काल परवाच मी हॉर्स हेड नेब्युला विषयी लिहिलं आहे. त्यात जो फोटो वापरला आहे तो रोहीत पटवर्धन यांनी निसर्गशाळा येथुन काढला आहे. आज जेव्हा मुज्तबा यांनी काढलेला फोटो पाहिला तेव्हा या हॉर्स हेड विषयी अधिक जाणुन घेण्याची इच्छा झाली आणि शक्य तितकी माहिती वाचली. ती माहिती वाचल्यावर मला हॉर्स हेड ला तेजोमेघ म्हणने म्हणजे त्याच्या असण्याला , जसे आहे तसे असण्याला न्याय न देण्यासारखे आहे. आपल्याकडे नामकरण करताना अनेक गोष्टींचा विचार केला जायचा. एकतर नक्षत्रांचा विचार पुर्वी केला जायचा आणि दुसर म्हणजे नवजाताचा रंग कसा आहे, रुप कसे, नाकी-डोळी कसे आहे याचाही विचार केला जायचा. मी जेव्हा प्राचीन भारतीय खगोलाचा अभ्यास सुरु केला, तेव्हा मला अनेक गोष्टींची उकल होत गेली. त्यातच मला अश्विन या शब्दाचा/नावाचा अर्थ देखील समजला. पुराणांमध्ये अश्विन शब्दाचा अर्थ असा येतो की अश्वमुख असलेला तो अश्विन व असलेली ती अश्विनी होय. आज हे सांगायच कारण म्हणजे आज आपल्या निसर्गशाळा कॅम्पसाईट वरुन मुज्तबा नावाच्या एका हौशी फोटोग्राफरने अंतराळातील एका तेजोमेघाचा फोटो टिपला. इंग्रजीमध्ये या तेजोमेघास हॉर्सहेड नेब्युला असे म्हणतात. हॉर्सहेड म्हणजे अश्वमुख..म्हणजे घोड्याचे डोकं. अतिशय सुंदर असा हा फोटो आहे, तुम्ही पाहु शकता. तर याला मराठीत काही आधीचेच नाव कुणी दिले आहे का हे मी शोधले तर असे नाव आढळले नाही. मग याचे मराठीत नामकरण करण्यासाठी सर्वप्रथम शब्द आठवला तो अश्वमुख हा. अश्वमुख म्हणजे खुपच यांत्रिकी भाषांतर वाटले. आवडले नाही. पण थोड्यावेळाने अश्विन शब्द आठवला. आणि शोध संपला. आजपासुन आपण मराठी या तेजोमेघाला ‘अश्विन तमोमेघ’ म्हणुयात. तुम्ही म्हणाल यामध्ये ‘तमो’ हा शब्द कासयासाठी घेतला? चला याचे कारण समजुन घेवुयात. हॉर्स हेड नेब्युला (मराठीत आपण याला अश्विन तमोमेघ म्हणणार आहोत) हा एक डार्क नेब्युला म्हणजे मिट्ट घट्ट काळाकुट्ट पणाकडे झुकलेला असा हा अंतराळातील मेघ म्हणजे ढग आहे. तेजोमेघ आणि तमोमेघ यांमध्ये फरक आहे. तेजोमेघातुन प्रकाश निसटु शकतो तर तमोमेघातुन प्रकाश बाहेर सुटत नाही. आणखीही काही फरक आहेतच जसे धुळ आणि वायुची घनता, हायड्रोजन वायु, व चुंबकीय क्षेत्र. मुज्तबा नावाच्या एका तरुण हौशी फोटोग्राफर ने निसर्गशाळा येथुन टिपलेला हा फोटो, यात अश्विन तमोमेघ, फ्लेम तेजोमेघ आणि बर्नार्ड ३३ ..