे फोटो काढायला आवडते. हे निसर्ग सौंदर्य म्हणजे नक्की आहे तरी काय? निसर्ग मुळातच सुंदर आहे. त्याला मानवी क्रुत्रिम उपायांची गरज नसते. उलट एखाद भुभाग सुंदर करण्यासाठी मानव जर काही करीत असेल तर ते म्हणजे त्या सुंदर निसर्गाचे विद्रुपीकरणच होय. निसर्ग सुंदर वाटतो, भासतो, अनुभवता येतो, दिसतो याचे कारण नुसते दृश्य स्वरुप असते असे नव्हे. तर त्या निसर्गामध्ये तेथील सर्व सजीव-निर्जीवांमध्ये एक सामंजस्य असते. हे सामंजस्य म्हणजे हारमनीच निसर्गाला सुंदर करीत असते. म्हणजेच काय तर मानवी ह्स्तक्षेप जिकडे नाही तिकडे निसर्ग सुंदर आहे. निसर्ग शाळेच्या पाहुण्यामध्ये अनेकजण मला विचारतात की तुम्ही रस्त्याने जागोजागी निसर्गशाळेचे बोर्ड का लावित नाही. असे केल्याने तुमचे ठिकाण ग्राहकांना सापडणे सोपे होईल व तुमची जाहिरात देखील होईल. मी नेहमीच सर्वांना छान कल्पना आहे असे म्हणुन त्यांचे समाधान करतो. अगदीच कुणी इच्छुक असेल ऐकायला तरच मी माझ्या निसर्गसौंदर्याच्या कल्पनेला या बोर्ड व होर्डींग मुळे कसा बाध येतो हे सांगतो. एक काळ होता, कोथरुड ओलांडुन, पिरंगुट कडे गाडी निघाली की, अप्रतिम निसर्गसौंदर्याचा अनुभव प्रवाश्यांना यायचा. सुंदर हिरवाई, डोंगर, नाले हे सगळे अगदी रस्त्यवरुन दिसायचे. आता चित्र बदलले आहे. एनडीये चौक ते मुळशी दहा हजारांच्या वर विविध फलक रस्त्याने लावले आहेत. यातील मोजके कायदेशीर परवानग्या घेऊन लावले आहेत, बाकी सारेच्या सारे बेकायदेशीर तर आहेतच पण त्याही पेक्षा जास्त ते परिसराला कुरुप करणारे आहेत. यात दुकांनाचे फलक, बांधकाम व्यावसायिकांचे फलक, नेत्यांच्या वाढदिवसांचे फलक, हॉटेलांचे फलक, हॉस्पिटल वाल्यांचे फलक, दवाखान्यांचे फलक, चिकन दुकानदारांचे फलक, स्वीट दुकानदारांचे फलक, टेलरचे फलक, ब्युटी पार्लरचे फलक, फलक फलक नुसते फलक. जिकडे पहाव तिकडे फलक. दुकानाचा , दुकानाच्या वर असलेला फलक एक वेळ आपण समजु शकतो, पण दिकानासमोरच, रस्त्यावरुन ये जा करणा-या वाहन चालकांना आणि प्रवाश्यांना सहज दिसावे म्हणुन, रस्त्याला काटकोनात, लोखंडी फ्रेम मध्ये उभे केलेले, वीजेच्या खांबावर बांधलेले, झाडांना लटवलेले, भिंतींवर लावलेले, असे सगळे फलक अजाणतेपणी, प्रत्येक प्रवाश्याला अशांत करतात. प्रवाश्यांना हे समजत देखील नाही की त्यांना जबरदस्तीने, अनावश्यक जाहीरातबाजीला बळी पडावे लागत आहे. आपण पाहिलेले प्रत्येक दृश्य आपल्या अंतर्मनामध्ये नोंदले जाते. ही नोंद अनावश्यक असते. हे सारे आहे दृष्टी प्रदुषण. एखाद्या सुंदर निसर्गदॄश्यामध्ये, ज्यामध्ये कसलीही इमारत नाही, कसला ही कचरा नाही, प्लास्टीक नाही; जे काही आहे ते केवळ सगळे नैसर्गिक आहे. तर अशा सुंदर प्रदेशात मध्ये जर मी निसर्गशाळेचा बोर्ड लावला तर काय होईल? तर याने त्या नैसर्गिक सौंदर्याला बाध येईल. गाडीतुन प्रवास करीत असताना, आमच्या