एकदा सपकाळ सरांसोबत मी अजीवलीच्या देवराई परीसरात होतो. रात्री एका कौलारु घराच्या, शेणाने सारवलेल्या अंगणात पथा-या टाकुन आम्ही पाठ टेकवुन आकाशाकडे पाहात होतो. सरांनी आकाशाकडे बोट करुन स्वाती दाखवली, चित्रा दाखवली आणि मग म्हणाले ती बघ तिकडे, दुर, क्षितिजाच्या अगदी जवळ 'सारीका'...मी शोधण्याचा खुप प्रयत्न केला पण मला काही सारिका दिसली नाही तिथे.....
भारतीय पुराणकथांमध्ये ज्याप्रमाणे इंद्र ऐषोआरामी, रंगेल दर्शवला आहे तसेच युनानी कथांमधील विविध देव देखील आहेत. अपोलो या देवाचे चे देखील प्रेमसंबंध संबंध होते. त्यातील एक म्हणजे कोरोनीस. अपोलो स्वर्गात राहणारा देव तर कोरोनीस पृथ्वीवर राहणारी स्त्री.
याचे आणखी एक कोडे सांगितले जाते. अशा कोणत्या दोन बहिणी आहे की ज्यातील पहिली दुसरीला जन्म देते व दुसरी पुन्हा पहिलीला जन्म देते?