हे तीनही मेघ बर्नार्ड लुप मध्ये आहेत. वरील फोटोचे ढोबळ मानाने दोन भाग करुयात. वरील भाग म्हणजे लालसर दिसणारा भाग, या भागात ता-यांची संख्या खालील काळसर भागापेक्षा जास्त दिसते आहे. हा लालसर रंग हायड्रोजन अणु मधील एक इलेक्ट्रॉन निसटल्यामुळे आलेला असतो. बहुधा तेजोमेघ जे सुंदर व रंगीत दिसतात ते अशाच आयोनाईज्ड हायड्रोजन अणुंमुळेच दिसतात. अर्थात हे रंग केवळ फोटो काढल्यानंतरच दिसतात. उघड्या डोळ्यांना हे दिसु शकत नाहीत. फोटोमध्ये दिसणा-या लाल भागाविषयी आपण थोडक्यात समजुन घेतले. आता आपण तमोमेघाविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. या तमोमेघाच्या जवळ खुप मोठा तारा आहे ज्याला सिग्मा ओरायनिस म्हणतात. हा सिग्मा ओरायनिस म्हणजे आपण ज्याला व्याधाने मारलेला बाण म्हणतो ना त्यातील व्याधाच्या दिशेचा तारा होय. याला इंग्रजीमध्ये अलमिंटका असे म्हणतात. या ता-याच्या चुंबकीय प्रभावाने अश्विन तमोमेघातील अतीघट्ट, अतीघन असलेल्या वायु व धुळीला विशिष्ट दिशा व प्रवाह मिळत असतो. या अतीघट्ट , अतीघन धुळीमुळेच मागील ता-यांचा प्रकाश आपणाप्रत पोहोचु शकत नाही. ओरायन म्हणजे मृग तारकापुंजामध्ये दोन भिन्न गुणधर्मांचे अंतराळीय मेघ आहेत. पहिला म्हणजे सर्वपरिचीत ओरायन तेजोमेघ व दुसरा म्हणजे आज आपण ज्याविषयी माहिती घेत आहोत तो म्हणजे अश्विन तमोमेघ. ओरायन तेजोमेघातुन आरपार प्रकाश आपणाकडे येतो तर अश्विन तमोमेघातुन प्रकाश अजिबात इकडे येत नाही. फोटोत दिसणारा हा तमोमेघ म्हणजे कमी वस्तुमान असणा-या ता-यांना जन्म देणारी सुपीक खाण आहे. घोड्याच्या मानेच्या आसपास जे तेजस्वी ठिपके दिसत आहेत ते म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन चक्क नवीन जन्म घेणारे तारे आहेत. तर मित्रांनो आपण हे लिहिता लिहिता, वाचता वाचता दोन नवीन शब्द मराठी भाषेला दिले, अथवा नव्या अर्थाने वापर सुचवला आहे. हॉर्स हेड डार्क नेब्युलास अद्याप मराठी भाषेत नाव नव्हते ते आपण दिले. हॉर्स हेड साठी अश्विन हा शब्द आणि डार्क नेब्युला साठी तमोमेघ हा शब्द नव्याने आपण योजला आहे.आशा आहे तुम्हाला हा लेख आवडला असेल. कृपया लाईक, शेयर करायला विसरु नका. आणि तुमचा अभिप्राय नक्की कमेंटच्या रुपात कळवा. © हेमंत ववले, निसर्गशाळा, पुणे निसर्गशाळेचे आकाशदर्शन वेळापत्रक Mar 18 March 18 – March 19Stargazing EventFind out more Apr 15 April 15 – April 16StargazingFind out more Apr 22 April 22 – April 23Lyrid Meteor Shower 2023Find out more पुर्ण वर्षाचे कॅलेंडर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
एकदा सपकाळ सरांसोबत मी अजीवलीच्या देवराई परीसरात होतो. रात्री एका कौलारु घराच्या, शेणाने सारवलेल्या अंगणात पथा-या टाकुन आम्ही पाठ टेकवुन आकाशाकडे पाहात होतो. सरांनी आकाशाकडे बोट करुन स्वाती दाखवली, चित्रा दाखवली आणि मग म्हणाले ती बघ तिकडे, दुर, क्षितिजाच्या अगदी जवळ 'सारीका'...मी शोधण्याचा खुप प्रयत्न केला पण मला काही सारिका दिसली नाही तिथे.....