ग्राहकांना निसर्गसौंदर्याचा जो अनुभव घेता येतो, जे सौंदर्य पाहता येते ते सर्वांनाच आवडते. आणि आमच्या ग्राहकांशिवाय देखील हजारो लोक या रस्त्यांनी प्रवास करीत असतात. या सर्वांना निर्भेळ निसर्ग पाहता यावा, अनुभवता यावा ही आमची प्रांजळ भावना या मागे आहे. अर्थात माझ्या एकट्याने असा विचार केल्याने फार काही फरक पडेल असे अजिबात नाही. अन्य व्यावसायिक अगदी शे-दोशने मीटर अंतरावर त्यांच्या व्यवसायाच्या, रिसॉर्ट्स च्या जाहीरातीचे आणि दिशादर्शनाचे फलक लावतात. आणि हे सारे फलक निसर्गसौंदर्याला बाध आणतात. निसर्ग पाहायला येणा-या सर्वच पर्यटकांचा हा जन्म सिध्द अधिकार आहे. किमान आमच्या कडुन तरी या अधिकाराला बाध येणार नाही याची आम्ही दक्षता घेत असतो. आणि राहिला प्रश्न दिशादर्शकांचा, तर त्यासाठी गुगल मॅपचा पर्याय आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना व्यवस्थित समजावुन देतो. त्यामुळे आमचे ग्राहक, आमच्या कॅम्पसाईट पर्यंत न चुकता येतात. एखाद दुसरा चुकतो देखील. चुकण्याचे कारण सुचनांचे नीट पालन न करणे हे असते. गुगल मॅप जिथपर्यंत घेऊन येतो , तिथे आमचा एक बोर्ड, दिशादर्शनाच्या बाणासहित असतो. पण हा फलक कायमस्वरुपी नाही. हा फलक ग्राहक पोहोचण्याच्या काही तास आधी तिथे लावला जातो व अपेक्षित ग्राहक पोहोचले की तिथुन काढला जातो. हा आमचा एक तोकडा प्रयत्न आहे, निसर्गसौंदर्य अबाधित राखण्याचा. अधिकाधिक लोकांनी /व्यावसायिकांनी से केले तर दृष्टी-प्रदुषण कमी होईल. हेमंत ववले ९०४९००२०५३ निसर्गशाळा, पुणे
आपण म्हणतो की मनुष्य एक समाजप्रिय प्राणी आहे. सोशल स्पेसीज! आपण खरोखर असे समाज-शील , समुहात राहणारे, एकमेकांना पुरक राहिलो आहोत का? एक मनुष्य म्हणुन खरतर प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. परिस्थिती उत्साहवर्धक जरी नसली तरी अगदीच निराशावादी चित्र नाहीये हे मात्र नक्की. कारण मनुष्य जसा समाजशील आहे तसाच तो निसर्गातील इतर घटक, प्राणी यांच्याकडे पाहुन आजवर खुप काही शिकला आहे. सध्या शिकत आहे आणि भविष्यात देखील शिकत राहिल यात शंका नाही. पण त्यासाठी आपण निसर्गाशी जोडलो गेलो तरच हे शक्य होईल. खालील व्हिडीयो मध्ये दिसणारे दृश्य सह्याद्रीमधील भटक्यांसाठी काही नवीन नाहीये मित्रांनो. ज्याने ज्याने एखाद-दोन जरी ट्रेक सह्याद्रीमध्ये केले असतील त्यांना हा मुंग्यांचा गड नक्कीच दिसला असेल. आम्ही ज्या डोंगर भटक्या ज्येष्टांकडुन ट्रेकींग करायला शिकलो त्यांच्या कडुन आम्हाला या रचनेला ‘गड-मुंगी’ म्हणतात असे समजले. याची विशिष्ट रचना, की जी एखाद्या अभेद्य किल्ल्याच्या तटबंदीसारखी, वर्तुळाकार तटांची बनवलेली असते, ती खरतर वास्तु-स्थापत्या मधील एक अदभुत नमुना आहे. मध्यवर्ती एक द्वार असते, साधारण ३ इंच त्याच्या परिघ असेल. हेच या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार होय. यातुनच आत-बाहेर ये-जा केली जाते. य द्वाराच्या ऊंची सर्वात जास्त असते. जमीनीपासुन साधारण आठ इंचापर्यंत उंची मुख्य द्वाराची असु शकते. त्या भोवताली एखाद्या पाकळ्यांप्रमाणे एका आड दुसरा, मग तिसरा मग चौथा असे तट, ऊंची कमी कमी असलेले बनवलेले असतात. जर असा गड एखाद्या उतारावर असेल तर चढाच्या बाजुने प्रत्येक तटाची ऊंची जास्त असते व उताराकडे ती कमी झालेली असते. या गडांची बांधणी या मुंग्या मुख्यत्वेकरुन पावसाळ्यामध्येच करतात. या बांधकामासाठी सभोवतालची माती मुंग्य गोळा करतात. एक मुंगी ती केवढी आणि तिच्या मुखामध्ये केवढे अशी माती, ती आणु शकणार बरे? इवलासा मातीचा कण प्रत्येक मुंगी घेऊन येते आणि वेगवेगळ्या तटांवर लावते. अभ्यासकांच्या मते, या मातीच्या कणामध्ये मुंग्या त्यांच्या तोंडातुन लाळ किंवा तत्सम द्रव मिसळुन, त्या मातीला चिकट पणा आणीत असाव्यात. या व्हिडीयो मध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की ज्या तटांचे काम पुर्ण झालेले आहे ते तट चकचकीत, गुळगुळगुळीत आहेत. अगदी प्लास्टर केलेल्या भिंतीसारखेच. व बाहेरच्या तटांचे काम अद्याप सुरु असल्याने ते तट तुम्हाला थोडे खडबडीत दिसतील. या विशिष्ट रचनेचे प्रयोजन काय असावे बरे? पावसाच्या पाण्यामुळे जमिनीखालील मुंग्याची वसाहत व्यवस्थित रहावी हेच या रचनेचे मुख्य प्रयोजन असावे असे वाटते. वेगवेगळ्या तटांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या देखील, आणखी बाहेरच्या तटात उघडताना दिसतात. कदाचित पावसाचे पाणी जर पडले तर ते या तटीय रचनेमुळे बाहेर बाहेरच्या तटांत जाऊन शेवटी गडाबाहेर जावे यासाठीच या रचनेचा हेतु असावा. आपल्याकडे मराठी भाषेत या मुंग्यांना वेगळे काही नाव आहे असे ऐकिवात नाही. इंग्रजी मध्ये या मुंग्यांची ओळख Pheidole sykesii अशी केली गेली आहे. या ओळखीमध्ये देखील अद्याप एकमत नाहीये. बायोडाव्हरसिटी लायब्रेरीच्या एका पुस्तकात या मुंग्यांचा उल्लेख सापडतो. या व्यतिरिक्त डोंगर भटक्यांना जर या गड-मुंग्या व त्यांच्या गडा विषयी अधिक माहिती असेल , भविष्यात उपलब्ध झाली तर अवश्य आम्हाला पाठवा. तुमच्या नावासहीत ती माहिती या पानावर संग्रहीत केली जाईल. पहा गड-मुंगीचा हा व्हिडीयो. आवडल्यास नक्की फॉरवर्ड/शेयर करा. धन्यवाद हेमंत सिताराम ववले निसर्गशाळा पुणे
आपला सह्याद्री अनेक गोष्टींसाठी प्रसिध्द आणि आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली, बहरलेली संस्कृती कशी होती, कशी आहे या विषयी आपण एका लेखामध्ये माहिती घेतली आहेच. तुम्हाला सह्याद्री व त्याची संस्कृती विषयीचा लेख वाचायचा असेल तर इथे क्लिक करा. सोबतच आपण सह्याद्री मधील विविध बेडकांच्या जाती-प्रजाती विषयी देखील माहिती घेतली आहे. सह्याद्रीच्या रानावनांत कोणकोणत्या भाज्या (रानभाज्या) उगवतात व त्या बनवाव्या कशा या