Asterism च्याच सोबतीला पिढ्यानपिढ्या वरील सारख्या कथा देखील भारतात सांगितल्या जातात ज्यामुळे केवळ आकाशाचा एक छोटासा भागच नाही तर बराच मोठा भाग ओळखणे एकाच कथेने सहज सोपे होऊन जाते. एकदा कथा समजली तर तारकासमुह समजणे खुप सोपे कारण तारका समुह कथेतील पात्रांप्रमाणे गुणवैशिष्ट्ये असणारेच असतात.
सुर्यसिद्धांत या खगोलीय ग्रंथामध्ये ब्रह्महृद्याबाबतील खालील श्लोक येतो.
हुतभुग्ब्रह्महृद्यौ वृषे द्वाविंंशभागगौ ॥
अष्टाभिः त्रिंशता चैव विक्षिप्तावुत्तरेण तौ ।
सुर्य सिध्दांत हे पुस्तक १२००० वर्षांपुर्वी लिहिलेले आहे.
ब्रह्महृद्य या ता-याची चित्तरकथा वाचण्यासाठी लिंक करा..
नेत्रतज्ञ हल्ली ज्या प्रमाणे प्राथमिक नेत्र चिकित्सा करतात, अगदी त्याचप्रमाणे प्राचीन काळीदेखील नेत्र चिकित्सा केली जायची. फरक फक्त एवढाच होता की हल्ली डॉक्टर्स अक्षरे आणि चिन्हे ओळखायला लावतात, तर पुर्वी आकाशातील कृत्तिका नक्षत्र रुग्णास पाहावयास लावुन, प्राथमिक नेत्र चिकित्सा केली जायची. ज्या व्यक्तिला कृत्तिका तारकासमुहामध्ये सहा पेक्षा कमी तारे दिसत त्यास दृष्टीदोष आहे व ज्यास सात किंवा जास्त तारे दिसत, त्यास पुढे हेरगिरी, जासुसी सारख्या क्षेत्रात संधी मिळत असे. ज्यास सहा तारे दिसत, त्याची दृष्टी साधारण म्हणजे व्यवस्थित आहे असे मानले जायचे. पाहिलय का कधी तुम्ही , हे कृत्तिका नक्षत्र, आकाशामध्ये? या दिवसात जर तुम्हाला कृत्तिका पाहायचे असेल तर, संध्याकाळी, म्हणजे काळोख होतानाच, हो अगदी होतानाच व पुढचा काही काळच, हे नक्षत्र, आकाशामध्ये पश्चिम गोलार्धात दिसते. या दिवसांमध्ये अंधार होताना हे नक्षत्र उगवलेले असते. व आकाशात एक चतुर्थांश वरही आलेले असते. सर्व प्रथम आपण कृत्तिका चे चित्र पाहुयात आणि मग त्याची कथा. कृत्तिका या नक्षत्रामध्ये ३०० च्या आसपास तारे, दुर्बिणीतुन पाहता येऊ शकतात. व उघड्या डोळ्यांना ६ ते ७ तारे , विनासायास दिसतात. अत्यंत लक्षणीय अशी ठेवण असलेल्या ह्या तारकासमुहातील मुख्य ६-७ ता-यांच्या भोवती विशिष्ट निळ्या रंगाची प्रभा दिसते. पुण्यातुन जर आपण कृत्तिका, ह्या दिवसांत पहायचा म्हंटले तर संधीकाळानंतर अगदी थोडाच वेळ कृत्तिका बघण्याची संधी मिळते. तेच आपण नोव्हेंबर डिसेंबर जर कृत्तिका पाहु जाल तर, जवळ जवळ ६ ते ७ तास आपण कृत्तिका आकाशामध्ये पाहु शकतो. कृत्तिका उगवताना, तिची जी रचना असते, त्याच्या अगदी उलटी मावळताना दिसते. असे सर्वच तारका समुहांच्या बाबतीत घडत असते. कृत्तिकेच्या आधी अश्विणी, भरणी पश्चिमेकडे मावळतीकडे असतात तर, रोहीणी, मृग मागोमाग, दक्षिण-पुर्व आकाशामध्ये दिसतात. वर हबल टेलीस्कोप मधुन टिपलेले कृत्तिकाचे छायाचित्र आहे. कृत्तिका नक्षत्र पृथ्वीपासुन सुमारे ४०० प्रकाशवर्षे इतके दुर आहे. या तारकापुंजातील सर्वात तेजस्वी तारा म्हणजे अंबा; यास इंग्रजी मधेय Alcyone असे म्हणतात. हल्लीच केलेल्या एका शोधात असे समोर आहे आहे की या तारकापुंजातील सर्वच तारे त्यांची तेजस्विता बदलणारे आहेत. यांच्या प्रखरतेमध्ये होणारे हे बदल असंबंध्द म्हणजेच अनियमित आहेत. केवळ एकच तारा ज्याचे नाव Maia आहे, या ता-याची प्रखरता नियमित पणे बदलते. दर दहा दिवसांनी त्याच्या प्रखरतेमध्ये बदल जाणवतो. ही निरीक्षणे व अभ्यास केप्लर स्पेस टेलीस्कोप द्वारे केले आहेत. खालील आकृतीमध्ये तुम्हाला या ता-यांच्या प्रखरतेमध्ये होणारे ब्दल पाहता येतील. मनुष्याला पृथ्वीवर अवतरुन जितका काळ झाला अंदाजे तेवढेच म्हणजे २५ लक्ष वर्षे किंवा त्याहुन थोडेसेच जास्त वय आहे या तारकापुंजाचे. कृत्तिका नक्षत्र, राशी चक्रातील वृषभ राशीचा भाग आहे. वृषभ राशीमध्ये रोहीणी (पुर्ण), कृतिका (तीन चतुर्थांश) व मृग नक्षत्र (अर्धे) यांचा समावेश होतो. आता चित्रांची चित्तरकथा – भगवान भोले भंडारींच्या तेजाने, जन्माला आलेले मुल, सहा कन्यकांद्वारे वाढविले जाते. ह्या सहा कन्यका म्हणजेच कृत्तिका. व त्या मुलाच्या धातृ मातांच्या मुळेच भगवान शंकरांच्या त्या योध्द्या पुत्राला नाव पडले कार्तिकेय. एक कथा पुरांणांकध्ये अशी आहे की, कृत्तिका म्हणजे सहा ऋषिपत्न्या आहे. सप्तर्षी नावाच्या नक्षत्रातील सहा ऋषिंच्या सहा पत्न्या म्हणजे कृत्तिका. संभूती, अनुसुया,क्षमा,प्रीती,सन्नती,अरुंधती आणि लज्जा अशी ह्या कृत्तिकांची नावे आहेत. ( तर सातवे ऋषि वसिष्ट हे त्यांच्या पत्नी सहीतच, सप्तर्षी तारका समुहामध्ये आहेत. वसिष्ट व त्यांची पत्नी अरुंधती, ही एक जुळी ता-यांची रचना आहे. हे दोन्ही तारे, एकमेकांभोवती, अत्यंत संथ गतीने, एकमेकांभोवती फिरत असतात. या विषयी विस्ताराने पुन्हा कधी तरी ) भारताप्रमाणे अन्य संस्कृतींमध्ये देखील, या तारकासमुहाला वेगवेगळ्या नावाने आणि कथांनी ओळखले जाते. मुळ अमेरीकन संस्कृतीमध्ये देखील एक कथा येते. सात मैत्रिणी एकदा, चांदण्या रात्री, गम्मत, छंद म्हणुन दुरवर एका ठिकाणी नाचगाण्यासाठी जातात. तिथे गेल्यावर, नाच गाणे सुरु असताना, अचानक जंगली श्वापदे चहुबाजुंनी त्यांना घेरुन , ठार करणार, इतक्यात, त्या मुली, ज्या खडकावर उभ्या असतात, त्या खडकालाचा प्रार्थना करतात की त्या प्राण्यांपासुन वाचव म्हणुन. क्षणार्धात, तो खडक, असाच्या असा जमीनीपासुन, उंच उंच वाढु लागतो, व एक मोठा पर्वताचा सुळकाच त्या ठिकाणी उभा राहतो. पुढे जाऊन ह्या मुली तारका बनुन आकाशात जातात व तो सुळका आजदेखील उत्तर अमेरीकेमध्ये डेव्हिल्चा मनोरा किंवा पर्वत