विषयी देखील आपण सविस्तर माहिती घेतली आहे. पश्चिम घाटातील बेडुक देखील अभ्यासाचा विषय आहे. या विषयी अधिक माहिती इथे क्लिक करुन मिळेल. आज आपण सह्याद्री तील आणखी एका वैशिष्ट्यपुर्ण जीवा विषयी माहिते करुन घेणार आहोत. तो म्हणजे सह्याद्रीतील खेकडा! माझा ट्रेकिंग पार्टनर अरविंद एक भला मोठा मुठा हातात घेऊन.. आपल्या शहराच्या मावळ पट्ट्यात आढळणा-या दोन मुख्य खेकड्याच्या जाती म्हणजे मुठा खेकडा व काळा खेकडा या होय. पावसाळा सुरु होण्यापुर्वी दुर्गम भागातील लोक जीवनावश्यक सामग्रीची खेरेदी करुनच ठेवतात यात किराणा माल मुख्य असतो. याचे कारण असे की पावसामुळे तालुक्यच्या ठिकाणी जाणे त्यांना शक्य नसते. या सामग्री सोबतच मोट्या प्रमाणात सुकी मासळी देखील विकत घेतली जाते. रानभाज्या व परसबागीतील भाज्यांमुळे फायबर, विटामिन इत्यादींची पुर्तता होते पण प्रोटीनसाठी सुकी मासळी, नदी-नाल्यातील मासे, खुबे व खेकडे यांच्यावर अवलंबुन राहावे लागते. खेकड्यांमुळे भातखाचरांना देखील नुकसान होऊ शकते. भाताची रोपे लहान असताना, खेकडे ही रोपे खाऊ शकतात व त्यामुळे शेतक-यांची मेहनत वाया जाते. त्यामुळे देखील शेतीच्या आसपासच्या परीसरातील खेकडे पकडणे शेतक-यांसाठी अनिवार्य होऊन जाते. मुठा जातीचा खेकडा मी खेकड्यांचा व संस्कृतीचा काही संबंध आहे का हे तपासण्याचा प्रयत्न केल्यावर मला समजले की महादेव कोळी या समाजामध्ये बाळंतिण पुजे मध्ये खेकड्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा काही भागात आहे. तसेही अन्न पुरवठा म्हणुन खेकड्यांचा वापर हा देखील संस्कृतीचाच एक भाग आहे. खेकडा, या विषयावर देखील संशोधनास खुप वाव आहे. ज्याप्रमाणे समुद्रकिनारी खेकड्याची शेती केली जाते त्या प्रमाणेच, पश्चिम घाट माथ्यावर, जिथे खुप जास्त पाऊस पडतो, अशा भागात, जमिनीवरील खेकड्यांची शेती करण्यासाठी खुपच पोषक वातावरण आहे. यामुळे हजारोंच्या संख्येने रोजगार निर्मिती होऊ शकेल. तरुण पिढीने, अभ्यासकांनी, धोरणे बनविणा-यांनी या विषयाकडे देखील लक्ष दिले पाहिजे. आपली कॅम्पसाईट ज्या भागात आहे तिकडे खेकडे पकडण्याचे काम अगदी प्रत्येक घरातील माणसे करतात. प्रत्येक घरी आठवड्यातुन किमान एकदा तरी खेकड्याचे कालवण होतेच होते. खेकडे पकडण्यासाठी (आणि मासे देखील) ही मंडळी एका विशिष्ट साधनाचा उपयोग करतात. हे बांबुचे बनविलेले असते. याला गडदे/गडद असे म्हणतात. या गडद्यामध्ये खेकड्यांसाठी काहीतरी खाद्य टाकले जाते जसे गांडुळ, चिकनचे आतडे, खेणखतातील मोठाले गोल किडे, इत्यादी. खेकडे या गडद्यामध्ये आले की त्यांना बाहेर पडता येत नाही त्यातुन. तुम्ही जर कधी आमच्या कॅम्पसाईट ला आलात तर आवर्जुन गडदे कसे असते हे पहा. लहान मुले देखील खेकडे पकडु शकतात. त्यासोबत खेकडे पकडण्यासाठी आणखी एक पध्दत वापरतात. ती म्हणजे एखाद्या लांब काठीच्या टोकाला गांडुळ अथवा खेकड्याचे कोणतेही खाद्य बांधुन, त्या काठीचे टोक खेकड्याच्या बिळात घालायचे. खाद्याच्या वासाने खेकडा, ते खाद्य खाण्यासाठी त्या काठीला पकडण्याचा प्रयत्न करतो. काठीला थोडे हिसके बसले की पकडणाराला समजते की खेकडा आहे असे. मग हळु हळु ती काठी वर वर उचलायची. काठीच्या पाठोपाठ खेकडा देखील बाहेर येतो, मग चतुराईने, खेकड्याला, त्याच्या पाठीच्या बाजुने पकडायचे. हाताने पकडने हे थोडे जिकीरीचे काम आहे. खेकडा विषारी जरी नसला तरी त्याचा चावा मजबुत असतो. त्यामुळे तुम्हला जर खेकडा हाताने पकडण्याचे कसब माहित नसेल तर त्यापासुन लांब थांबलेले कधीही शहाणपणाचे होय. खालील व्हिडीय मध्ये पहा गडद्यामध्ये खेकडा पकड्याची पध्दत! खेकड्याचे कालवण (कालवण म्हणजे रस्साभाजी) माझे वडील, आम्हाला एक किस्सा नेहमी सांगायचे. माझ्या आईचे माहेर म्हणजे वारकरी कुटुंब. माहेरी त्यांच्याकडे वशाट कधी कुणी केले ही नाही आणि खाल्ले ही नव्हते. लग्नानंतर, बाबुजींनी (वडीलांना आम्ही बाबुजी म्हणायचो!) एकदा खेकडे आणले घरी व आईला कालवण करायला सांगितले. मटण शिजवतात तसे तिने खेकडे, आधी शिजायला ठेवले. पाच मिनिटे गेली, दहा मिनिटे गेली, अर्धा तास, एक तास होऊन गेला, तरीही खेकडे काही शिजेनाच. आई वेळोवेळी हाताने , पातेल्यातील खेकडे दाबुन पहायची. बाबुजींनी विचरले झाले का कालवण, त्यावर ती म्हणाली की खेकडे शिजतच नाहीत. अजुनही कडकच आहेत. तिच्या या उत्तरावर बाबुजींनी कपाळावर हात ठेवला व तिला खेकडा कसा शिजवतात हे शिकवले. तर खेकड्याचे कालवण करणे व ते देखील चवदार, ही एक कलाच आहे. ग्रामीण भागात, प्रत्येक घरात या कलेतील पारंगत गृहीणी अजुनही आहेत. इतक्या वर्षात माझी आई जसे खेकड्याचे कालवण तितके चवदार मी इतरत्र कुठेही खाल्लेले नाही. माझ्या आईच्या हातचे खेकड्याचे कालवण आणि घुग-याचे (काळे घेवडे) कालवण खायला मिळण्यासाठी भाग्य लागते बरका! खालील व्हिडियोमध्ये पहा, खेकड्याचे कालवण करण्याची कोकणी पध्दत. आमच्याकडे कॅम्पिंग ला आलात व खास आग्रह केलात तर आपण मिळुन खेकडे पकडण्यासाठी जाऊ शकतो ;). आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर अवश्य शेयर,फॉरवर्ड करा. आपला हेमंत सिताराम ववले निसर्गशाळा, पुणे. Our Upcoming Events July 2023 Jul 15 15 July 2023 Walk through Clouds & Camp Calling all dreamers and adventurers! Are you ready to experience the extraordinary? Join us on an enchanting journey as we walk through clouds, transcending the ordinary and embracing pure wonder. […] Find out more Jul 22 22 July 2023 Extreme Adventure & Camping Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Calling all adventure enthusiasts! Join us for an adrenaline-pumping Waterfall Rappelling & Monsoon Camping experience at Nisargshala! Feel