म्हणुन ओळखला जातो. प्राचीन ग्रीक सभ्यता देखील ह्या तारका म्हणजे मुली आहेत असेच मानायची. ग्रीकांच्या कथेमध्ये, या मुलींच्या मागे कुणी जंगली प्राणी लागलेले नसतात, तर ओरायन नावाचा शिकारी लागलेला असतो. सात वर्षे पळुन पळुन थकल्यावर त्या मुली झीऊस नावाच्या ग्रीक देवतांच्या राजाची प्रार्थना करुन वाचवण्याची विनंती करतात. झीऊस दयाळु होऊन, त्या सात मुलींना आकाशामध्ये स्थिर आणि सुरक्षित करतो. कृत्तिका या तारका समुहास, इंग्रजीमध्ये प्लेडीस असे म्हणतात. आधुनिक खगोलशात्र मानते की, कृत्तिका तारका समुह १० करोड इतक्या वर्षे वयाचा आहे. आणखी एक मतप्रवाह असा ही या पुंजातील काही तारे २५ लाख वर्षे इतक्या वयाचे आहेत. वैदीक काळात कृत्तिका हे पहीले नक्षत्र मानले जायचे. याचा अर्थ असा होता, सुर्य जेव्हा कृत्तिका नक्षत्रात असायचा तेव्हा वसंत ऋतु सुरु व्हायचा, म्हणजेच दिवस व रात्र सारखे असायचे. शतपथ ब्राम्हण नावाच्या एका ग्रंथामध्ये, असा ही उल्लेख आहे की कृत्तिका पुर्वेपासुन ढळत नाही, तर बाकीची नक्षत्रे पुर्वेपासुन हलतात. हे जर खरे मानले तर, याचा अर्थ असा होईल की पुर्वी कधीतरी दिवस व रात्र एकसमान असण्याची, सुर्य कृत्तिकेमध्ये असतानाची असावी लागेल. वसंत विषुव म्हणजेच (मार्च) इक्विनॉक्स मार्च (चैत्र) मध्ये न येता कार्तिक मध्ये येत असावे. सुर्य चंद्र पृथ्वी यांच्या गतिमानतेमुळे, विषुव व संपात बिंदु (मार्च व सप्टेंबर इक्विनॉक्स) पश्चिमेकडे सरकतात. एकुण २६००० वर्षांनी पुन्हा विषुव व संपात पुन्हा त्याच बिंदु वर येतात, हे आधुनिक खगोलशास्त्राने सिध्द केले आहे. याच विषुव बिंदुच्या सरकण्यामुळे कृत्तिका हल्ली पुर्वेला उगवत नाही. उलट गणिते करुन कृत्तिका पुर्वेला उगवायचे हे सिध्द केले गेले आहे. तो काळ होता इस पुर्व २५०० वर्षापुर्वीचा. त्यामुळे, भारतातील नक्षत्रांची यादी जगातील सर्वात जुनी आणि गणितीय सिध्दांतावर आधारीत अशी वैज्ञानिक यादी आहे. याच तारका समुहा मधील HD 23514 नावाच्या एका, सुर्यापेक्षाही मोठ्या ता-याभोवती, धुलीकण सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रंज्ञांच्या मते, धुलीकण सापडणे म्हणजे ता-याभोवती ग्रहांच्या निर्मितीची प्रक्रिया असु शकते. पुढच्या वेळी अशाच एखादी आकाशातील चित्तरकथा जाणुन घेऊयात. आकाशदर्शन आपणा सर्वांनाच आवडते. यासाठीच आम्ही प्रत्येक महिन्यास, काळोख्या रात्रीच्या आसपासच्या शनिवार-रविवारच्या रात्री, आकाशदर्शनच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो. आमचा पुढील आकाशदर्शन (Stargazing near Pune) कार्यक्रम येत्या २५ जानेवारी रोजी आयोजित केला आहे. नावनोंदणी व अधिक माहिती साठी कृपया इथे क्लिक करा.