the rush as you descend down roaring falls and immerse yourself in […] Find out more Jul 29 29 July 2023 Trek to Andhari Jungle & Camping Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Experience Monsoon Magic: Join Our Andhari Jungle Trek & Monsoon Camping at Nisargshala Immerse yourself in the enchanting monsoon season! Join our weekend trek to Andhari Jungle and experience the […] Find out moreAugust 2023 Aug 14 14 August 2023 Thrilling Monsoon Camp for Families Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India A thrilling adventure for entire family, walk through clouds , river crossing and waterfall rappelling. Please click here below to register Find out moreSeptember 2023 Sep 30 30 September 2023 Kutuhal – Younger Kids Camp Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Secure your child’s spot today and let them embark on a magical journey amidst Sahyadri’s natural beauty near Pune. Nature Explorers Camp awaits, ready to create lifelong memories in the […] Find out moreNovember 2023 Nov 25 25 November 2023 Huppya : Kids Nature & Adventure Camp Nisargshala Velhe, nisargshala Velhe, Maharashtra 412221 India Our kids the magic touch of nature, they need to listen to the enchanting music of nature, they must take dip
अनेक जण पुण्याजवळील पाच घाटांना भेटी देऊन आले. त्यातील काही निवडक व्हिडीयो तुम्हाला एकाच ठिकाणी पाहता यावेत म्हणुन, सर्व व्हिडीयो एकत्रित केले आहेत, एकाच पेज वर. विशेष म्हणजे हे सर्व व्हिडीयो मागील काही दिवसांतीलच आहेत. मढेघाट पुढील व्हिडीयो, मढेघाट धबधब्याच्या अगदी माथ्यावरुन घेतलेला आहे. असे माथ्यावरुन चित्रीकरण करणे धोकादायक आहे त्यामुळे असा आगाऊपणा करणे टाळा. View this post on Instagram @Top…#Madheghat Waterfall?️ A post shared by Omkar Yadav1212 (@omkaryadav1212) on Jul 14, 2019 at 7:44am PDT मुळशी – ताम्हिनी घाट <> देवकुंड धबधबा – मुळशी View this post on Instagram #devkundwaterfall #devkundwaterfalls #pune? #weekendtrip #monsoon #trucking #beautiful #waterfall #incredibleindia #nature #naturelovers #nature_perfection#gopro #goprohero7black A post shared by Santheep Suresh (@santheepsuresh) on Jul 10, 2019 at 9:16am PDT वरंधा घाट View this post on Instagram Aah!!! Such a peaceful view and atmosphere!!! #ramdasswami #dasbodh #bhor #mahad #shivtarghal #varandhaghat #raigaddistrict #waterfall #naturelover A post shared by AB3 (@anik3t_b) on Jul 7, 2019 at 11:20am PDT लोणावळा – खंडाळा माळशेज घाट